लघुउद्योग भारतीच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त २७ एप्रिल २०२५ रोजी नाशिक येथे कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुमेध देशमुख, सुहास वैद्य, निखिल तापडिया, मिलिंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमेध देशमुख म्हणाले की आपले कार्य गुणवत्तापूर्ण असावे, कारण गुणवान कार्यकर्ता संघटना सशक्त करते. भौतिक व आर्थिक जीवनाची योग्य सांगड घालावी. छोटे उद्योग लहान शहरात वृद्धिंगत व्हावेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
कार्य, कार्यक्रम, कार्यकर्ता ही सशक्त साखळी कुठल्याही क्षेत्रात यशस्वीततेसाठी उपयुक्त ठरेल. समस्या येतात, परंतु त्यावर मात करून पुढील वाटचाल करावी, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी देशभरात उद्योजक संमेलने व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुहास वैद्य या वेळी म्हणाले की समाजातील परिवर्तन राष्ट्रीय प्रगतीस सहाय्य ठरते. उद्योजकांमधे असणारे बुध्दी, शक्ती व व्यवस्थापन कौशल्य हे गुण औद्योगिक विकास साधीत राष्ट्राची प्रगती करतात. उद्योजकांचा राष्ट्रीय उद्धरात सक्रीय सहभाग असावा.
या कार्याक्रमा दरम्यान श्री मारुती कुलकर्णी यांचा लघुउद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नियुक्तीबद्दल तसेच विनायक गोखले ( lशामला इलेक्ट्रोप्लेटर्स नाशिकचे अध्यक्ष) यांचा औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण संवर्धन व समाजासाठी विशेष प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्काराल उत्तर देताना मारुती कुलकर्णी म्हणाले की पन्नास वर्षांवरील उद्योजकांनी स्वतःला आपल्या व्यवसायातून कार्यामुक्त करून देशसेवेचे कार्य करावे तर विनायाक यांनी आपल्या परीवारातर्फे झालेला सत्कार भविष्यात अधिक जोमाने समाजसेवा करण्यास प्रेरणादाई ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
मिलिंद देशपांडे यांनी लघु उद्योग भारती व स्वावलंबी भारत अभियानाचे कार्य, सध्या चालू असणारे उपक्रम, भविष्यातील वाटचाल याबद्दल माहिती दिली.