Advertisement
उद्योग कथा

क्रांतिज्योती स्वयंसाहाय्यता महिला बचत गट

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

‘गरीब साधारण पार्श्‍वभूमी असलेल्या परिवारातील सर्वसाधारण महिला; बचत गटाच्या माध्यमातून आपला व परिवाराचा विकास साधावा या हेतूने एकत्र येतात व शासकीय व निमशासकीय योजनांच्या साहाय्याने तथा आपसी विचारविनिमय व सहकार्याने उद्योग यशस्वी करतात.” ह्या संकल्पनेचा धागा पकडून नागपूरमधील बुटीबोरी येथील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दीपा चौरे व अरुणा खडसे यांनी परिसरातील महिलांना संघटित केले.

दीपा चौरे घरकामासोबत एक छोटेसे लेडीज बुटिक चालवतात. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचा उद्योगाकडे कल होता. प्रत्येक व्यवसायात संघटनेला खूप महत्त्व असते हे त्यांना ठाऊक असल्याने मार्च २०१५ मध्ये दहा महिलांना सोबत घेऊन त्यांनी ‘क्रांतिज्योती स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाची’ स्थापना केली.

बचत गट स्थापनेस तेजस्विनी महिला विकास संस्था हिंगणी यांचे सहकार्य लाभले. प्रति माह प्रत्येक सभासदाची १०० रुपयांची बचत सुरू झाली. बचत गटासंबंधी सर्व प्रकारची माहिती, हिशेबाचे व्यवहार, नियम, अटी आत्मसात करणे सुरू झाले. अल्पावधीतच महिला उद्योगात कुशल झाल्या.

गटाचे व्यवसाय

२०१५ च्या नोव्हेंबरमध्ये क्रांतिज्योती स्वयंसाहाय्यता महिला गटास नाबार्ड पुरस्कृत ‘नेब्फिंस’ या वित्तीय संस्थेतर्फे तीन लाखांचे कर्ज मंजूर झाले ज्यातून काही रक्कम सदस्यांनी भाजीपाला विक्री व्यवसायात गुंतवली व कोषाध्यक्ष प्रतिभा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायांतर्गत परिसरातील शेतकर्‍यांकडून भाजीपाला खरेदी करून आठवडी बाजारात विकला जातो ज्यातून गटास सर्व खर्च वजा करून मासिक २००० ते ४००० चे उत्पन्न प्राप्त होते.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


कर्जातील काही रक्कम ‘बेबी वेअर्स’च्या व्यवसायात भांडवलरूपात वापरण्यात आली. ज्यात नवजात बाळासाठी तयार कपडे, झबले, फ्रॉक, लंगोट, दुलई वगैरेचे उत्पादन केले जाऊ लागले. इथे कच्चा माल खरेदीपासून कटिंग, शिलाई, पॅकिंग व विक्री महिला स्वत: करतात. त्यातून सरासरी गटास उत्पन्न मिळत नाही.

२०१६ मध्ये गटास महाराष्ट्र शासनाच्या ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध महिला बचत गटास निमी ट्रॅक्टर (ट्रॉली व रोटवीटरसहित) पुरवठा योजना’अंतर्गत ट्रॅक्टर प्राप्त झाला. महिलांनी एका शेतकर्‍यास वार्षिक अनुबंधावर हा ट्रॅक्टर भाड्याने दिला ज्यातून गटाला दरमहा चार हजार रुपये उत्पन्न मिळते. अशा विविध स्रोतांतून गटास दरमहा सात ते दहा हजार रु. उत्पन्न होत आहे. नफा वाटून घेण्यापेक्षा महिलांनी तो गटातच ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा!

उपलब्धी

गटात होणार्‍या उत्पन्नामुळे व नियमित बचतीमुळे सभासदांना गटातून कर्जवाटप होऊनसुद्धा अतिरिक्त रक्‍कम गटात राहू लागली. त्यातून गटास भविष्यात छान परतावा मिळावा या हेतूने सर्व महिलांनी परस्पर सहमतीने गटाच्या नावाने प्लॉट विकत घेण्याचे ठरवले व जून २०१६ ला बुटीबोरीजवळच एका लेआऊटमध्ये मासिक हप्त्यावर प्लॉट्स बुकिंग करण्यात आले ज्यावर भविष्यात एक रोपवाटिका उद्योग सुरू करण्याचा महिला विचार करत आहेत.

प्रदर्शनीत सहभाग

नोव्हेंबर २०१६ ला नागपूर रेशीमबाग मैदान येथे आयोजित ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनीमध्ये नाबार्ड व तेजस्विनी महिला विकास संस्था यांच्या मदतीने क्रांतिज्योती महिला बचत गटास स्टॉल मिळाले ज्यात महिलांनी उत्तमरीत्या गटाचे प्रॉडक्शन बेबी वेअर्स, डिझायनर कुशन, इ.चे मार्केटिंग व विक्री केली.

मार्च २०१६ ला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समिती नागपूर यांच्या वतीने क्रांतिज्योती स्वयं-साहाय्यता महिला बचत गटाचे स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले. येथेपण गटाच्या उपक्रमास भरपूर प्रतिसाद मिळाला.

सामाजिक उपक्रम

‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे क्रांतिज्योती स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाची वाटचाल सुरू आहे. बुटीबोरी व आसपासच्या पुष्कळ महिला बचत गटासाठी आमचा गट मार्गदर्शन म्हणून भूमिका पार पाडत आहे. नवीन गट स्थापन करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, ते त्यांना उद्योग सुरू करण्यापर्यंत आम्ही मदत करतो. तसेच सरकारी व निमसरकारी योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो.

आमच्या मार्गदर्शनाने परिवर्तन महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, माऊली महिला बचत गट, ओम साई महिला बचत गट आदी गटांचे काम चालू आहे. बेटी बचाव आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिला गेला. त्यासाठी दरमहा बेबी वेअर्स त्यांच्याकडे पाठवले जातात. महाराष्ट्र शासनाच्या ‘एक कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत’ आमच्या गटातर्फे स्वखर्चाने आवळ्याच्या ५० जातींचे वृक्षारोपण केले.

क्रांतिज्योती महिला बचत गटाचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार व्हावा व शासनाने इतर उपक्रम अधिकाधिक बचत गटापर्यंत पोहोचवावे या हेतूने गटातर्फे एक फेसबुक पेज तयार केले आहे ज्यातून बचत गटाचे विविध उपक्रम, कार्य, उद्देश, हेतू, शासकीय योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आता व्हॉट्सअपद्वारेही संपर्कात असतो.

सांस्कृतिक कार्यक्रम

दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. या कार्यक्रमाला अनेक जण बहुसंख्येने हजेरी लावतात.

– दीपा चौरे
संपर्क : ७७९८१३३२१९

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: