सोशल मीडिया मार्केटिंगबद्दलचे गैरसमज


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


सर्वात पहिला गैरसमज, जो प्रत्येक वेळेला जाणवतो, तो म्हणजे सोशल मीडिया खूप वेळखाऊ आहे. वेळ वाया जातो व उद्योजक असून त्यांना त्यासाठी एवढा वेळ देणे शक्य नाही; काही अंशी हे बरोबर आहे, परंतु सोशल मीडियामध्ये काही टेक्निक्स आहेत, काही गोष्टी अशा प्रकारे आपण वापरू शकतो.

काही ऑटोमेशन टूल्स आहेत जे वापरून तुम्ही फेसबुक किंवा इतर सोशल मीडियामध्ये तुमच्या बिझनेसची मार्केटिंग अतिशय कमी वेळेत करू शकता. म्हणजेच केवळ दिवसातील पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचे सोशल मीडियावरील काम पूर्ण होईल. दुसरी गोष्ट अशी की, जेव्हा आपण फेसबुक वापरतो म्हणजेच आपण पोस्टवर पोस्ट बघतच जातो व त्यामुळे आपला बराचसा वेळ जातो व थोड्या वेळानंतर जाणवते की, यात खूप वेळ वाया गेला.

फेसबुकऐवजी फेसबुक पेजचे एक वेगळे अ‍ॅप मिळते जे बिझनेससाठी असते. तुमच्या बिझनेससाठी एक स्वतंत्र अ‍ॅप तुम्ही इन्स्टॉल करू शकता. त्या अ‍ॅपमध्ये तुम्हाला इतरांचे पोस्ट दिसत नाहीत. फक्त तुमच्या बिझनेसशी संबंधित डेटा दिसतो. तुमच्या बिझनेस पेजला किती लोकांनी लाइक केले, कमेंन्ट्स केलेय ते दिसते.

त्यामुळे तुम्ही ‘फेसबुक’ऐवजी ‘फेसबुक पेज’ हे अ‍ॅप वापरायला सुरुवात नक्की करा. तुमचा सोशल मीडियावर वेळ वाया जाणार नाही ही पहिली टीप आहे व वेळखाऊपणाचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे.

दुसरा गैरसमज आहे की, सोशल मीडिया फक्त तरुणांसाठी आहे; परंतु तसे नाही आहे. सोशल मीडिया हा प्रत्येक वयोगटासाठी आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आपण फेसबुक वापरत नव्हतो; परंतु फेसबुक आता जवळजवळ सर्व जण वापरत आहेत व ट्विटर, लिंक्डइन, फेसबुक यांसारख्या भागांत नुसते तरुणच नाही तर ४५ च्या वरच्या वयोगटातील लोकांचा वावर वाढला आहे. उदा. ‘स्नॅपचॅट’ नावाची एक सेवा आहे.

तो सोशल मीडियाचा एक नवा प्लॅटफॉर्म आहे. तो भारतात अजून फारसा रुजलेला नाही आहे, पण असे लक्षात येते की स्नॅपचॅट वापरणारे लोक जे आहेत, तरुणवर्ग आहेत म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारी, परंतु नंतर लक्षात आले की आई-वडीलही फेसबुकवर आहेत म्हणजेच मुलांच्या फेसबुकवरील प्रत्येक कृतीवर आई-बाबांचे लक्ष असू शकते म्हणून आताची तरुण मंडळी फेसबुक न वापरता स्नॅपचॅट वापरतात. फेसबुकवर त्यांचे प्रोफाइल असते, परंतु त्यांचे जास्त आकर्षण स्नॅपचॅटवर असते.

