Advertisement
बिझनेस लिजेंड्स

स्वतःच्या घराचं इंटेरियर करताना आलेल्या अडचणींतून सापडली स्टार्टअप आयडिया

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


महानगरांमध्ये राहणारे बहुतेक जण इंटेरियरसाठी कंत्राटदारांवर अवलंबून असतात आणि ते सांगतील त्या दरात थोडेसे पैसे कमी करून त्यांना काम देतात, पण इथेच अडचणींना खरी सुरुवात होते. कंत्राटदाराकडे एकच काम नसतं, त्यामुळे तो थोडं इथे, थोडं तिथे असं काम करत असतो.

काम पंधरा दिवसांत होईल असं तो म्हणतो खरा, पण ते संपायला मात्र एक महिनादेखील लागू शकतो. त्यांना स्वतःच्या घराचं इंटेरियर करायचं होतं, पण त्यात अनंत अडचणी आल्या आणि शेवटी त्यांच्या मनासारखं काम झालंच नाही. त्यांच्याकडे डिझाईनचा कोणताही अनुभव किंवा शिक्षण नव्हतं.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

त्यामुळे आज काय चांगला सुतार मिळत नाही, उद्यां काय कढिया फोनच उचलत नाही. किचनमध्ये कोणत्या टाईल्स लावाव्यात किंवा फाॅल्स सिलिंगमध्ये कोणते नवीन डिझाईन उपलब्ध आहेत, असे अनेक प्रश्न होते, पण त्याचं उत्तर मात्र सहज मिळत नव्हतं.

‘लिव्हस्पेस’च्या संस्थापकांसाठी ही अक्षरशः आयती चालून आलेली संधी होती. मध्यमवर्गीय असोत किंवा उच्चभ्रु, समस्यांना तोंड तर दोघांनाही द्यावं लागतं. ‘लिव्हस्पेस’ने आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट डिझायनर्सपेक्षा वेगळे डिझाईन्स, तेदेखील परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले.

‘लिव्हस्पेस’ हे स्टार्टअप व्हर्च्युअल स्पेससारखे काम करते. सीईओ आणि सहसंस्थापक अनुज श्रीवास्तव, सिंगापूरमधून काम बघतात आणि सीओओ आणि सहसंस्थापक रमाकांत शर्मा बेंगळुरूमधून व्यवसाय सांभाळतात. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून कामाचे व्यवस्थापन सुयोग्यरितीने करतात.

दोन्हीकडे त्यांच्या बोर्डरूम्स आहेत आणि अंमलबजावणीची रणनीती तयार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहेत. अनुज श्रीवास्तव यांनी आयआयटी कानपूरमधून बॅचलर पदवी पूर्ण केली आणि लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. त्यांनी गुगलमध्ये ई-कॉमर्स टीमसाठी उत्पादन आणि विक्री प्रमुख म्हणून काम केले आहे.

रमाकांत शर्मा यांनी आयआयटी कानपूरमधून पदवी प्राप्त केली आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबादमधून एमबीए केले. ते कोअर टीम मेंबर आणि मायंत्रा येथील इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष होते.

“महानगरांमध्ये राहणारे लोक पारंपरिक पद्धतीने काम करून घेतात आणि म्हणूनच ते सुतार, मजूर आणि कंत्राटदार यांच्यावर अवलंबून असतात”, रमाकांत शर्मा म्हणतात. आम्ही या सगळ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणलं आहे.”

हे सर्व घडवून आणण्यासाठी लिव्हस्पेसकडे ५०० विक्रेते आणि ३ हजार डिझाइनर आहेत. सध्या त्यांनी ग्राहकांना त्यांची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ‘हेटिच’ आणि ‘अर्बन लॅडर’सारख्या स्टार्टअप्ससोबत भागीदारी केली आहे. आज ‘लिव्हस्पेस’च्या कमाईत केवळ मॉड्यूलर आणि वॉर्डरोब लाइनचा वाटा ४५ टक्के आहे.

एक प्रकारे‌ ‘लिव्हस्पेस’ने ग्राहक, डिझायनर, विक्रेते यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवला आहे आणि त्यांना एकत्र आणले आहे. “त्यांना स्थिर व्यवसाय मिळत आहे, ते त्यांचे मार्जिन गमावत नाहीत, आणि खेळत्या भांडवलाच्या योजनांविषयी अधिक चांगला अंदाज लावू शकतात.

डिझाइनर्सना प्रत्यक्षात तंत्रज्ञानाचे सर्व फायदे मिळत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खरेदीदार शोधण्याची गरज लागत नाही”, सहसंस्थापक अनुज श्रीवास्तव स्पष्ट करतात. बेसमेर, टीपीजी ग्रोथ, गोल्डमन सॅक्स, जंगल व्हेंचर्स आणि हेलिऑनसारख्या चांगल्या गुंतवणूकदारांमुळे लिव्हस्पेसला फंडिंगची काळजी नाही.

“आम्हाला अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांसोबत काम करायला आवडते, जे दीर्घकालीन संबंधांवर विश्वास ठेवतात”, रमाकांत शर्मा सांगतात. परंतु शर्मा यांनी आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कठीण भाग अधोरेखित केला आहे.

“यश प्राप्त करण्याची रेसिपी आणि त्यासाठी लागणारे साहित्य शोधणे हे सर्वात कठीण काम आहे. आमच्या मनांत काहीतरी आलं आणि ते सहजपणे प्रत्यक्षात उतरलं असं झालं नाही. आम्ही सतत प्रयोग करत राहिलो, नव्या कल्पनांचा शोध घेत राहिलो आणि त्या प्रत्यक्षात उतरतात का हे पाहत राहिलो.

आज आम्ही थोड्या फार प्रमाणात यशस्वी झालो आहोत असं वाटतं. पण आम्ही इथेच थांबणार नाही. आमच्या काही भविष्यकालीन योजना आहेत आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

– चंद्रशेखर मराठे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!