तुमच्या व्यवसायाच्या पत्त्याचा पत्ता म्हणजे तुमचा लोगो. तुमच्या व्यवसायाची पहिली ओळख असेही याला म्हणता येईल. याला किती महत्त्व द्यायचे? तर खूपच. तुम्ही बाजारात गेलात आणि तेथे तीन प्रकारच्या तीन वस्तू पाहिल्यात.
सर्वांचे फायदे-तोटे जवळ जवळ सारखेच; परंतु किमतीमध्ये मात्र बराच फरक. असे का बरे असते? कारण जी वस्तू ब्रँडेड असते त्याची किंमत नेहमीच जास्त असते. ब्रँड म्हणजेच लोकांचा त्या उद्योजकांवरचा विश्वास आणि या विश्वासाची सुरुवात होते ती लोगोपासून.
तुम्ही बघाल तर सध्या मोठ्या मोठ्या उद्योगांनी आपापले लोगोस बदलले आहेत. बदलत्या परिस्थितीत बदलते ग्राहक आणि त्यांना आकृष्ट करण्यासाठी त्या प्रकारचे बदल आपआपल्या लोगोतून प्रसारित व्हावेत यासाठी हा सगळा खटाटोप. उद्योग ज्योतिषाच्या दृष्टीने हा लोगो कसा असावा याबद्दल आपण या लेखात ऊहापोह करू या.
लोगोचे सर्वसाधारणपणे पाच भाग पडतात.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
- पार्श्वभूमी
- आकार
- रंग
- ठेवण
- वृत्ती (Nature)
उदाहरणार्थ मर्सीडीज बेंझ या उद्योगाचा जर लोगो बघितला तर आपल्याला दिसते ते असे.
- पार्श्वभूमी – नाही
- आकार – गोलाकार
- रंग – चांदीसारखा
- ठेवण – आंतरिक समाविष्ट
- वृत्ती (Nature) – भक्कम पण गतिमान
म्हणजेच या उद्योगाला आपल्या इतिहासाबद्दल फारसे काही सांगावयाचे नाही, परंतु आपले उत्पादन उत्कृष्ट दर्जाचे असून भक्कम, पण गतिमान असे आहे असा अर्थ यातून दिसून येतो. जे करू ते उत्तमच करू, अशा प्रकारचा आत्मविश्वास यातून दिसून येतो.
आता दुसरा एक उद्योग बघू या. अॅमेझॉन हा उद्योग इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या वस्तूंचा व्यापार करतो.
- पार्श्वभूमी – काळी
- आकार – फक्त शब्द
- रंग – पांढरा / पिवळा
- ठेवण – सर्व बाजूंनी उघडा
- वृत्ती (Nature) – सर्वसमावेशक
या लोगोतला बाण आपण पाहिलात तर असे दिसेल की तो बाण A पासून चालू होतो आणि z पर्यंत जातो. त्यांना असे सांगावयाचे आहे की ते सगळ्या गोष्टींमध्ये उलाढाल करतात. तसेच काळे पार्श्वभूमी आणि पांढरा शब्द म्हणजे सगळे रंग त्यामध्ये समाविष्ट होतात.
याच कसोट्या तुमच्या उद्योगाच्या लोगोस लावून पहा काय चित्र उभे राहतंय ते.
याचे दोन पैलू आहेत.
- तुमची ताकद काय?
- तुमची ताकद तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचते का लोगोच्या माध्यमातून?
जर असे होत असेल तर तुमचा लोगो तुमच्यासाठी नक्कीच नशीबवान, भाग्यवान आणि धनवान ठरेल.
– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
९८२०४८९४१६
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.