एका लेखणीपासून करोडपती

आजच्या इंटरनेटच्या जगात “कंटेंट इज किंग” असं म्हटलं जातं. वाचक वाढवायचे व टिकवायचे असतील, आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर जाहिरातीतील कंटेंट खूप महत्त्वाचा असतो. हॅरी पॉटरच्या लेखिका जे.के. रोलिंग यांनी जगाला हे दाखवून दिल की, केवळ एका लेखणीच्या भांडवलावर माणूस बिलिनियर होऊ शकतो. अनेक नामवंत लेखक लक्षाधीश झाले.

अनेक वृत्तपत्रे, माध्यमांचे संपादक लेखणीच्या जोरावरच लाखो रुपये वेतन घेतात, तर कित्येक मालकही झाले. अनेक चित्रपट दिग्दर्शक झाले, गीतकार झाले. आज कोणत्याही व्यवसायासाठी इंग्रजी भाषेत मजकूर लागतोच, मग ते वेबसाइट, कॅटलॉग, सोशल मीडिया, प्रपोजल, पोर्टल, फिजिबिलिटी रिपोर्ट, प्रेझेंटेशन, ई-मेलर, जाहिरात, ब्लॉग इत्यादी अगणित बाबींसाठी दर्जेदार कंटेंट रायटिंग हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या एक लॅपटॉप घेऊन करू शकता.

त्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान, चांगले लॉजिकल इंटरनेट सर्फिंग करून आवश्यक डेटाचे संकलन करून स्वत:च्या भाषेत आवश्यकतेनुसार दिलेल्या विषयावर किमान दोन पानांचे कंटेंट लिहिता येण्याची प्राथमिक क्षमता असावी लागते. हळूहळू सरावाने ही क्षमता तुम्ही वाढवत जाऊ शकता.

  • महाराष्ट्रात अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. ते या व्यवसायात उतरू शकतात.
  • अनेक महिला विवाहानंतर कोणतेच व्यावसायिक काम करत नाहीत, त्या या व्यवसायात उतरू शकतात.
  • व्ही.आर.एस. घेतलेले अनेक शिक्षित लोक या व्यवसायात उतरू शकतात.
  • शालेय जीवनापासूनच विविध विषयांवर लिहिण्याचा छंद असणारे या क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकतात.

या क्षेत्रात सुरुवातीला महिना किमान ८ ते १० हजार रुपयांच्या कमाईपासून लाखोकरोडो रुपयांची कमाई शक्य आहे. तसेच अनेक वृत्तपत्रे, मीडिया हाऊस, कॉर्पोरेट कंपन्या, पी.आर. कंपन्या, पोर्टल, अ‍ॅड एजन्सीज कंटेंट रायट,र उपसंपादक पदावर नेमणूकही करून घेतात.

अगदी सर्वसामान्यपणे लेखनाच्या व्यवसायातून सुरुवात करून उच्चपदी पोहोचलेले व्यक्तिमत्त्वे पाहा- जे.के. रोलिंग (हॅरी पॉटर), बाळासाहेब ठाकरे, पीयूष पांडे (ब्रँड कन्सल्टंट), भरत कुमार राऊत (खासदार), निखिल वागळे, प्रसून जोशी (गीतकार), नीलेश साबळे (फू बाई फू), सिलव्हेस्टर स्टॅलन, चेतन भगत अशी असंख्य नावे आहेत.

तुमच्यात असणारा लेखणीचा पॅशन तुम्हाला ओळखावा लागेल, सुरुवातीला तुम्हाला व्यवसायिक लेखन करावे लागेल. त्यातून तुम्हाला महिना १० ते २० हजारांपर्यंत कमाई सुरू होईल. पुढे तुमचे कौशल्य तुम्हाला वाढवत जावे लागेल व या क्षेत्रात तुम्हाला यशाची एक एक पायरी चढता येईल.

यासाठी तुम्हाला सर्वसाधारण १ ते २ लाखांपर्यंतचे भांडवल लागेल. यासाठी तुम्हाला या व्यवसायासबंधीची संपूर्ण माहिती, मार्गदर्शन, सल्ला, सॉफ्टवेअर्स, वेबसाइट, ऑनलाइन मार्केटिंग, लॅपटॉप व स्वत:ला रोज किमान ६ ते ८ तास वेळ द्यावा लागेल. म्हणतात ना, पेन इज माइटर दॅन सॉर्ड. पेनात तलवारी, हत्यारापेक्षा मोठी ताकद आहे.

– प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?