आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यान्पिढ्या जपलेले कौशल्य लुप्त व्हायला लागले. चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारूपाला आला आहे. मात्र एके काळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे.
चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. म्हणूनच सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या पद्मजा यांनी आयटीमधील नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू केले आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याच्या संघर्षकथा या वेगळ्या, पण शून्यातून विश्व निर्माण करणार्या रणरागिणीची कथा सांगण्याचा योग आला. हिरकणीच्या भूमिकेत असलेल्या पद्मजा आज आपले सांसारिक जीवन सांभाळून आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टींकडेपण बारीक लक्ष देतात. माणसाचे जीवन क्षणभंगुर असे मानणार्या पद्मजा मानवी जीवनाचा आपण किती चांगल्या प्रकारे पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतो याबद्दल सांगताना बोलतात.
“मी शक्य आहे तेवढ्या संधींचा सामना केला, निगेटिव्ह गोष्टींना बाजूला सारून जीवनात उंच भरारी घेण्याची जिद्द ठेवली आणि मी प्रत्येक निर्णय यशासारखे माझ्या पदरात पाडत गेले.”
पाहिजे तिथे अचूक निर्णय, रिस्क घेणे हेच प्रत्येक उदयोगामागचे गणित असते, असे पद्मजा सांगतात.
शालेय जीवनापासून पद्मजा या खूप अॅक्टिव्ह होत्या. ऑल राऊंडर असलेल्या पद्मजा यांचे चित्रकला, लिखाण, गायन या क्षेत्रांतही अनेक पारितोषिके जिंकून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पद्मजा सांगतात त्यांची लिखाण आणि क्रीडा या क्षेत्रांत विशेष रुची आहे.
नॅशनल लेव्हलवर क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी पद्मजा त्यांच्या घराण्यातील एकमेव पहिली मुलगी आहे. टग-ऑफ -वॉर स्पर्धेमध्ये नॅशनल चॅम्पियन असलेल्या पद्मजा हॉकी आणि कबड्डीसारख्या खेळातसुद्धा स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेव्हल चॅम्पियन आहेत.
जेव्हा पद्मजाची भेट झाली, गप्पा झाल्या, तिचा प्रवास प्रत्यक्ष तिच्या तोंडून ऐकला; तिच्याबद्दल आदर वाढला. तिचा हा प्रवास आपल्या वाचकांसाठी येथे मांडत आहे.
जिल्हास्तरीय आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार, महाबिझनेस अॅवॉर्ड, युवा उद्योजक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी विभूषित अशा महिला उद्योजिकेची मुलाखत घेण्याचा योग आला.
एक तरुण उद्योजिका फक्त दोन-तीन वर्षांच्या आपल्या उद्योजकीय कारकीर्दीत एवढी देदीप्यमान कामगिरी करते तेव्हा तिच्याबद्दल मनात कौतुक तर होतंच, पण मनात एक प्रश्न होता की, हिने हे यश स्वतःच्या कर्तृत्वावर कसे संपादित केलं असेल? बिसनेसमधल्या आव्हांनाचा एवढ्या कमी वयात कसा सामना केला असेल, उच्चशिक्षित आय.टी. इंजिनिअरिंग शिकलेल्या पद्मजा लेदर इंडस्ट्रीमध्ये काय करताय? असे अनेक प्रश्न विचारताना खूप मजा आली.
पद्मजा राजगुरू ही आपले बालपणातील शिक्षण परभणीसारख्या दुष्काळी भागात काढलेल्या व शैक्षणिक वारसा लाभलेल्या घरात जन्माला आलेली तरुणी. स्वतंत्र विचार आणि लढवय्या वृत्ती असलेली तरुण उद्योजिका. त्यांची हीच वृत्ती हे तिच्या यशाचे गमक आहे.
श्रीमंत मुलांशी लग्नाची स्थळे नाकारून पद्मजा यांनी त्यांना समजून घेणार्या व लग्नानंतर स्वतःच्या स्वप्नाशी तडजोड करणार नाही अशी अट मान्य करणार्या मुलाशी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्या मिस्टरांसोबत त्या मुंबईला आल्या. जणू काही मुंबई नगरी त्यांची वाट पाहत होती.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
मुंबईत त्यांचं हक्काचं असं कोणी नव्हतं, पण हे शहर कोणालाच पोरकं करत नाही, असं म्हणतात. याच उक्तीप्रमाणे मुंबई शहराने या दोघांना आसरा दिला. मराठमोळ्या डोंबिवलीजवळ त्यांनी भाड्याने एक खोली घेतली आणि त्यात आपलं घरकुल थाटलं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शहरात येऊन स्वतःची नवीन ओळख निर्माण करायला आलेलं हे नवदाम्पत्य.
नवीन शहरात दोघांनाही सगळंच नवं होतं. प्रसंगी वडापाव खाऊन दिवस काढावे लागले, तरीही दोघांमध्ये प्रचंड जिद्द होती. परस्परातील प्रेम आणि पुढे जाण्याची जिद्द या दोन गोष्टीच त्यांची खरी शक्तिस्थानं होती.
आय.टी. क्षेत्रात उच्चशिक्षित असूनही काम करून समाधान मिळत नव्हते. नवीन काही तरी करण्याची इच्छा असतानाच एकदा कॅप्टन अमोल यादव यांचे व्याख्यान ऐकले. देशी बनावटीचे विमान तयार करण्याची यादव यांची कहाणी पद्माजा यांना प्रेरणा देऊन गेली. या प्रेरणेतूनच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरवले.
