यशस्वी उद्योजकांसाठी वेळ व्यवस्थापनाचे १० नियम

दैनंदिन धावपळीत वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे हेच यशाचे खरे गमक आहे. व्यवसाय कितीही छोटा किंवा मोठा असो, वेळेचा नीट उपयोग न केल्यास तो अयशस्वी होऊ शकतो. व्यवसायात पैशाचं नियोजन जसं महत्त्वाचं आहे, तसं वेळेचं नियोजन ही मूलभूत गरज आहे.

वेळचे व्यवस्थापन केल्याने कामात पारदर्शकता, गती आणि दर्जा वाढतो. तुमच्या व्यवसायात यश हवं असेल, तर वेळेचा प्रत्येक क्षण हा गुंतवणूक म्हणून वापरा, कारण वेळ गेली की पुन्हा परत येत नाही. वेळेचा योग्य वापर केल्यास उत्पादकता वाढते, तणाव कमी होतो आणि व्यवसायाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे सोपे होते.

यशस्वी उद्योग व्यवसाय उभारायचा असेल तर वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो तर यशस्वी उद्योजकांच्या दैनंदिनीचा अभ्यास करून काही नियम आपण ठरवून घेऊ.

priority

१. प्राधान्यक्रम ठरवा : तुमचे टास्क ठरवा. सर्वात महत्त्वाच्या आणि तातडीच्या कामांना प्राधान्य द्या. दररोज आपल्या कामांची यादी तयार करा. टू-डू लिस्ट तयार करताना फक्त ३ ते ५ सर्वात महत्त्वाच्या कामांचा समावेश करा. यामुळे तुम्ही अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवणार नाही.

Eisenhower Matrix सारखे टाईम मॅनेजमेंट अ‍ॅप्स तुम्हाला यासाठी मदत करू शकते. तुमची महत्त्वाची आणि तातडीची कामे, तातडीची नाहीत, पण महत्त्वाची आहेत, तातडीची आहेत, पण थोडी कमी महत्त्वाची आहेत आणि काही कोणत्याच प्रकारात बसणारी नाहीत अशी कामाची विभागणी करून वेळेचे व्यवस्थापन करता येईल.

२. दिवसभराचे नियोजन करा : दिवसाची सुरुवात १० ते १५ मिनिटांच्या नियोजनासह केल्यास उर्वरित वेळ व्यवस्थित वापरता येतो. प्रत्येक कामासाठी विशिष्ट वेळेचे नियोजन करा आणि त्याचे पालन करा. वेळेचे नियोजन केल्याने तुम्ही तुमच्या कामांचा प्रवाह सुसंगत ठेवू शकता.

प्रत्येक कामासाठी विशिष्ट वेळेचा ब्लॉक राखून ठेवा. आठवड्याच्या सुरुवातीला संपूर्ण आठवड्याचे नियोजन करा आणि दररोज रात्री पुढील दिवसाचे नियोजन करा. यासाठी गुगल कॅलेंडरसारखे टूल्स वापरता येतील.

goal should be smart

३. दृष्टीक्षेपातील ध्येय निश्चित करा : आपल्या क्षमता आपल्याला ठाऊक असतात त्या लक्षात घेऊन ध्येय निश्चित करा. अवास्तव ध्येय टाळा. कारण यासाठीसुद्धा वेळ महत्त्वाचा आहे. अवास्तव ध्येये ठेवल्याने तणाव वाढतो आणि उत्पादकता कमी होते. ध्येय हे SMART असावे म्हणजेच Specific, Measurable, Achievable, Relevant, Time-bound.

म्हणजे काय तर जर तुम्ही नवीन ग्राहक मिळवण्याचे ध्येय ठरवले तर या महिन्यात दहा नवीन ग्राहक मिळवणे हे जास्तीत जास्त ग्राहक मिळवणे यापेक्षा स्पष्ट आणि वास्तववादी आहे. तुमचे ध्येये लहान लहान टप्प्यांत विभागा आणि प्रत्येक टप्प्यासाठी एक मुदत काळ ठरवा. यामुळे प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.

no in mind but saying yes

४. नाही म्हणायला शिका : अनावश्यक कामे किंवा मीटिंग्सना नम्रपणे नकार द्या. व्यवसायात अनेकदा आपण प्रत्येक गोष्टीला होकार देतो. यामुळे आपल्या मुख्य कामांवर विपरीत परिणाम होतो.

