1007 annual marketing

संगीत, दृश्यं आणि सुगंध यांची अनोखी मैफल “निसर्गायन – एक अनोखी प्रेमकहाणी!” ६ जून रोजी प्रभादेवीत

nisargayan ek anokhi premkahani

मुंबई : संगीत, दृश्यं आणि सुगंध या तिन्ही माध्यमांची अप्रतिम सांगड घालणारी “निसर्गायन – एक अनोखी प्रेमकहाणी!” ही आगळीवेगळी मैफल येत्या शनिवार, ६ जून २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमी मिनी थिएटर (रवींद्र मिनी) येथे सादर होणार आहे.

‘शुभसूर क्रिएशन्स’निर्मित आणि दादर सांस्कृतिक मंच यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निसर्ग आणि भावना यांच्या अनोख्या प्रेमकहाणीचा सुरेल प्रवास रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

अनेक युगांपासून चालत आलेल्या ऋतुचक्राला भावभावनांची जोड देत या मैफलीची संकल्पना उभी करण्यात आली आहे. शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि वर्षा हे सहा ऋतू या प्रेमकहाणीचे साक्षीदार आणि सहप्रवासी बनत कथेला वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे नेतात.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते केतकी भावे-जोशी, अभिषेक नलावडे आणि सौरभ सोहोनी हे असून संकल्पना, संहिता आणि संगीताची जबाबदारी सुखदा भावे-दाबके यांनी सांभाळली आहे.

WhatsApp Channel Banner

मैफलीतील गीते कविवर्य मंगेश पाडगांवकर, कवयित्री शांता शेळके, पराग दाबके आणि सुखदा भावे-दाबके यांच्या लेखणीतून साकारली आहेत. विशेष म्हणजे, गायन आणि अभिवाचनासोबतच LED वरील दृश्यं आणि सुगंध यांचा प्रभावी वापर या मैफलीत करण्यात आला आहे.

संगीत, दृश्यं आणि सुगंध या तीन माध्यमांद्वारे प्रेमकहाणी उलगडण्याचा हा अनोखा प्रयोग रसिकांसाठी निश्चितच वेगळा अनुभव ठरणार आहे. विशेषतः एखाद्या मैफलीत सुगंधाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून केलेला वापर हा अत्यंत दुर्मीळ मानला जात आहे.

या कार्यक्रमाच्या पोस्टर रिलीजपासूनच रसिकांकडून संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मैफलीलाही उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पराग दाबके यांनी व्यक्त केला. तसेच “एका आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीचे साक्षीदार होण्यासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत महत्त्वाची असल्याने कृपया वेळेत उपस्थित राहून सुरुवात चुकवू नये,” असे आवाहन शुभसूर क्रिएशन्सच्या सुखदा भावे-दाबके यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका मर्यादित असून त्या मिळवण्यासाठी शुभसूर क्रिएशन्सला 9819204232 वर संपर्क साधा.

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top

🚀 व्यवसायात पुढे राहायचे आहे?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

३ महिन्यांची वर्गणी
फक्त ₹300
📈 व्यवसाय मार्गदर्शन
💡 मार्केटिंग टिप्स
🤝 प्रेरणादायी यशोगाथा
💰 आर्थिक नियोजन मार्गदर्शन


👉 आजच वर्गणी भरा