स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
१) ‘उबर’ या जगतील सर्वात मोठी टॅक्सी पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही.
२) ‘फेसबुक’ ही जगातील सर्वात मोठी व लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी स्वतः कसलेही लिखाण करत नाही.
३) ’अलिबाबा’ या जगातील सर्वात मोठी विक्री कराणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुद्धा स्टॉकमधे नसतो.
४) ’एअरबन’ या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीचे स्वतःचे एकसुद्धा घर नाही.
५) ’एपल’ या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही.
६) ’व्हॉट्सएप’ या दिवसातुन ३० लाखांपेक्षा जास्त संदेशांची देवाण घेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हरसुद्धा नाही.
७) ’नाइकी’ या जागातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीची कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
या कंपन्यांना हे कसे जमले? कारण बिझनेस करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत. लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधून काढा, ‘आऊटसोर्सींग व ऑफशोअरींग’सारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीजना आपल्या पंखाखाली एकत्र करा.
मार्केटींगवर जास्तीत जास्त भर द्या, ग्राहकाला उत्तम सेवा द्या, अत्यंत प्रामाणीक व पारदर्शी व्यवहार ठेवा, आपल्याबरोबरच आपल्याबरोबर काम करणाऱ्या एजन्सीजचापण विकास करा, ग्लोबल मार्केटमधे शिरा हे आत्ताच्या बिझनेसचे फंडे आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे मुळ तत्त्व आहे. आता मराठी लोकांनी बिझनेसचे हे नवीन तंत्र शिकून घ्यायला हवे.
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.