प्रयत्नपूर्वक स्वत:चा ब्रॅण्ड विकसित करणारा तरुण उद्योजक मंदार चांदोरकर

‘मानसी फूड प्रॉडक्ट्स’चे मंदार चांदोरकर हे नव्या पिढीचे, धडाडीचे ‘अन्न प्रक्रिया’ उद्योजक. 1993 साली त्यांच्या आई -वडिलांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. महादेव जगन्नाथ चांदोरकर व सौ. चांदोरकर यांनी रत्नागिरी शहर ही संभावित बाजारपेठ गृहीत धरून त्या काळी कुळीथ पीठ, आंबोळी पीठ गोडा मसाला, गरम मसाला, मेतकूट, भाजणी पीठ इत्यादी घरगुती कोकणी पदार्थांची छोट्या स्तरावर उत्पादने घ्यायला, बनवायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात ही सर्व उत्पादने हातानेच बनवली जात असत. मंदार बारावी झाल्यानंतर आपल्या कौटुंबिक उद्योगाकडे पूर्णवेळ लक्ष देऊ लागले. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी नंतर बाजारपेठ विस्ताराकडे व ब्रँण्ड विकसनाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. वेळेच्या बचतीसाठी सर्व आवश्यक मशीनरी आणल्या. त्यामुळे त्यांना नवीन प्रॉडक्ट लॉन्च करता आले.

मंदार यांनी मधल्या काळात ‘अन्न प्रक्रिया’, ‘मार्केेटिंग’चे प्रशिक्षणही घेतले. त्याचाही त्यांना ‘उद्योगविस्तारामध्ये’ निश्‍चितच फायदा झाला. आज त्यांचा माल संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मुंबई, पुणे या भागांतही विक्रीसाठी जातो. मंदार यांनी मालाच्या वितरणासाठी स्वत:चे मालवाहतूक वाहनही घेतले आहे.

मंदार व त्यांच्या वडिलांनी मालाच्या गुणवत्तेवर, वेष्टनांवर, लोगोवर विशेष लक्ष देऊन एक उत्तम पंच लाइन तयार केली आहे. ‘दर्जा आणि चवीचे दुसरे नाव’ चांदोरकर यांचे ‘मानसी फूड ‘प्रॉडक्टस’.

घरगुती चवीची दर्जेदार उत्पादने, विश्‍वासार्हता, गुणवत्ता, वचनबद्धता व चांदोरकर यांचे व्यवस्थापन’ यामुळे ‘ब्रॅण्ड मानसी’ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. ग्राहकांना काय हवे व ते कसे द्यावे हे मार्केटिंगचे सूत्र ते बरोबर अमलात आणत आहेत. अस्सल घरगुती स्वादाची, कोकण स्पेशल प्रॉडक्ट्स सर्व महाराष्ट्रमध्ये वितरण करणे हे त्यांचे नजीकचे उद्दिष्ट आहे.

व्हिजन व मिशनप्रमाणे काम करणारे चांदोरकर या व्यवसायात खूप प्रगती करोत व त्यांचे सर्व मनोरथ, इच्छा पूर्णत्वास येवोत, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना. कारण ‘कर्मे इशू भजावा’ या उक्तीप्रमाणे ते स्वत:च्या व्यवसायवृद्धीसाठी अविरत मेहनत घेत आहेत. त्यांचे हे काम नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक व प्रेरक आहे.

– मंदार चांदोरकर
7276353091


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?