आपण अनेकदा आयुष्य नकारात्मक पद्धतीने जगत असतो. अनेक जण प्रचंड परिश्रम करतात, पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. काही लोक सहज यशाच्या शिखरावर पोहोचतात, तर काहींना प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. या फरकाचं कारण नेमकं काय आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
‘अहं ब्रह्मास्मी’ – स्वतःची ओळख
जीवन बदलण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःची खरी ओळख जाणून घेणे. ‘अहं ब्रह्मास्मी’ म्हणजे मी ब्रह्म आहे. या विश्वात जी ऊर्जा, चेतना आणि शक्ती आहे, तीच शक्ती आपल्यामध्येही आहे. या विशाल ब्रह्मांडात आपण एक छोटा भाग असलो तरी त्या ब्रह्मतत्त्वाचा अंश आपल्यात आहे. त्यामुळे आपण तुच्छ नाही; आपण महत्त्वाचे आहोत.
तुमचा जन्म हा योगायोग नाही. तुमच्या आयुष्याला एक उद्देश आहे. स्वतःचा आदर करा आणि इतरांचाही आदर करा. हा विचार मनात पक्का झाला की आत्मविश्वासाची नवी सुरुवात होते.
यशस्वी लोकांविषयीचा दृष्टिकोन बदला
बर्याचदा आपण यशस्वी किंवा श्रीमंत लोकांविषयी चुकीच्या समजुती बाळगतो. “तो नक्की काहीतरी चुकीच्या मार्गाने मोठा झाला असेल,” अशी भावना मनात येते. ही असूया आपल्या मनात नकारात्मकता निर्माण करते. पैशांबद्दल वाईट विचार ठेवणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीला अडथळा आणणे होय.
यशस्वी जीवन टिप्स – लोकांविषयी सकारात्मक भावना ठेवली, तर आपल्या आयुष्यातील संबंधही सकारात्मक होतात. नकारात्मक विचार इतरांना कमी आणि स्वतःलाच जास्त त्रास देतात.
संघर्ष हा जीवनाचा नियम
आयुष्यात अडचणी येणारच; पण त्यांना अडचणी न म्हणता ‘संघर्ष’ म्हटलं तर त्यांची तीव्रता कमी जाणवते. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक माणूस संघर्ष करतच असतो. त्यामुळे संघर्षाला घाबरू नका, त्यातूनच प्रगतीचा मार्ग तयार होतो.
कृतज्ञतेची सवय
सकाळी उठल्यावर म्हणा, “आजचा दिवस पाहण्याची संधी मिळाली, यासाठी मी आभारी आहे.” रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. उदा. “आज माझी क्लायंटसोबतची मीटिंग उत्तम झाली, यासाठी मी आभारी आहे.” ही सवय मनाला सकारात्मकतेची दिशा देते.
व्यावसायिक संबंध सुधारण्याची किमया
व्यवसायात अनेकदा क्लायंट, पार्टनर किंवा मित्रांसोबत मतभेद होतात. त्यामागे बाह्य कारणांपेक्षा आपल्या मनातील नकारात्मक विचार जास्त जबाबदार असतात.
करून पाहा हा सराव :
- जास्तीत जास्त ५ व्यक्तींची यादी तयार करा ज्यांच्याशी संबंध बिघडले आहेत.
- त्यांच्या फोटोसमोर बसून मनापासून बोला, “मला तुमच्याशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत.”
- एक तक्ता बनवा : नाव | मतभेदाचे कारण | क्षमा / आभार
- ही प्रक्रिया मनातील कटुता कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

विचार बदलले की अनुभव बदलतो
अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या एका प्रसंगातून मोठा धडा मिळतो. उकाड्यात बसताना बच्चन म्हणाले, “गरमीबद्दल विचार कराल तर गरमी जाणवेल.” आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, त्या अधिक तीव्रतेने अनुभवतो. त्यामुळे तक्रारींपेक्षा ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
सकारात्मक मंत्र – मनाचे औषध
दररोज तीन वेळा म्हणा :
“दर दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक संपन्न होत आहे.”
हा मंत्र मनाला सकारात्मक दिशा देतो. सकाळी शांत बसून आणि रात्री शरीर रिलॅक्स करून हा जप करा. नियमित सरावाने मन स्थिर होते आणि आत्मविश्वास वाढतो.
Visualization
लहानपणी आपण चित्रांच्या माध्यमातून शिकतो. चित्रांचा प्रभाव मनावर खोलवर होतो. आपण जेव्हा ध्येयाची स्पष्ट कल्पना मनात उभी करतो, तेव्हा मन त्या दिशेने कार्य करू लागते. सकारात्मक चित्रण म्हणजे आपल्या भविष्यातील यशाचे मानसिक आराखडे तयार करणे.
जीवनातील बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. स्वतःला कमी लेखू नका. सकारात्मक विचार, कृतज्ञता, योग्य शब्द आणि स्पष्ट चित्रण या चार गोष्टींचा सराव केला, तर आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू शकतो.
आजपासून एकच वाक्य मनात ठेवा :
“दर दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक संपन्न होत आहे.”
याचा परिणाम पाहा, सकारात्मकतेचा प्रवास तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर कसा घेऊन जातो.


