उद्योगवार्ता

स्टार्टअप्ससाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ने उपलब्ध केले नवे प्लॅटफॉर्म

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनीने भारतातील स्टार्टअप्ससाठी ‘Microsoft for Startups Founders Hub’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. ३१ मार्च रोजी ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे याचे उदघाटन करण्यात आले.

‘मायक्रोसॉफ्ट’ने आपल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे स्टार्टअप्सना ३ लाख अमेरिकन डॉलर किमतीचे online resources तसेच तंत्रज्ञान उपल्बध करून दिले जात आहे. ज्यामध्ये ओपन सोर्स क्लाउड तसेच GitHub Enterprise, Visual Studio Enterprise आणि Microsoft 365 डेव्हलपर्सना उपयुक्त सॉफ्टवेअर्सचा समावेश असणार आहे. नव्याने स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना मेंटॉरशिपसह विविध प्रकारची मदत ‘मायक्रोसॉफ्ट’ करणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टिम म्हणून भारत उदयाला येत आहे. विविध क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्स भविष्यातील युनिकॉर्न्स ठरतील. याचसाठी आम्ही त्यांच्या विकासात सहयोग करत आहोत, असे प्रतिपादन ‘मायक्रोसॉफ्ट’च्या संगिता बावी यांनी केले आहे.

तुम्ही startups.microsoft.com वर जाऊन ‘Microsoft for Startups Founders Hub’ मध्ये नोंदणी करू शकता.

‘गुगल’ आणि ‘अमेझॉन’ने आतापर्यंत उद्योजकांसाठी विविध प्रकारच्या सेवा उपल्बध करून दिल्या आहेत. आता यामध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’नेही उडी घेतली आहे. भारतीय स्टार्टअप्सना याचा नक्कीच लाभ होईल, यात शंका नाही.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!