Advertisement
उद्योगवार्ता

कुक्कुटपालन उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण

नाशिक (महान्युज) : कुक्कुटपालन उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून त्या माध्यमातून राज्यात अंडी व बॉयलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल यासाठी कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केले.

दोन दिवसीय ‘इंडीया पोल्ट्री एक्सो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी जानकर बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, प्रदर्शनाचे आयोजक मनोज शर्मा, पीपल फॉर पोल्ट्री संघाचे अध्यक्षा वसंत कुमार, अरुण पवार, व्यंकटार, डॉ. पी.जी. पेडगावकर आदी उपस्थित होते.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

जानकर म्हणाले, राज्यात अंडी व चिकनचे मागणीच्या प्रमाणात उत्पादन होत नाही त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून याची मागणी पुरवली जात आहे. उद्योगांसारखा रोजगार देण्याची क्षमता आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.


Smart Udyojak Subscription

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: