Advertisement
उद्योगसंधी

महिलांसाठी उद्योगसंधी; मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशीयन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशीयन होण्यासाठी त्याचे प्रशिक्षण व सराव या दोन्हींची आवश्यकता असते. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेत या संदर्भातले ठरावीक अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. अनेक लहान-मोठ्या शिक्षणसंस्था, ब्युटिपार्लर व या क्षेत्रातील अनुभवी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात. त्यामध्ये बेसिक, अ‍ॅडव्हान्स व स्पेशलाईजड् असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

परदेशात या क्षेत्रासाठीचे शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फ्रीलान्स मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशीयन म्हणून या कामाला एकट्याने सुरुवात केली जावू शकते. स्वत:चे ब्युटिपार्लरही सुरू करता येऊ शकते. सौंदर्याशीसंबंधीत विविध प्रकारच्या सेवा फ्रीलान्स रुपात वा ब्युटिपार्लरमध्ये देता येऊ शकतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

फ्रीलान्स रुपात व्यवसाय सुरू करायचा झाल्यास प्रशिक्षण व सरावानंतर निव्वळ दहा हजार रुपये भांडवलातसुद्धा सुरुवात करता येऊ शकते. शहरी व निमशहरी भागात या व्यवसायाला बराच ग्राहकवर्ग आहे. लग्न, मुंज, वाढदिवस, पार्टी आदी सर्व प्रकारच्या सोहळ्यांच्यावेळी स्त्री व पुरुष दोघांनाही मेकअप व ब्युटिशीयनची गरज लागू शकते. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, मालिका आदी क्षेत्रांसाठीही तुम्ही ही सेवा देऊ शकता.

– शर्मिला पवार
९६१९१११५०७
(लेखिका स्वतः ब्युटिशीयन व प्रशिक्षक आहेत.)

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!