वेळ वाचवण्यासाठी काही गोष्टींना नकार देणे हेच हितकारक ठरते. प्रत्येक संधी स्वीकारण्याचा मोह होतो, पण यामुळे तुमची प्राधान्ये बिघडू शकतात. तुमच्या ध्येयांशी न जुळणार्‍या गोष्टींना नाही म्हणायला शिका. नकार देताना नम्र आणि प्रोफेशनल राहा.

५. कामाचे विभाजन करा : उद्योजकांना अनेक कामे स्वतःच करायची सवय असते, पण यामुळे त्यांच्या वेळेचा मात्र अपव्यय होतो. अनेक कामे ही उद्योजकाने स्वत: करण्याऐवजी आपल्या टीमवर सोपवली किंवा आऊटसोर्स केली तर वेळ वाचेल. तो वेळ इतर निर्णायक गोष्टींसाठी वापरता येईल. आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले तर ते स्वतंत्रपणे कामे हाताळू शकतात.

६. व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करा : वेळ वाचवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. आज अनेक सॉफ्टवेअर्स आणि टुल्स उपलब्ध आहेत जे व्यवसायातील कामे सुलभ करतात. ईमेल ऑटोमेशन टुल्स वापरून नियमित ईमेल्स स्वयंचलित केल्यास तुमचा वेळ वाचेल. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार टुल्स निवडा आणि त्यांचा नियमित वापर करा. नवीन टुल्स शिकण्यासाठी थोडा वेळ द्या.

७. एका वेळी एकच काम करा : मल्टीटास्किंग ही अनेकदा बाधक असते. एकावेळी एकाच कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. यामुळे काम दर्जेदार होते आणि वेळही कमी लागतो आणि आपला वेळही वाचतो. व्यवसायासाठी ठराविक वेळ निश्चित करा. यामुळे कामाला शिस्त लागते आणि वैयक्तिक आयुष्यही संतुलित राहतं.

८. वेळखाऊ सवयी ओळखा आणि टाळा : सतत सोशल मीडियावर स्क्रोल करणे, अनावश्यक फोन कॉल्स यावरही आपला वेळ वाया जातो. ऑफिसमधील गप्पा यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. या गोष्टी टाळा. एकूणच काम करताना व्यत्यय निर्माण करणार्‍या गोष्टींपासून दूर राहा.

९. कामातून ब्रेक घेत राहा : वेळेच्या व्यवस्थापनात हाही महत्त्वाचा भाग आहे. उत्पादकतेसाठी सातत्याने काम करणे आवश्यक नाही, तर वेळच्या वेळी विश्रांती घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नियमित छोट्या ब्रेक्समुळे मन ताजं राहतं आणि कामात नवचैतन्य येतं. दर १-२ तासांनी ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्या आणि शारीरिक हालचाल करा. मेडिटेशन किंवा डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेसचा समावेश तुमच्या वेळ व्यवस्थापनेत केला तर तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. यामुळे उत्पादकता आणि एकाग्रता वाढते.

१०. आपल्या मॅनेजमेंटचा मागोवा घ्या : वेळेचे नियोजन तर केले, पण आपण ठरल्याप्रमाणे सगळे होतंय का याचाही मागोवा घेत राहायला हवे. यातून आपला वेळ कुठे कुठे आणि कसा खर्च होतोय याची नोंद राहते. यामुळे कुठे सुधारणेची गरज आहे हे कळते. यामुळे पुढील दिवशी जास्तीत जास्त काटेकोरपणे वेळेचे नियोजन आपल्याकडून घडून यायला मदत होते.

या नियमांचे पालन जर उद्योजक करत राहिला तर व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखले जाईल. आपल्याला अपेक्षित सकारात्मक बदलही लवकरच दिसायला लागतील.

Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?