LLP, OPC व Private Limited Company या नोंदणी प्रकारांची ओळख


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


या आधीच्या लेखात आपण Sole Proprietorship आणि Partnership याबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण Limited Liability Partnership (LLP), One Person Company (OPC) आणि Private Limited Company याबद्दल माहिती घेऊ.

अधिक वाचा : व्यवसाय सुरू करण्याच्या दोन सोप्या पद्धती सोल प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप

Limited Liability Partnership (LLP)

१. LLP हे partnership firm आणि private limited कंपनीचे मिश्रण आहे.

२. LLP ही स्वतंत्र legal entity आहे, जिची नोंदणी Ministry of Corporate Affairs च्या अंतर्गत Limited Liability Partnership Act, २००८ मध्ये होते.

३. LLP सुरू करायला कमीतकमी दोन लोकांची गरज असते. यांना Designated पार्टनर्स म्हणतात. यापैकी एका Designated पार्टनरचे नागरिकत्व भारतीय असावे. दोनपेक्षा कितीही जास्त पार्टनर्स असू शकतात, किंबहुना याला मर्यादा नाही.

४. LLP च्या नावाची मान्यता ही Register of Companies (ROC ) कडून मिळणे बंधनकारक असते. नावाच्या शेवटी – ‘Limited Liability Partnership’ किंवा ‘LLP’ हे शब्द वापरावे लागतात.

५. Private Limited कंपनी एवढ्या Compliance LLP ला नसतात. तसेच पार्टनरशिपमध्ये जी अमर्यादित liability पार्टनरवर येते, तीही नाही.

६. ज्या LLP चे वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपयांहून अधिक असेल किंवा त्याचे भांडवल २५ लाख रुपयांहून अधिक असेल, त्यांच्यासाठी त्या वर्षी audit करणे बंधनकारक आहे.

७. इनकम टॅक्स रिटर्न हा LLP साठी भरायचा असतो. ३०% टॅक्स आणि लागू असलेले surcharge व आरोग्य आणि शिक्षण अधिभार हे साधारणपणे भरायचे असतात.

८. LLP मध्ये प्रत्यक्ष पार्टनरची liability ही त्याच्या कॅपिटल काँट्रीब्युशन पुरतीच असते. याला अपवाद म्हणजे liability जी त्या पार्टनरच्या बेकायदेशीर कृत्यामुळे किंवा फसवणुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे झाली असतील, त्याला तो पार्टनर जबाबदार असतो. कुठलाही एक पार्टनर दुसऱ्याच्या बेकायदेशीर कृत्यामुळे किंवा फसवणुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे झालेल्या liabilities ना जबाबदार नसतो.

One Person Company (OPC)

१. One person Company (OPC) ही स्वतंत्र legal entity आहे जिची नोंदणी Ministry of Corporate Affairs च्या अंतर्गत Companies Act, २०१३ च्या मध्ये होते.

२. OPC सुरू करण्यासाठी दोन व्यक्ती लागतात. एक व्यक्ती असते Director. Director स्वतः एकटा भागधारकही (शेअरहोल्डर) असतो. दुसरी व्यक्ती Nominee असते. डायरेक्टर आणि नॉमिनी हे भारतीय नागरिक असावे लागतात.

३. डायरेक्टर आणि OPC या दोन वेगवेगळ्या entities मानल्या जातात.

४. OPC च्या नावाची मान्यता ही Register of Companies (ROC) कडून बंधनकारक असते. नावाच्या शेवटी – ‘One Person company’ किंवा ‘OPC’ हे शब्द वापरायचे असतात.

५. इनकम टॅक्स रिटर्न हा Private Limited company प्रमाणे OPC साठी भरायचा असतो. ३० टक्के टॅक्स आणि लागू असलेले surcharge व आरोग्य आणि शिक्षण अधिभार हे साधारणपणे भरायचे असतात. बाकीच्या कायदेशीर तरतुदी उदाहरणार्थ DDT, MAT इत्यादीपण लागू होतात.

६. प्रत्येक वर्षी OPC ने Annual Accounts आणि Annual रिटर्न – Registrar of Companies कडे file करायचे असतात.

७. जर OPC चे वार्षिक उत्पन्न २ कोटी रुपयांहून अधिक असेल व भांडवल ५० लाख रुपयांहून अधिक असेल, तर त्याचे कायद्याने private limited कंपनीमध्ये रूपांतर करायचे असते.

Private Limited company

१. Private Limited Company ही स्वतंत्र legal entity आहे, जिची नोंदणी Ministry of Corporate Affairs च्या अंतर्गत Companies Act, २०१३ च्या मध्ये होते.

२. Private limited company चा फायदा असा असतो की त्यांना Share Capital च्या स्वरूपात निधी जमा करतो येतो. तसाच कर्मचारी वर्गाला ESOPs पण देता येतात.

३. आतापर्यंत जी काही व्यवसायाची स्वरूपे बघितली, त्यात Private Limited कंपनीला सर्वात जास्त compliance आहेत. उदाहरणार्थ बोर्ड मिटींग्स आणि त्यांची मिनिट्स, ऑडिट, विविध रिटर्न्स, इत्यादी. होतकरू उद्योजकाला कदाचित या compliance चे पालन करणं कठीण जाऊ शकतं.

४. Private limited Company च्या नावाची मान्यता ही Register of Companies (ROC) कडून बंधनकारक असते. नावाच्या शेवटी – ‘Private limited Company’ हे शब्द वापरायचे असतात.

५. Private Limited कंपनी सुरू करायला दोन भागधारक (shareholders) व दोन संचालक (Directors) लागतात. Pvt ltd कंपनी जास्तीत जास्त २०० भागधारक आणि १५ संचालक ठेवू शकते.

६. इनकम टॅक्स रिटर्न हा Private Limited company साठी भरावा लागतो. ३० टक्के टॅक्स आणि लागू असलेले surcharge व आरोग्य आणि शिक्षण अधिभार हे साधारणपणे भरायचे असतात. Assessment year 2020-21 आणि 2021-22 साठी आधीच्या विशिष्ट वर्षासाठी turnover किंवा gross receipts प्रमाणे दर वेगळे आहेत. बाकीच्या कायदेशीर तरतुदी उदाहरणार्थ DDT, MAT इत्यादीपण लागू होतात.

७. Private Limited कंपनीचे अस्तित्व हे Directors किंवा Shareholders वर अवलंबून नसते.

८. शेअर्स ट्रान्सफर होऊ शकतात.

९. Shareholders यांची त्यांच्या share Capital एवढीच मर्यादित liability असते.

आपल्या बजेटनुसार, risk taking capacity नुसार, स्वभावानुसार, compliance पाळण्यासाठी असलेली तयारी, नेमके व्यवसायाचे स्वरूप, सुरू करण्यासाठी वेळ, पैसे आणि documentation अशा काही पैलूंवर होतकरू उद्योजकांनी हवा तेवढा वेळ आणि विचार करावा आणि मगच आपला व्यवसाय सुरू करावा.

सीए. जयदीप बर्वे
9820588298
cajaideepbarve@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?