स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक जीवनात मनुष्य एवढा गुरफटून गेलेला आहे की, मनुष्य संवेदनशीलतेकडून असंवेदनशीलतेकडे नकळतपणे वळत चाललेला आहे. मानव आता एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे वावरत आहे. सतत काम काम, धावपळ, ताण, चिंता, अनिश्चितता, भीती, न्यूनगंड, नकारात्मकता, ताणतणाव, वाढती जीवघेणी स्पर्धा या आणि अशा नाना तऱ्हेच्या समश्यांना तोंड देत चाललेला आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाचा समतोल सांभाळता सांभाळता पुरता हैराण होत चाललेला आहे.
माणसांना बदलत्या आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी, उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती नाही. प्रत्येक क्षेत्रातील वाढती जीवघेणी स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे आजचा तरुण वर्ग देखील प्रचंड तणावाखाली वावरत आहे. कामाचा अतिरिक्त भार, करावे लागणारे अतिरिक्त काम, ते कमी मोबदल्यात यामुळे शारीरिक व मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. मानसिक ताण खूप प्रमाणात वाढत चाललेला आहे. यातून मग बाहेर पडण्यासाठी म्हणा किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी म्हणा दर आठवड्याला केल्या जाणाऱ्या पार्ट्या, दारू, सिगारेट यांचे वाढते व्यसन, यात आजची पिढी नकळतपणे वाहवत निघालेली आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
आपुलकी, प्रेम, नात्यातील जवळीकता हळूहळू कमी होत चाललेली आहे. घरातील घरपण कुठेतरी हरवत चाललेले आहे. लोकांची मनोवृत्ती संकुचित झाली आहे. घरातील स्त्री-पुरुष दोघे नोकरी करू लागले आहेत, यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांची होणारी हेळसांड यातून मग अनेक प्रश्न उदभवत आहेत. कुठे तरी सर्वांचेच मानसिक खच्चीकरण होत आहे. यातून मग मानसिक आजारांना आमंत्रण भेटत आहे. कोणी जाणून बुजून करत नाही पण आज परिस्थिती अशी उद्भवलीय म्हणा किंवा लोकांचा नाईलाज म्हणा; पण हेच सत्य आहे. माणसातला माणूस, त्याची माणुसकी कुठेतरी हरवत चाललेली आहे.
महागाई एवढी वाढली आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही काम करण्याची आवश्यकता भासत आहे.
त्यात एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत नवरा बायको दोघे नोकरी करत असतील तर त्यांची लहान लहान मुले त्यांला पाळनाघरात ठेऊन जावे लागत आहे. काय संस्कार होत असतील त्या लहान मुलांवर याचाही जरा कुठे तरी विचार करणे गरजेचे आहे. कोणी स्वखुशीने मुले पाळणाघरात ठेवत नाही हेही तेवढेच सत्य आहे, पण नाईलाज आहे. पण जी मुले आज पाळणाघरात वाढतात ती तेवढी संवेदनशील निपजतील का? हाही एक मोठा प्रश्न आहे. उद्या हीच मुले मोठी झाली कि त्यांच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार नाहीत कशावरून. ज्या वयात त्यांना आई-वडीलांचे प्रेम, सहवास हवा असतो तो भेटत नाहीय. त्यामुळे आपुलकी, प्रेम, ममता कमी होत चाललेली आहे.
अशा अनेक कारणांमुळे मानवी मनावर काय परिणाम होत आहेत याची आपण कल्पना हि करू शकत नाही. यातून कोणत्या मानसिक समस्या उदभवत आहेत, भविष्यात उदभवू शकतात यावर आपण वेळीच काय उपाययोजना करू शकतो, याचाच आढावा या पुस्तकात घेण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
तुम्ही सुखसोयी पैशाने विकत घेऊ शकता पण समाधान मात्र अंतर्मनातूनच मिळेल.
अशा अनेक मानसिक समस्यांचे समाधान आपल्याला उमेश काटकर यांच्या ‘मानसिक संघर्षावर विजय’ या ई-बुकमधून मिळू शकेल. उमेश काटकर यांचे हे ई-बुक निव्वळ ९९ रुपयांत उपलब्ध आहे. ते डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://imojo.in/1l2840
या ई-बुकच्या रक्कमेतील २० टक्के रक्कम ही अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी देणगीरूपात देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
उमेश काटकर – ९७६७०२१८१३
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.