1007 annual marketing

Confident व्यक्ती ‘या’ १२ गोष्टी करत नाहीत

आज स्पर्धेच्या युगात तुम्हाला यश संपादन करण्यासाठी तुम्ही करता आहात त्या विषयाबद्दल किंवा त्या कामाबद्दल आणि स्वत:बद्दल विश्‍वास असणं गरजेचं आहे. जर तुमच्यात आत्मविश्‍वास नसेल तर तुम्ही या शर्यतीत हरलात म्हणून समजा. आत्मविश्‍वास असणारे लोक काय करतात, हाही एक महत्त्वाचा विषय आहे.

हे लोक स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाच्या सोबतीने ते यश मिळवण्याची शाश्वती ठेवतात. आत्मविश्‍वासपूर्ण लोक कोणत्या गोष्टी करत नाहीत? हा ते काय करतात, यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे.

१. कारणे देत नाहीत : वेगवेगळी कारणं देऊन पळवाटा काढणारे लोक खूप असतात. ज्या लोकांकडून काहीच होऊ शकत नाही, ते लोक पळवाटा शोधत असतात. आत्मविश्‍वास असणारे लोक जे करतात आणि जे वागतात, ते स्वत:च्या विचारांनी वागतात. त्याची जबाबदारी घेतात. ते कधीही माझ्याकडे वेळ नाही, मला बरं नाही, अशी फालतू कारणं देत बसत नाहीत.

२. तुलना करीत नाहीत : आत्मविश्वासू लोक कधीच दुसर्‍याची स्वत:शी तुलना करत बसून वेळ वाया घालवत नाहीत. ते आपण काय करत आहोत किंवा आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार करीत असतात.

दुसर्‍यांनी काय केले किंवा दुसरे काय करणार आहेत, यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे, यावर ते जास्त लक्ष केंद्रित करतात. दुसर्‍याशी तुलना करत बसणं, हे मूर्खपणाचं लक्षण आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

WhatsApp Channel Banner

comfort zone३. कम्फर्ट झोन टाळतात : कम्फर्ट झोनमध्ये माणूस आळशी होतो. त्रासाला दूर करून अलगद राहण्याची सवय या कम्फर्ट झोनमुळे लागते. बरेच लोक आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची कामे करत नाहीत.

आत्मविश्वासू लोक कम्फर्ट झोनमध्ये कधीच स्वत:ला अडकवून घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की कम्फर्ट झोन हा आपल्या स्वप्नांना मारून टाकतो.

४. कामे पुढे ढकलत नाहीत : आज माझ्याकडे वेळ नाही. आज माझा मूड नाही, असं म्हणून आजची कामे पुढे ढकलली जातात. आत्मविश्वासू माणसे कधीही आजची कामे दुसर्‍या दिवसावर ढकलत नाहीत.

ते कधीही योग्य वेळेची किंवा योग्य परिस्थितीची वाट बघत बसत नाहीत. ते आजची कामं आजच करण्यात विश्वास ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की यातच प्रोग्रेस आहे.

५. कोण काय बोलतं, याचा विचार करत नाहीत : बहुधा ऑॅफिसेसमध्ये सहकारी लोकांच्या मागे त्यांच्यावर टीका करणं चालू असतं. आत्मविश्वासू लोक कधीच इतरांच्या वाईट गॉसिप्समध्ये सहभागी होत नाहीत. ते स्वत:ला स्वत:च्या कामात गुंतवून ठेवतात.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

ते इतरांच्या फाटक्यात कधीच पाय घालत नाहीत. त्यांना त्याची गरजही वाटत नाही. आपल्याबद्दल कोण काय बोलतात, याचा कधीही हे लोक विचार करत नाहीत.

६. पुढे पुढे करत नाहीत : प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तीला आपण चांगलेच वाटायला हवे किंवा त्यांच्याशी अधिक जवळीक साधायला हवी, असं वाटत नाही. प्रत्येक भेटणार्‍याच्या होत हो मिळवत नाहीत.

त्यांना हे माहीत असतं की जीवनात भेटणारे सगळेच लोक नेहमीसाठी सोबत नसतात आणि जीवन असंच चालतं. आपले रिलेशन किती लोकांशी आहे, यापेक्षा ते किती चांगले आहेत, याकडे ते लक्ष देतात.

७. बडेजाव नाकारतात : आत्मविश्वासू लोकांना सतत दुसर्‍याकडून स्वत:चा मोठेपणा ऐकण्याची गरज किंवा सवय नसते. त्यांना माहीत असतं की जीवन हे कधीच सरळ नसतं. जे आता आहे, ते नेहमीसाठी तसंच राहील याची शाश्वती नसते. असे लोक त्यांची शक्ती-बुद्धिमत्ता सकारात्मक पद्धतीने कामी लावतात. जेणेकरून त्यांचं जीवन ते पुढे नेऊ शकतील.

८. सत्य नाकारत नाहीत : जीवनात येणार्‍या अडचणींना घाबरून पळून न जाता, समोर आलेल्या अडचणीने आयुष्य आणखी अवघड होऊ न देता, धैर्याने त्याचा सामना करण्याची शक्ती आत्मविश्वासू लोकांकडे असते.

जीवन जगत असताना किंवा काम करत असताना काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज त्यांना असतो. त्यानुसार ते आधीच उपाययोजना करून ठेवतात.

Success in Failure

९. अपयशाला घाबरत नाहीत : आत्मविश्वासू लोक हे कधीही अपयशाला घाबरत नाहीत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, या सत्यापासून ते कधीही दूर जात नाहीत. ते सतत अपयशाचे कारण शोधत असतात आणि पुढच्या वेळी अपयश येणार नाही, या दृष्टीने पावले उचलतात. अपयशाची कारणे त्यांना सापडली की ते चुका सुधारून पुन्हा नव्याने उभे राहतात.

१०. कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत : आत्मविश्वासू लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी कधीही कुणाच्या सांगण्याची गरज पडत नाही. ते बिनधास्तपणे त्यांना जे करायचे आहे ते करतात. प्रत्येक दिवशी ते स्वत:ला आठवण करून देतात की, जर मी नाही करणार तर कोण?

११. स्वत:ला बंदिस्त करीत नाहीत : आत्मविश्वासू लोक कधीच स्वत:ला एका लहान टूल बॉक्समध्ये बांधून ठेवत नाहीत. ते काहीही करताना त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण प्रभावीपणे वापरतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वत:जवळ असलेले सगळे ज्ञान ते यश मिळवण्याचे नियोजन करण्यात करतात. हे करणार नाही, ते करता येत नाही, असं ते कधी म्हणत नाहीत.

१२. डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत : आज इंटरनेटवर हजारो लेखक वेगवेगळ्या विषयांवरील लेख लिहितात. त्यांचं वाचनही मोठ्या प्रमाणात होतं, पण आत्मविश्वासू लोक एखाद्या लेखकाने लिहिलेल्या किंवा मांडलेल्या विचारावर डोळेझाकपणे विश्वास ठेवत नाहीत. ते स्वत:च्या विचाराने जे लिहिले आहे, ते तपासून बघतात.

त्यांना माहीत असतं की कुणी काय लिहिलं आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे, त्यानुसार वागावे की नाही, याचा विचार फक्त आत्मविश्वासू व्यक्तीच करू शकते, कारण आत्मविश्वासू लोकांना आत्मविश्वास काय असतो हे चांगलेच माहिती असते.

Table of Contents

Author

  • santosh kamerkar 2

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे. संपर्क : 7303445454

    View all posts

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा