गृहिणींकडून शिका उद्योगासाठीच्या कार्यपद्धती


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कुठल्याही कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा एखादा उद्योग उभारण्यात येणार असतो तेव्हा अकाऊंट, ऑपरेशन, मटेरियल्स, क्‍वालिटी इत्यादी क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ लोकांना नेमले जाते. ही मंडळी आपले ज्ञान, अनुभव व बाजारात येत असलेले नवीन तंत्रज्ञान ह्याची सांगड घालून आपल्या टीमला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे संपूर्ण टीम उद्योग यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असते.

छोट्या, लहान उद्योजकांनाही आजकाल बर्‍याच संस्था, सरकार व कंपन्या मार्गदर्शन करतात. छोटे उद्योजकही तज्ज्ञ कन्सल्टंट नेमून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवू शकतात, उद्योग यशस्वी करू शकतात. कन्सल्टंट नेमणे, त्यांची मदत, मार्गदर्शन घेणे काही वेळा, काही गोष्टींसाठी आवश्यकही असते; पण काही गोष्टी अशा असतात की, ज्यासाठी तुमच्या घरातच मोठा कन्सल्टंट उपलब्ध असतो. ती म्हणजे आपली आई किंवा पत्नी.

होय, घरची गृहिणी. त्यांची घर चालवण्याची कार्यपद्धतीच उद्योग यशस्वी करण्यासाठी उपयोगी टिप्स आहेत. आता हे सगळं म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाली. तुमच्या आमच्या घरच्या गृहिणीची कार्यपद्धती बघा म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय ह्याची खात्री पटेल.

1. बाजाराची माहिती (Market Knowledge)

आपण एखाद्या उद्योगाची सुरुवात करतो तेव्हा मार्केट सर्व्हे करूनच करत असतो, पण उद्योग सुरू झाल्यानंतर जेव्हा कुठल्याही गोष्टीची खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा आपण चारचौघांकडे विचारपूस करतो. आजकाल इंटरनेटवर खपवळरचअठढ सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी मूल्य, गुणवत्ता, खात्री ह्या बाबतीत शंका येऊ शकते. तसेच सगळेच जण अशा प्लॅटफॉर्मवर असतील हेही खात्रीने सांगता येत नाही. अशा वेळी आपण इतरांना विचारूनच निवड करत असतो..

गृहिणीकडे बघा, रोजच्या जीवनात लागणार्‍या वस्तू कुठे चांगल्या मिळतील व स्वस्त मिळतात ह्यांची पूर्ण माहिती त्यांना असते. औरंगाबादच्या गुलमंडीपासून शहागंज, मोंढ्यापर्यंतची पूर्ण माहिती त्यांना असते. पुण्यात लक्ष्मीरोड, तुळशी बाग, शुक्रवार पेठ असो की कॅम्प एरिया असो की भोईर गल्ली, गृहिणीला नेमकं कुठं काय घ्यावं हे उत्तम प्रकारे माहिती असतं. एवढेच काय, वर्तमानपत्राच्या रद्दीला कुठे विकल्यास चांगला भाव मिळतो हेही तिला चांगले ठाऊक असते.

कुठल्याही वस्तूंच्या किमतीत कच्च्या मालाचा वाटा साधारणतः 50 टक्के असतो (औषधे, तत्सम वस्तू व इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे वगळता). म्हणून मोठमोठ्या कंपन्यांचे कच्च्या मालाच्या किमतीवर व बाजारावर बारीक लक्ष असते. कच्च्या मालाच्या भावात गिरावट आली किंवा विशिष्ट हंगामात भाव कमी झाले की कंपनी माल स्टॉक करून ठेवते.

आपल्या गृहिणीचे बघा, शेतकर्‍यांची नवीन धान्य काढणीची वेळ आली की, ही गहू, तांदूळ, डाळी वगैरेंची वर्षभराची खरेदी करून पैसा बचत करते. वरील गोष्टींवर मैत्रीण, शेजारीण वगैरेंशी तिची चर्चा आणि संशोधन नेहमीच सुरू असते.

