Advertisement
उद्योगवार्ता

‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना : मुख्यमंत्री

'स्मार्ट उद्योजक' डिजिटल आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त १२५ मध्ये!

Book Here: https://imjo.in/YSMSQK

‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यात आले असून त्याद्वारे रोजगार निर्मितीलादेखील चालना देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक येथे ओझर टाऊनशिप परिसरातील कम्युनिटी हॉल येथे उद्योग विभागातर्फे आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणाला रोजगार देण्यासाठी संघर्ष केला. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाचे असेच प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ देण्यासाठी तसेच कुशल युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग मेळावा सेतूचे काम करतो. त्यामुळे राज्यात उद्योग विभागातर्फे रोजगार मेळाव्याचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

बदलत्या काळात कौशल्य विकासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. रोजगारासाठी शिक्षणाबरोबर कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. कौशल्य विकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती होत असतना रोजगाराच्या संधीतही वाढ होत आहे. ईपीएफआयच्या सर्वेक्षणानुसार राज्यात गतवर्षी ८ लाख नवे रोजगार निर्माण झाले. शासन युवकांना संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीच्या लाभ घेत अनुभवाच्या बळावर युवकांनी प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक जिल्ह्याला उद्योग क्षेत्रात प्रगतीची संधी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक हा औद्योगिक त्रिकोणातील महत्त्वाचा जिल्हा आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि नाशिक जवळ येऊन पुण्याप्रमाणे नाशिकचा औद्योगिक विकास शक्य आहे. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला लाभ होणार आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असून ड्रायपोर्टमुळे जिल्हा मुंबईशी जोडला जाऊन कृषी विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: