Advertisement
उद्योगसंधी

मार्केटिंग सेवा किंवा सर्व्हे करून देऊन चांगला रोजगार मिळवू शकता

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

जेव्हा कुठलीही आंतरराष्ट्रीय किंवा फार मोठी राष्ट्रीय कंपनी एखादं नवं उत्पादन बाजारात आणते त्यापूर्वी ते मार्केटिंग सर्व्हे करतात, कारण त्यांचा उत्पादनाचा खर्च कोट्यवधी रुपयांचा असतो व ते नवं उत्पादन बाजारात खपलं नाही तर त्या कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ गोल्ड कॅफे, पेप्सी कोला वगैरे उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी त्यांनी मार्केटिंग सर्व्हेवर लाखो रुपये खर्च केले होते.

मार्केटिंग सर्व्हे म्हणजे आपलं उत्पादन बाजारात चालेल की नाही याची पाहणी (सर्व्हे) करून त्याचा अचूक अंदाज घेणे. बड्या कंपन्या हे काम मोठ्या जाहिरात एजन्सीला देतात. मग ती जाहिरात एजन्सी इतर छोट्या मार्केटिंग सर्व्हे करणार्‍या कंपनीकडून हे काम करून घेते. तुम्हाला अशी कंपनी काढायची असेल तर प्रथम अशा मार्केटिंग कंपनीमध्ये काम करावं लागेल. त्याकरिता भाषेवर प्रभुत्व, बाजाराची माहिती, संभाषणचातुर्य, सामान्यज्ञान इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

काही दिवस अशा मार्केटिंग सर्व्हे करणार्‍या कंपनीमध्ये काम करून तुम्ही स्वत:ची टीम बनवू शकता व स्वतंत्रपणे मार्केटिंग सर्व्हेची कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ शकता. तुमच्या घरातल्या एखाद्या ब्लॉकमधून मोबाइलद्वारे तुम्ही हा व्यवसाय करू शकता, कारण सर्व्हे तुम्हाला लोकांच्या घरी, दुकानात, ऑफिसात, रस्त्यात जाऊन करायचा असतो.

या व्यवसायाला फारसं भांडवल लागत नाही. ज्या तरुण/तरुणींना आऊटडोअर कामाची आवड आहे, लोकांत मिसळण्याची आवड आहे अशा तरुण/तरुणींनी आपल्या कॉलेज जीवनात याची सुरुवात करायला हरकत नाही. चांगला अनुभव आला व थोडाफार जम बसला, की कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर कुठे तरी खर्डेघाशी करण्यापेक्षा पूर्णवेळ हा उद्योग करायला हरकत नाही.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!