2. मोलभाव करण्याची उत्तम हातोटी

सर्वसाधारणपणे आपण गृहिणीला, हिला काय येतं असे म्हणत गृहीत धरतो. हिला काय समजतं त्यातलं किंवा ही बिनकामाची फारच घासाघीस करते बुवा किंवा ही नको तिथे नको तेवढं ताणते अशी लोकांची सर्वसाधारणपणे धारणा असते (काही अपवाद असू शकतात) पण ही घासाघीस हा एक मॅनेजमेंटचा धडा आहे.

तुम्ही बातम्यांमध्ये पहाता की, डॉलरच्या तुलनेत रुपयाची १ पैसा घसरण. १ पैशाने असा कितीसा फरक पडत असेल? ते आपल्याला सहजासहजी कळणार नाही.

मी ऑटोमोटिव्ह क्षेत्रात काम केले आहे, जिथे रोज हजारो लाखोंच्या संख्येने छोटे-मोठे पार्ट्स विकले जातात. प्रत्येक पार्ट मागे १ पैसा असा हिशेब कराल तेव्हा १-२ पैशांचं किती महत्त्व आहे हे लक्षात येते. २ रुपयांची कोथिंबीर असो की २००० रुपयांची साडी, गृहिणी तेवढीच घासाघीस करते.

3. गृहिणी 5S ची जननी

औद्योगिक विश्वात 5S ह्या संकल्पनेबद्दल फार सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. 5S चा प्रसार जपानी लोकांनी समस्त जगात केला, पण 5S ची जननी ही गृहिणीच असली पाहिजे असे माझे मत आहे आणि 5S च्या पायर्‍या जर आपण पाहिल्या तर निश्चितपणे खात्री पटेल. नको त्या वस्तू/गोष्टी बाजूला करा. आवश्यक वस्तू विनासायास हाताळता येतील अशा प्रकारे ठेवा.

  • प्रत्येक वस्तूसाठी जागा आणि त्याच जागेवर ती वस्तू.
  • स्वच्छता, वस्तू चकचकीत ठेवा.
  • प्रमाण ठरवा.
  • सातत्य राखा.

कुठल्याही गृहिणीला 5S ही कार्यपद्धती माहीत असेल असे वाटत नाही, पण ती आपलं घर, स्वयंपाकघर ह्याच पद्धतीने मेंटेन करते. बरं ही गोष्ट किंवा परंपरा अगदी हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे म्हणून गृहिणीला 5D आई किंवा जननी म्हटलं तर वावगं ठरू नये.

4. उत्पादकता, गुणवत्ता, खर्च, वेळेवर उपलब्धता, सुरक्षा, मनोधैर्य

(Productivity, Quality, Cost, Delivery, Safety, Morale) हा विषय चर्चेला घेतला, तर ह्या विषयावर अख्खा लेख लिहिला जाऊ शकेल. आपण प्रत्येक पॉइंटला थोडा थोडा स्पर्श करून बघू या.

उत्पादकता – Productivity

कंपनीत काम करत असताना १-१ सेकंद महत्त्वाचा असतो, कारण वाया जाणारा प्रत्येक सेकंद म्हणजे पैशांचा अपव्यय असतो. गृहिणीचे स्वयंपाक करताना निरीक्षण करा. तव्यावरील पोळी भाजण्याच्या अगोदर दुसरी पोळी/भाकरी लाटून तयार असते.

स्वयंपाक करत असताना लहान मूल जर मधेमधे करत असेल तर ती रागावते. म्हणते की, बाजूला हो, गॅस जळतो आहे. तुम्ही एखाद्या जपानी कंपनीला भेट दिली तर तुम्हाला लक्षात येईल की, कितीही महत्वाचीर् ींळीळीं असली तरीही 1 सेकंद ही उत्पादन थांबवत नाहीत.

गुणवत्ता – Quality

गृहिणीचा Quality Test पहायचा असेल तर कुठलीही खरेदी करताना निरीक्षण करा. स्वयंपाक करत असताना पहा. पोळी / भाकरी गोल गरगरीतच होणार. भाजी व इतर पदार्थांच्या चवीत अजिबात फरक असणार नाही. पूर्ण समरसता.

खर्चावर नियंत्रण – Cost

गृहिणीला बजेट बनवायला कोणी शिकवले असेल? मला तर वाटत नाही की, कुणी शिकवले असेल; पण ती परफेक्ट महिन्याचे महिन्याला बजेट बनवते. आवश्यक व अनावश्यक गोष्टींची प्राथमिकता ठरवते आणि बरोबर त्यानुसारच खर्च करते. खर्चावर नुसते नियंत्रणच ठेवत नाही तर बचतही करते.

