Smart Udyojak Billboard Ad

कृष्णातीरीच्या खाद्यसंस्कृतीचा जगभर प्रचार करणारी ‘कृष्णाकाठची मेजवानी’

ब्रॅण्डचे नाव : रमाज् ‘कृष्णाकाठची मेजवानी’

ब्रॅण्डची स्थापना : २०२१

ब्रॅण्ड कशाचा आहे?

पश्चिम महाराष्ट्रातील शुद्ध, सात्विक, पारंपरिक खाद्यपदार्थ

rama potdar udyojakमहाबळेश्वरला उगम पावणारी ही नदी वाई, सातारा, कराड, सांगली, औदुंबर, नृसिह्ववाडी, कुरुंदवाड, कोल्हापूरमधून वाहते. ही नदी म्हणजे साक्षात शिव आणि विष्णूंची आकृतीच. ही कृष्णा महानदी ताप आणि भय यांना घालवणारी. सर्वांचं हित करणारी आहे. श्री दत्तप्रभुंच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पाण्याची चवच न्यारी.

या खादयसंस्कृतीचे ही विशेष महत्त्व आहे. या खाद्यपदार्थाची मेजवांनीच. करोना आणि महापूर यामुळे पश्चिम महाराष्ट्रास खूप नुकसान सोसावे लागले. ज्याप्रमाणे विविध प्रदेशांतल्या स्थानिक प्रॉडक्ट्सची एक वेगळी ओळख निर्माण होऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे; तसेच माझ्या गावातीलही प्रॉडक्ट्स जगभर पोचावेत हा हेतू आहे.

कृष्णेच्या पाण्याची चव निराळी आहे. त्या पाण्यावर वाढलेली गावताची कुरणे आणि त्यावर पोसलेली दुभती जनावरे,त्यामुळे तेथील दुधाला वेगळीच चव आहे, त्यामुळे बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पेढे, वांगी मसाले यांच् विशेष महत्त्व आहे. कवठ बर्फी ही फक्त वाडीत् बनते. जे सात्विक, शुद्ध, पारंपरिक आहेत.

सांगलीचा चिरमुरा, चिवडा, खाजा. कोल्हापूरचे मसाले, भाजीपाला असे खूप सारे पदार्थ आणि ब्रॅण्ड्स आहेत, जे लोंकापर्यंत पोचावायचे आहेत.

‘रमाज् कृष्णाकाठची मेजवानी’चे प्रॉडक्ट्स

  • श्री क्षेत्र नरसोबावडीचे पेढे, करदंट, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड, कवठ बर्फी, खव्याची मिठाई, खाजा, बालुशाही, कुंदा
  • उच्च प्रतीचे पारंपरिक पद्धतीने केलेले गायीचे आणी म्हशीचे तूप
  • सांगली ची हळद,मिरची पूड ,फरसाण,चकली
  • कोल्हापूरचा कांदा लसून मसाला,गोडा मसाला
  • साताऱ्याचे मध आणि इतर खाद्यपदार्थ

कंपनीचे नाव (ब्रॅण्डच्या नावापेक्षा वेगळे असल्यास)

Vexxel Exports

स्वतःची एक्स्पोर्ट कंपनी, जी दुबाई, मलेशिया, कतार, सिंगापूरमध्ये काम करते. हा ब्रँड export कंपनी अंतर्गत् आहे.

कंपनीचे मालक / पार्टनर / डायरेक्टर्सची नावे :

मालक – रमा रवींद्र पोतदार
डायरेक्टर – गंधार रवींद्र पोतदार

संपर्क : ९३७२५११६१३

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

तुम्ही उद्योजक / व्यापारी / व्यावसायिक आहात आणि तुमचीही बिझनेस प्रोफाइल या पोर्टलवर प्रसिद्ध करायची आहे? तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: Content is protected !!
Scroll to Top