'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe

उद्योजकाचे नाव : महेश अंकुश गदादे
व्यवसायाचे नाव : अध्यक्ष स्पेशल शिपी आमटी
जिल्हा : अहिल्या नगर
जन्मदिनांक : ६ मार्च २००७
मी महेश अंकुश गदादे राहणार मूळ थेरवडी (कर्जत) गावचा. लहानपणापासूनच उद्योग करण्याचे स्वप्न. आई-वडिलांचेही स्वप्न आपला मुलगा नोकरी करणारा नाही तर नोकरी देणार झाला पाहिजे. शालेय शिक्षण पूर्ण करत वयाच्या बाराव्या वर्षीच मामा राहुल सायकर यांच्यासोबत टेलरिंगचे शिक्षण घेतले यातूनच कापड उद्योगाबाबत अधिक माहिती मिळवली.
याच क्षेत्रात चुलते गणेश गदादे (शोमॅन उद्योग समूह महाराष्ट्र राज्य) आधीपासूनच असल्या कारणाने या क्षेत्राची आवड निर्माण झाली. यातूनच वयाच्या पंधराव्या वर्षी मामासोबत ‘जी. एस. टेलर्स’ची सुरुवात केली. एक वर्ष बिझनेस चांगला चालू लागला आणि कोरोना महामारी आली. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद ठेवावे लागले. बिझनेस डिजिटल झाले. आम्हीही आमचा व्यवसाय डिजिटल स्वरूपात मांडला, परंतु त्याला अपयश आले.
याच काळात वाचनाची आवड निर्माण झाली व्यवसायासंबंधीची पुस्तके वाचली. लॉकडाऊनमध्ये बरेच व्यवसाय बंद पडले. परंतु माझे चुलते संजय गदादे यांनी त्यांच्या हॉटेलिंगबद्दलच्या अनुभवातून आणि कौशल्यातून आपल्या राहत्या घरीच ‘शिपी आमटी पार्सल स्वरूपात’ असा छोटासा व्यवसाय सुरू केला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हाच व्यवसाय आता मी पुढे चालवत आहे. वाचनातून, निरिक्षणातून आणि अनुभवातून लिखाणाची आवड निर्माण झाली. यातूनच स्वत:च्या विचाराने आणि चुलते संतोष गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली “युवा उद्योजक” हे पुस्तक लिहित आहे. हे पुस्तक आपणास व्यवसाय सुरू करण्यास, वाढवण्यास मदत करेल अशी मला खात्री आहे. “युवा उद्योजक” हे पुस्तक लवकरच प्रकाशित होवून आपणास वाचनासाठी उपलब्ध होईल.
व्यवसायाचा पत्ता : थेरवडी, ता. कर्जत, जि. अहिल्या नगर – 414402
संपर्क क्रमांक : 7498710384
ई-मेल : maheshgadade908@gmail.com