गोष्टीची वेळेवर उपलब्धता – Delivery

उद्योगात माल/ सेवा याच्या वेळेवर उपलब्धतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्याच्याही पुढे जाऊन गखढ ही संकल्पना जगापुढे आली आणि ती मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. आपल्या गृहिणीला गखढ बद्दल किती माहिती असेल?

शक्यता शून्य टक्के; पण मुलांची शाळा सकाळी 7 वाजता असते. नवरा ऑफिसला 8 वाजता निघतो. ह्या दोघांचेही कपडे, बूट, बॅग सगळे तयार असते आणि नाष्टा टेबलावर लावलेला असतो. नाष्टा होईस्तोवर टिफिनही पॅक करून तयार असते.

मुलं, नवरा व इतर सदस्यही कामावरून जेव्हा घरी परत येतात, तेव्हादेखील चहापासून सगळ्या गोष्टी अचूक वेळेवर हजर असतात. घरातल्या ज्येष्ठ लोकांची औषधे असो की फिरायला जाण्यासाठी लागणारी काठी… सगळे कसे Perfect!!

माधुरी दीक्षितचा ‘बकेट लिस्ट’ हा मराठी सिनेमा पहा म्हणजे माझे म्हणणे पटेल..

ग्राहकसंतुष्टी – Satisfaction

काही दिवसांपूर्वी उद्योगजगतात उद्योजकाचे समाधान (Entrepreneur Satisfaction) हा शब्द प्रचलित होता; पण काळ बदलला आहे, ग्राहक टिकवायचा व वाढवायचा असेल तर आज ग्राहकसंतुष्टी (Customer Satisfaction) ही कळीची बाब झालेली आहे.

गुणवत्ता आणि वेळेवर उपलब्धता ह्यांचा ग्राहकांच्या संतुष्टीशी, सुखावण्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. इतर अनेक गुणांबरोबरच गृहिणीच्या वरील दोन्ही गुणांमुळे तिची मुलं, पती, घरातील ज्येष्ठ, नातेवाईक वगैरे बरोबर असलेली नात्याची वीण जास्त घट्ट होते.

सुरक्षितता – Safety

उद्योगात मार्च महिन्यात सुरक्षा सप्ताह पाळला जातो. अपघात पूर्वसूचना देऊन होत नसतो म्हणून खरं तर सुरक्षा हा र्शींशीू ोाशपीं र्लीीळपशीी आहे. गृहिणी गॅसपासून गिझरपर्यंत प्रत्येक गोष्टीत काळजी घेत असते.

मनोबल वाढवणे – Morale

‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक सशक्त महिला उभी असते’ हे वाक्य खरे तर पुरेसे आहे. शेजारच्या कुलकर्णींनी कार घेतली म्हणण्याच्या मागे आपणही मेहनत करू, अशा प्रकारचं प्रोत्साहन असते.

ती मुलांना चांगले मार्क मिळवा, असे म्हणताना कधी कधी शेजारच्या ‘ढ’ बंड्याचेही गुणगान करून मुलाला निकोप स्पर्धा करायला प्रोत्साहन देते.. वडील मुलांवर भविष्याचे ओझे टाकत असतात; पण आई ओझं कसं पेलायचे हेही सांगते. ह्यावर मला एका कन्सल्टंटने सांगितलेली गोष्ट आठवली. विषयाच्या अनुषंगाने ती शेअर करतो.

जपानी लोकांना Fishing फार आवडते. मासेमारी हा एक चांगला उद्योग. लोक लांब समुद्रात जाऊन मासे पकडतात आणि विक्री केली जाते. लांबच्या प्रवासामुळे माशांना एक विशिष्ट वास येतो अशी ग्राहक तक्रारी करतात म्हणून मासेमारांनी जहाजावर मोठा हौद उभा केला. मासे डेकवर उघड्यावर टाकण्याऐवजी हौदातल्या पाण्यात टाकू लागले, जेणेकरून मासे जिवंत राहावेत.

हा प्रयोगपण म्हणावा तेवढा यशस्वी झाला नाही. तरीदेखील शिळेपणाचा वास येतो अशी तक्रार येऊ लागली. जपानीच ते, मग त्यांनी एक काईझेन केले. हौदात छोटे छोटे शार्क माशाची 4-5 पिल्ले सोडली. ही पिल्ले माशाला खाऊ शकत नव्हती. ती माशांच्या मागे धावत, त्यामुळे मासे नेहमी इकडून तिकडे पळत. नेहमी प्रवाही असत. अशा प्रकारे ग्राहकांना ताजे मासे मिळू लागले.

गृहिणीचे संसारातले स्थान त्या शार्कच्या पिलासारखं आहे जे तुम्हाला नेहमी प्रवाही, प्रयत्नशील ठेवते. त्या गोष्टीला किरकिर न समजता motivating समजून धीराने घेतले तर फायदा होईल.

५. उत्कृष्ट स्टोअर मॅनेजर (Best Store Manager)

मी माझ्या स्टोअर मॅनेजरला नेहमी हेच सांगत असे की, तुझं स्टोअर उत्कृष्ट मी तेव्हाच म्हणेन जेव्हा Maximum Minimum Stock नेहमी मेन्टेन असेल. कुठलीही वस्तू शोधायला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. अचल गोष्टींचे प्रमाण शून्य असेल.

स्टोअर्समध्ये आणखी एक चांगली system वापरली जाते. तिला जपानी भाषेत Kaizen असे म्हणतात. ह्यात साधारणतः फास्ट मुव्हिंग स्टॉकचे लगेच पुनर्भरण केले जाते. Demand and Supply चा चांगला ताळमेळ राखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.

गृहिणीची कार्यपद्धती बघा, घर बघा. वरील अगदी सर्व गोष्टी तंतोतंत जुळतील.

6. Reduce – Reuse – Recycle

हा शब्द आता आपल्या सर्वांच्या एवढा अंगवळणी पडला आहे की, मराठीतला शब्द देण्याची मला तरी गरज वाटत नाही. इंडस्ट्रीत हा शब्द खर्‍या अर्थाने गेल्या काही वर्षांपासून बोलला जात आहे; परंतु आमची गृहिणी हजारो वर्षांपासून हे करते.

Reduce चे उत्तम उदाहरण म्हणजे कमी तेलाची किंवा बिगरतेलाच्या भाज्या, पदार्थ. उरलेले शिळे अन्न कधीच वाया जाऊ दिले जात नाही. त्याच्या वेगवेगळ्या डिशेस बनवून संपवले जाते. कपडे अल्टर करून वापरले जातात. काही गृहिणी जुन्या साड्यांचे सुंदर फॅशनेबल पंजाबी ड्रेस शिवून वापरतात.

खेड्यात गृहिणी जुने कपडे, साड्या वगैरेंपासून उबदार गोधडी शिवतात, वापरतात. इतकेच नव्हे तर काही शेकडो रुपयांत विकल्या जातात. खेड्यात घरातील प्रत्येक गोष्ट Reuse व Recycle होत असे. कचर्‍याचे सेंद्रिय खत तयार करून वापरण्यात येत असे.

शहरातील घराघरांत, कॉलनीज्मध्ये आज गृहिणी कचर्‍यापासून सेंद्रिय खत व मिथेन गॅस तयार करत आहेत. अशी बरीचशी उदाहरणे देता येतील.

7. नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा

उद्योगजगतात ट्रेनिंग ही फार आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट झाली आहे. कंपनी मॅनेजमेंट ही लोकांना नवीन नवीन विषयावर ट्रेनिंग देत असते.

गृहिणी फावल्या वेळेत कुकिंग क्लासेस करेल. आजकाल टीव्हीवर छतपर बागवानीसारखे कार्यक्रम पाहून कित्येक गृहिणी कुटुंबाला पुरतील एवढा सेंद्रिय भाजीपाला आपल्या गच्चीवर पिकवत आहेत.

दक्षिण भारतात पालक आपल्या मुलींना आवर्जून भरतनाट्यम शिकायला पाठवतात.

प्रत्येक पॉइंट्सवर अनेक छोटी छोटी उदाहरणे देता येतील जी विस्तारून ज्याचे एक छोटेखानी पुस्तक होऊ शकेल.

– शरणप्पा नागठाणे 
7028963255

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?