आता ही जी पिढी पुढे जाईल म्हणजेच काही वर्षांनंतर या पिढीला फेसबुक माहीतच नसणार, कारण ते त्यांचा अधिक वेळ स्नॅपचॅटवर असतात. त्यामुळे एक उद्योजक म्हणून जर तुम्ही आतापासूनच स्नॅपचॅट वापरायला सुरुवात केली म्हणजेच जर आतापासूनच स्नॅपचॅटवर मार्केटिंग सुरू केले, तर पुढच्या काही वर्षांत जे नवीन ग्राहक तयार होणार ते तुम्ही गाठू शकता, कारण काही वर्षांनी आजचे तरुण प्रौढ होतील. त्यामुळे सोशल मीडिया हे फक्त तरुणांसाठी आहे, हा एक गैरसमज आहे.

तिसरा गैरसमज आहे, No tracking. म्हणजेच बर्‍याच जणांचे असे मत आहे की सोशल मीडियावर जी मेहनत घेतली जाते, त्याचे परिणाम मोजता येत नाहीत. म्हणजे नक्की काय चालले आहे ते त्यांना कळत नाही; परंतु हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण सोशल मीडियावर तुम्ही सर्वात उत्तम प्रकारे tracking करू शकता.

तुम्ही जर रस्त्यावर एखादा बॅनर लावला तर तो बॅनर बघून तुमच्यापर्यंत किती व्यवसाय येईल हे तुम्हाला कधी सांगता येणार नाही. किती लोकांनी बघितला, किती लोकांचे त्याबद्दल काय मत आहे किंवा किती लोक खरेदीसाठी आले हे कधीही कळत नाही.

तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली तर ती आज असते, उद्या त्याची किंमत शून्य असते. शिवाय ज्या दिवशी जाहिरात दिली त्या दिवशी ती किती लोकांनी पाहिली हे मोजता येत नाही; पण सोशल मीडियामध्ये तसे नाही. इथे तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट track करता येते. तुम्हाला कोणत्या वेळेला hit, like जास्त मिळतात, कोणत्या भागातून म्हणजे मुंबई, पूणे, नागपूर…. वगैरे किती लोक तुमच्या वेबसाईटवर जात आहेत, किती लोक खरेदी करत आहेत.

हे सर्व tracking तुम्ही सोशल मीडियावर करू शकता. फेबसुक, ट्विटर, लिंक्डइन, युट्यूब प्रत्येक ठिकाणी तुम्ही tracking करू शकता. गुगल अ‍ॅनालिटिक्ससारखे बरेचसे टूल्स आहेत. हे टूल्स वापरून आपल्याला कस्टमरबद्दल अचूक माहिती सांगता येते. त्यांचे वय, शिक्षण, लिंग आदी पुष्कळ गोष्टी. शिवाय त्यांनी किती दिवसात किती वेळा क्‍लिक केले हे सर्व तुम्हाला track करता येतात व हे सर्व सोशल मीडियावर अतिशय सहज होऊ शकते.

यामध्ये तुमचा पैसा अजिबात वाया जात नाही, कारण तुम्हाला त्याबद्दल सर्व डेटा मिळत असतो. इतकेच नव्हे तुम्ही सोशल मीडियावर जाहिरात करत असताना Accurate targeting करू शकता, की ज्यामुळे तुमच्या इच्छुक ग्राहकांपर्यंत ती जाहिरात पोहोचते व तुमचा पैसा वसूल होतो.

पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की मार्केटिंगमध्ये ५० टक्के बजेट वाया जाते, कारण ते चुकीच्या लोकांमध्ये मार्केटिंग करण्यामागे जायचे; परंतु आता सोशल मीडियामुळे आपल्याला जवळजवळ ९०-९५ टक्के अचूक मार्केटिंग करणे शक्य आहे. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटिंग जरूर अनुभवा. जुनी मार्केटिंग पद्धती प्रत्येक बिझनेससाठी उपयोगी पडेलच असे नाही, त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग अवश्य करा.

– सलील चौधरी
९८१९१२८१६७
(लेखक ‘नेटभेट’ या ई-लर्निंग कंपनीचे संस्थापक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?