आज शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. उपनगरे रोज नवीन होतायत. मोठे मोठे गृहप्रकल्प उदयाला येत आहेत. अगदी जिल्ह्याची ठिकाणंसुद्धा शहराप्रमाणे होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा चांगला पैसा खेळतोय.
मोठा मॉल किंवा बाजार व किराणा दुकान याच्यामधील टप्पा म्हणजे मिनी डिपार्टमेंटल स्टोअर्स जेथे तुम्हाला दैनंदिन लागणार्या सर्व वस्तू एकाच छताखाली चांगल्या दर्जाच्या, योग्य भावात मिळतात.
उदा. सर्व भाज्या, दूध, कोल्ड ड्रिंक्स, किराणा माल, सोप, बेकरी उत्पादने, स्नॅक्स, चॉकलेट, स्टेशनरी इत्यादी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फक्त भांडी, कपडे इत्यादी मिळत नाही. असे स्टोअर्स प्रत्येक ३-४ किलोमीटरच्या एरियात १-२ तरी चांगली चालतात.
सर्वसाधारण चांगल्या उत्पन्न असणार्या वसाहतीत चालतात. यासाठी अंदाजे २,००० वर्गफुटांची जागा लागते. ह्यात मिनी बाजारसाठीचे योग्य ते रॅक्स लागतात. त्यात भाज्या, स्टेशनरी, सोप, किराणा, बेकरी, चॉकलेट इत्यादीचे वेगवेगळे रॅक असावे लागतात. अंदाजे ३-४ कर्मचारी लागतात. हा व्यवसाय आता हायटेक झाला असून सर्व विक्री बारकोडने होते.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे व्यवस्थित देखरेख ठेवता येते. मालक जरी दुकानात नसला तरी हा उद्योग अगदी आरामात चालतो. मोबाइलवरूनही तुम्ही यावर लक्ष ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे ह्या उद्योगात उधारी प्रकार नाही.
एक तर कॅश पेमेंट नाही तर क्रेडिट कार्डने पेमेंट होते. असे एक स्टोअर चालू करण्यासाठी अंदाजे २० ते ४० लाख खर्च येतो (ठिकाणानुसार गुंतवणुकीत फरक पडतो). भाडे ३० हजार, कामगार पगार ४० हजार (घरचे लोक असल्यास पैसे वाचतात) लाइट बिल ५ हजार, फर्निचर २ लाख ते ४ लाख, एसी १ लाख (लावल्यास), स्टॉक १५ ते ३० लाख (ठिकाणानुसार). तुम्ही २ ते ३ किमीपर्यंत घरपोच सेवाही देऊ शकता.
तुम्ही स्टोअर्सचं इ-कॉमर्स वेबसाइट व अॅपही बनवू शकता व ग्राहक त्यावर ऑर्डर देऊ शकतात. अगदी एक लीटर दूध, साखर, ब्रेड, केक इत्यादी काहीही. ह्या व्यवसायाची सरासरी विक्री ५० हजार ते १ लाखापर्यंत होते.
अंदाजे ७% प्रॉफिट मार्जिन मिळते. रोज ७ ते १४ हजारांचा नफा, महिना २ ते ४ लाखांचा नफा होतो. खर्च १ ते २ लाख वजा जाता निम्मे पैसे निव्वळ नफा म्हणून राहतात. हा उद्योग पूर्णपणे अॅटोमॅटिक नियंत्रित करता येतो.
बारकोड बिलिंग, सॉफ्टवेअर, सीसीटीव्ही कॅमेर्यांनी नियंत्रित करता येते. एकाच वेळी तुम्ही ४ ते ५ स्टोअर्स चालवू शकता. नोकरदार ज्यांच्याकडे २५ ते ३० लाखांचे भांडवल आहे तेसुद्धा हा उद्योग सुरू करू शकतात. फक्त रोज अर्धा तास वेळ देऊन हा उद्योग चालतो, कारण आता यंत्रणा स्वयंचलित झाली आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.