Sales Presentation दरम्यान या पाच गोष्टी आवर्जून टाळाव्यात


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


१) सुरुवातीपासूनच ग्राहकांच्या गरजा समजून ना घेता आपल्या प्रॉडक्टच्या विशेषतेबद्दल सांगू नका. ग्राहकाला प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न करू नका. ग्राहकाला बोलू द्या. त्याच्या अडचणी व असमाधान समजून घ्या. (learn what should avoid during sales presentation)

२) ग्राहकाकडे वेळ कमी असेल तर कमी वेळेत मीटिंग आटोपण्याच्या नादात घाई करू नका. पुरेसा वेळ असेल तेव्हाच ग्राहकाला भेटा. ग्राहक पुरेसा वेळ देत नसेल याचा अर्थ तो त्या बाबतीत तितका गंभीर नाही.

३) सेल्स कॉल चांगला झाला असेल तर ग्राहकाकडून प्रॉडक्ट खरेदीबद्दल निश्चित आश्वासनाशिवाय मीटिंग संपवू नका. ऑर्डर, अ‍ॅडव्हान्स चेक, कॅश किंवा कोणत्याही प्रकारची कमिटमेंट घेऊन मगच मीटिंग संपवा.

४) ग्राहकाच्या आक्षेपांना घाबरू नका किंवा त्यांचा नकार समजू नका. ग्राहक प्रॉडक्टबद्दल आक्षेप तेव्हाच घेतो, जेव्हा त्याला प्रॉडक्टबद्दल आणखी माहिती हवी असते. शांतपणे आणि आत्मविश्वासाने ग्राहकांच्या आक्षेपांना सामोरे जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

५) उगाचच ग्राहक मिळवण्यासाठी प्रॉडक्टची किंमत कमी करू नका. ग्राहक किंमत कमी करण्यासाठी निगोशिएट करतो. अशा वेळी त्याचा मान ठेवणे गरजेचे आहे, परंतु आपल्या प्रॉडक्टची किंमत कमी करून तसे केलेत तर आपल्या ग्राहकाला त्याची सवय लागते.

– अतुल राजोळी

error: Content is protected !!
Scroll to Top