शीतपित्त हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. शीत म्हणजे थंड आणि पित्त म्हणजे उष्णता. शरीरातील उष्णता-थंडीचा समतोल बिघडला की शीतपित्ताचा त्रास दिसून येतो. या अवस्थेत त्वचेवर अचानक लाल रंगाचे मोठे चट्टे किंवा गांधी उठतात आणि तीव्र खाज, टोचणे व दाह जाणवतो. अनेकदा हा त्रास अती थंड पदार्थांचे सेवन, थंड हवेचा संपर्क किंवा रक्तातील उष्णता वाढल्यामुळे उद्भवतो.
शीतपित्ताची प्रमुख लक्षणे
1. अंगावर लाल रंगाचे चट्टे किंवा गांधी उठणे.
2. विंचूच्या चावल्यासारखी जळजळ व दाह
3. प्रचंड खाज, टोचणे
4. काहींना ताप, मळमळ किंवा उलटी
5. जास्त तहान लागणे
शीतपित्त व Hyperacidity होण्याची कारणे
- बिघडलेली पचनक्रिया व आम्लपित्त (Hyperacidity)
- काही औषधांची अॅलर्जिक प्रतिक्रिया
- अनिद्रा, जागरण किंवा दिवसा जास्त झोपण्याची सवय
- अती मसालेदार, खारट व प्रक्रिया केलेले अन्न
- थंड पदार्थांचे अति सेवन
- थंड हवेचा संपर्क किंवा थंड प्रदेशात राहणे
आहारातील वर्ज्य गोष्टी
- दूध व दुधाचे पदार्थ
- आंबवलेले, मसालेदार व तळलेले पदार्थ
- वाळवणाचे/मिठाचे पदार्थ, अन्नावरून मीठ घेणे, आंबट पदार्थ
- मांसाहार व मासे
- साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ
- दारू, थंड पाणी व इतर थंड पेये
- थंड हवेचा थेट संपर्क टाळावा
उपचार व काळजी
शीतपित्तावर उपचार करताना पचन सुधारणा, आहार-विहारातील बदल आणि शरीरातील उष्णता-थंडीचा समतोल राखणे महत्त्वाचे असते. निसर्गोपचार पद्धतीत वनस्पतीजन्य उपाय, आहारशिस्त व जीवनशैली सुधारणा यांवर भर दिला जातो.
Harshaz निसर्गोपचार येथे निसर्गोपचारतज्ज्ञ हर्षदा दिवेकर यांनी तयार केलेले काही वनस्पती उपचार उपलब्ध आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली त्यांचा वापर केल्यास शीतपित्ताच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📲 7517595646 | 📞 ७५१७५९५६४६
📍 वडगाव शेरी, पुणे
💬 WhatsApp: wa.me/917517595646?text=शीतपित्त
(टीप : कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे उपयुक्त ठरते.)
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

