स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आय.टी. इंजिनीअर आणि व्यवसाय विश्लेषक असलेले मयूर देशपांडे यांचे हे पहिलेच पुस्तक. स्व-विश्लेेषण करण्यासाठीची एक कार्यपुस्तिकाच. ज्यात मानवी जीवनाच्या दहा पैलूंवर आधारीत ५० प्रश्नाचा संच समाविष्ट केला आहे. प्रत्येक पैलू त्याचे वर्णन, महत्त्व फार छान पद्धतीने मांडले आहे.
व्यक्तिमत्व विकासावर आधारित या पुस्तकात लेखकाने विल्यम नावाच्या एक मुलाची कथा वाचकांसमोर ठेवली आहे. वाचताना पुस्तकातील विल्यम्सची कथा म्हणजे आपलीच कथा वाटते. साध्या, सरळ, सोप्या भाषेत मांडलेल्या या कथेतून नक्कीच घरोघरचे विल्यम्स यशस्वी होतील, असे लेखकाचे मत आहे. छोट्याछोट्या गोष्टी स्वरूपात मांडलेला हा विचार खरंच खूप प्रेरणादायी आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
विल्यम हे पात्र, एक सामान्य मुलगा आहे जो आत्मप्रकटीकरणाच्या (परीक्षणाच्या) शोधात आहे. त्याचे वडील त्याला स्वत:च्या विश्लेषणाचा अर्थ जाणून घेण्यास मदत करतात. लेखकाच्या संकल्पनेप्रमाणे आरसा आपल्याला काय दाखवतो? जर आपल्याला शारीरिक स्वरूपापेक्षा काहीही दिसत नसेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही स्वत:ला खर्या आरशापासून मर्यादित ठेवलं आहे.
आपण स्वॉट विश्लेषणाबद्दल ऐकले असेल. लेखकाला असे वाटते की तुमची बलस्थाने, उणिवा, संधी आणि धोके समजून घेणे म्हणजे स्व-विश्लेषणाशिवाय दुसरे काही नाही आणि हा आरसा आहे जो आपल्याला या विश्लेषणात मदत करतो, पण त्यासाठी काचेपासून बनवलेला नुसता आरसा घेतलेला असेल तर आपण आपला आरसा बदलला पाहिजे.
तुमच्या आयुच्यातील विचार, भावना, नैतिक मूल्ये, प्रतिभा, बुद्धिमत्ता, शिक्षण आणि कौशल्य, छंद, प्रेरणा, सहकार्यांचा प्रभाव, संधी आणि आत्मपरीक्षण. या दहा पैलूवर आधारित प्रत्येकी पाच-पाच प्रश्न आणि या सर्व पैलूंचा प्रभाव आपल्या आयुष्यवर कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. पुस्तक अमेझॉन वा फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
– श्रेयस कुलकर्णी
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.