Advertisement
उद्योगोपयोगी

मिशन स्टेटमेंट म्हणजे काय?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


या आधीच्या लेखात आपण व्हिजन आणि व्हिजन स्टेटमेंट वर लिहिले होते. एकदा का व्हिजन स्टेटमेंट तयार झाले, त्यानंतर कंपनीने मिशन स्टेटमेंट लिहायला पाहिजे. या लेखात मिशन स्टेटमेंटबद्दल काही माहिती घेणार आहोत.

प्रख्यात मॅनेजमेंट गुरू पीटर ड्रकर यांनी मिशन स्टेटमेंटची व्याख्या केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “The mission statement has to express the contribution the enterprise plans to make to society, to economy, to the customer.”

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

मिशन स्टेटमेंट म्हणजे काय ?

सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर मिशन स्टेटमेंट हे एक वाक्य किंवा काही वाक्ये असतात, जी व्यवसायाची उद्दिष्ट आणि हेतू सांगतात. व्यवसाय काय, कसा आणि का याबद्दल माहिती देते. सगळे कर्मचारी, भागधारक, ग्राहक, पुरवठादार, बँक किंवा जे कोणी व्यवसायाशी निगडीत असतात, त्यांच्यासाठी मिशन स्टेटमेंट संदर्भ असते.

मिशन स्टेटमेंट आणि व्हिजन स्टेटमेंट यामधील फरक काय?

दोन्ही स्टेटमेंट वेगवेगळी आहेत, पण परस्परावलंबित आहेत. व्हिजन स्टेटमेंट भविष्याबद्दल आहे, तर मिशन स्टेटमेंट हे सद्यस्थिती बद्दल आहे. व्हिजन स्टेटमेंटमध्ये स्वप्न असतात, तर मिशन स्टेटमेंटमध्ये ती कशी पूर्ण होतील, ते असते.

उदाहरणार्थ ‘अमेझॉन’चं व्हिजन स्टेटमेंट,

“To be Earth’s most customer-centric company, where customers can find and discover anything they might want to buy online.”

याला अनुसरूनच, ‘अमेझॉन’चं मिशन स्टेटमेंट आहे,

“We strive to offer our customers the lowest possible prices, the best available selection, and the utmost convenience.”

मिशन स्टेटमेंट कसे लिहावे?

१) थोडक्यात लिहा. मोठा निबंध नको.
२) असे शब्द वापरा, जे प्रेरणादायक असतील आणि मार्गदर्शक ठरतील.
३) मिशन स्टेटमेंट हे दीर्घ काळासाठी हवं.

४) ग्राहक आणि आपली कार्यप्रणाली आणि आपण कसे वेगळे आहोत यांच्याबद्दल लिहा.
५) काम करण्याची इच्छित पातळी याबद्दल लिहा.
६) कंपनीचं उद्धिष्ट काय आहे आणि व्हिजन साध्य करायला काय करणार? याचा उल्लेख करू शकाल.

मिशन स्टेटमेंट लिहून झाल्यावर काय?

व्हिजन स्टेटमेंटशी सुसंगत आहे ते पाहावे. ते नसेल तर सुधारणा करा. कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता मिशन स्टेटमेंटशी असावी.

मिशन स्टेटमेंटची काही उदाहरणे :

1. Uber: We ignite opportunity by setting the world in motion.
2. Google: To organize the world’s information and make it universally accessible and useful.
3. Tesla: To accelerate the world’s transition to sustainable energy.

4. Instagram: Capture and share the world’s moments.
5. Disney: To make people happy.
6. Sony: To be a company that inspires and fulfills your curiosity.

– सीए जयदीप बर्वे
9820588298
Email: cajaideepbarve@gmail.com

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!