मात्र कुठलाही व्यवसाय करायचा असल्यास त्याचे तंत्र अवगत करणे गरजेचे असते. त्यामुळेच त्यांनी मुंबई फॅशन अॅकॅडमीमधून बॅग आणि शू डिझायनिंगचा २ वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. त्याचबरोबर औरंगाबाद येथून उद्योजक विकासाचे प्रशिक्षण घेतले. स्वतःला अद्ययावत केलं.
सुशिक्षित असल्यामुळे जगभरात या क्षेत्रात काय ट्रेंड्स सुरू आहेत याचा अभ्यास केला. रेल्वेत फिरल्या, लोकांशी बोलल्या, नुसत्या चामड्याच्या वस्तू म्हणून नाही, तर एकूणच लोकांच्या गरजा काय आहेत याचा अभ्यास केला.
तरुण, महिला, कर्मचारी, उद्योजक सर्व घटकांच्या गरजांचा अभ्यास केला, या काळात धारावीमध्ये चामडे उद्योगाचा अभ्यास करता यावा म्हणून बाळासाहेब वर्पे यांच्याकडे कामगार म्हणून कामही स्वीकारले, चामडे उद्योगातील बारीकातील बारीक गोष्टी स्वखुशीने वर्पे यांनी शिकविल्याबद्दल मी नेहमीच त्यांची आभारी असेल असे पद्मजा सांगतात.
त्यानंतर मग प्रत्यक्ष २०१७ पासून व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करतानाच दोन वर्षे बाजारपेठेचा अभ्यास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमधून एक्झिबिटर म्हणून काम केले. आयटी क्षेत्रामधून लेदर इंडस्ट्रीचा कसा विचार केलात? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या बोलतात; आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यान्पिढ्या जपलेले कौशल्य लुप्त व्हायला लागले.
चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारूपाला आला आहे. मात्र एके काळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे.
चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. म्हणूनच सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या पद्मजा यांनी आयटीमधील नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू केले आहे.
तिने ‘के. पी. इंडस्ट्रीज’ नावाने स्वतःच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. एक महिला उद्योजक म्हणून स्वतःच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. इथून त्यांची खरी परीक्षा सुरू झाली. त्यांनी ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास केला होताच, त्याप्रमाणे अत्याधुनिक आणिर् ीपर्र्ळिींश अशी चामड्याची उत्पादने तयार केली.
उदाहरणार्थ, तरुणांसाठी अशा कॉलेज बॅग तयार केल्या, ज्यात मोबाइल चार्जिंगची सुविधा असेल. सुरुवातीलाच स्वतः उत्पादन करण्याची क्षमता नव्हती, म्हणून धारावी येथून तिथल्या कामगारांना आपल्याला हवं आहे त्या प्रॉडक्टचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून माल बनवून घेऊ लागल्या.
पद्मजा यांनी तयार केलेली युनिक प्रॉडक्ट्स विकण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. डिजिटल मार्केटिंगमध्ये त्या एक्स्पर्ट आहेत, या ज्ञानाचा त्यांना स्वतःच्या प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपयोग झाला. गूगल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून त्यांना ऑर्डर्स येतात. तिची प्रॉडक्ट्स वेगळी असल्यामुळे कॉर्पोरेटमधूनही तिला ऑर्डर्स येऊ लागल्या आहेत.
अवघ्या १० हजारांचे भांडवल वापरून सुरू केलेला ‘द ऑरा’ या ब्रँडच्या माध्यमातून पद्मजा आज लाखोंचा लेदर व्यवसाय करत आहेत.
हे सर्व करताना तुला महाराष्ट्र शासनाची काही मदत भेटली का? तेंव्हा पद्मजा यांनी महाराष्ट्र शासन महिलांनी उद्योजकीय क्षेत्राकडे वळावं यासाठी खूप प्रयत्नशील आहे.
चर्मकार समाजासाठी असलेल्या लिडकॉम (संत रोहिदास महामंडळ) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे आणि त्यांच्या सहकार्यांनी संघर्षाच्या काळात खूप मोलाची साथ दिली.
उद्योजकांना काय सहकार्य करता यावे यासाठी प्रचंड पॉझिटिव्ह अप्रोच असलेले अधिकारी राजेश ढाबरे यांच्या रूपात मी पहिल्यांदाच पाहिले असल्याचे पद्मजा सांगतात. तसेच उद्योग विभागाचे सचिव आयएएस डॉ. हर्षदीप कांबळे यांनी लेदर बिझनेससाठी प्रोत्साहित केले व योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्यामुळेच माझा पुढचा प्रवास सोपा झाल्याचे पद्मजा सांगतात.
अवघ्या दोन वर्षांत पद्मजाने मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगं आहे. यामुळेच इतक्या लहान काळात युवा उद्योजक आणि महिला उद्योजकतेचे पुरस्कार तिने पटकावले आहेत. आता लोक त्यांनाही तर ‘लेदरची क्वीन’ म्हणून कौतुकाने संबोधत आहेत.
ता पुढच्या टप्प्यात ती स्वतःचा ‘द ऑरा’ नावाने ब्रॅण्ड प्रस्थापित करत आहे आणि स्वतःचे वर्कशॉप सुरू करण्याच्या दृष्टीनेही तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला चर्मोद्योग क्षेत्रात एक यशस्वी मराठी उद्योजिका पाहायला मिळेल.
संपर्क : पद्मजा राजगुरू
8657203358
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.