Cibil score का वाढत नाही? | Explainer

वैयक्तिक कर्जांची संपूर्ण परतफेड केल्यानंतर सिबिल स्कोअर आपोआप वाढेल, असे अनेकांना वाटते. परंतु कर्जाची परतफेड करूनसुद्धा सिबिल स्कोअर काही वाढला नाही, अशी अनेकांची तक्रार असते. कारण कर्ज फेडणे आणि क्रेडिट स्कोअर वाढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सिबिल स्कोअर न वाढण्यामागे खालील कारणे असू शकतात :

१. क्रेडिट रिपोर्ट अपडेट झालेला नसणे

कर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेकडून क्रेडिट ब्युरोला माहिती पाठवली जाते. ही माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसण्यासाठी साधारणपणे ३० ते ४० दिवस लागू शकतात.

२. पूर्वीचे थकलेले हप्ते

याआधी ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरले असेल, तर त्याचा परिणाम स्कोअरवर कायम राहू शकतो.

३. क्रेडिट कार्डचा जास्त वापर

कार्डच्या एकूण मर्यादेच्या तुलनेत जास्त रक्कम वापरल्यास क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट ६० टक्क्यांच्या वर वापरणे टाळा.

४. इतर कर्जे आणि खात्यांची स्थिती

तुमची इतर कर्जे, त्यांची परतफेड आणि क्रेडिट खात्यांचा एकूण इतिहास यांचाही स्कोअरवर परिणाम होतो.

५. कर्ज पूर्ण फेडण्याऐवजी सेटलमेंट करणे

संपूर्ण थकबाकी न भरता बँकेशी तडजोड करून कमी रक्कम भरल्यास क्रेडिट रिपोर्टमध्ये ‘Settled’ अशी नोंद होऊ शकते. याचा भविष्यातील कर्ज मिळण्यावर परिणाम होऊ शकतो.

६. फ्रॉड

हल्ली तुमच्या नावावर तुमचे KYC वापरून दुसऱ्याच कोणी फ्रॉड लोन घेण्याचे प्रकार वाढत आहेत. असे एखादे कर्ज तुमच्या सिबिलमध्ये दिसत असल्यास त्वरित कारवाई करा.

WhatsApp Channel Banner

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय करावे?

  • सर्व ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा.
  • क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवा.
  • कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर क्रेडिट रिपोर्ट तपासा.
  • कर्ज बंद झाल्याची नोंद चुकीची असल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधा.

लक्षात ठेवा, कर्ज फेडल्याने तुमची थकबाकी संपते; मात्र सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी वेळेवर परतफेडीचा चांगला इतिहास आणि आर्थिक शिस्त आवश्यक असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top