डेस्कटॉप इंजिनीअर ते मार्केटिंग सल्लागार

amol punde success story

मार्केटिंगचं कोणतंही लौकिक शिक्षण घेतलं नाही, पण तीच स्वतःची शक्ती बनवणारा मार्केटिंग सल्लागार तुम्हाला पाहायचा असेल, तर अमोल पुंडे याला आवर्जून भेटायला हवं. अमोल पुंडे एक तरुण, हरहुन्नरी आणि अतिशय पॉजिटिव्ह व्यक्तिमत्त्व.

‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गवारीत जे आहे त्यावर आपण कसे बेस्ट परफॉर्म करू शकतो याचा विचार करणारा उद्योजक. अमोलने बी. कॉम. झाल्यावर हार्डवेअर नेटवर्किंगचा कोर्स केला आणि एका खासगी कंपनीत डेस्कटॉप इंजिनीअर म्हणून आपल्या करीअरची सुरुवात केली.

नोकरीत दोन वर्षांत सर्व बढती घेऊन झाल्यावर त्याचं मन रमलं नाही. मग त्याने स्वत:चाच कॉम्प्युटरचे पार्ट्स सप्लाय करण्याच्या व्यवसाय सुरू केला; परंतु फक्त ट्रेडिंगचा हा व्यवसाय करण्यातला जो तोचतोपणा होता, त्यामुळे यातही मन रमेनासं झालं.

पुढे २०१३ मध्ये आनंद घुर्ये या उद्योग ज्योतिषांशी संपर्क आल्यानंतर अमोलला आपल्यातल्या अंगभूत कौशल्यांची ओळख होऊ लागली आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलने ‘मार्केटिंग सल्ला’ ही आपली कन्सल्टन्सी सुरू केली.

२०१३ पासून अमोलने अनेक उद्योजकांना मार्केटिंगविषयक मार्गदर्शन केलं आहे. त्याचं वैशिष्ट्य हे आहे की, त्याने स्वतः मार्केटिंगचं कुठलंही लौकिक शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे तो कोणत्याही थिअरी न मांडता थेट जो प्रश्न आहे, त्यावर प्रॅक्टिकल उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.

गेल्या आठ वर्षांत चहाच्या टपरीवाल्यापासून ते बीएमडब्ल्यूमधून फिरणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांना त्याने मार्केटिंगचे सल्ले दिलेले आहेत. कोणत्याही एकाच प्रकारच्या मार्केटिंगच्या प्रकारावर तो अडून न राहता अगदी पारंपरिक पत्रक वाटण्यापासून ते डिजिटल मार्केटिंगपर्यंत व्यवसायाची जी गरज आहे ती ओळखून तो सल्ले देतो.

दुसर्‍या बाजूला अमोलची फी आकारण्याची पद्धतही हटके आहे. समोरच्याला जे परवडेल यानुसार तो फी घेतो. समोरचा धंद्यात सेट झाला पाहिजे, हेच त्याचं एकमेव लक्ष्य असतं. दुसर्‍यांना मार्केटिंग शिकवत असताना अमोल फक्त कन्सल्टन्सीवरच न थांबता त्याने स्वतःचे इतर व्यवसायही सुरू केले आहेत.

WhatsApp Channel Banner

यामध्ये एक फूड सप्लाय, एक फार्मा कंपनी, डिझायनिंग एजन्सी, वेब डेव्हलपमेंट कंपनी यांचा समावेश होतो. फूड सप्लाय आणि फार्मा कंपनी या संधी अमोलकडे समोरून चालून आल्या. लोकांनी त्याचे कौशल्य बघून त्याला थेट भागीदार करून घेतला.

अमोलच्या या प्रवासात अडचणी अनेक आल्या, पण घरातल्यांची साथ आणि प्रोत्साहन हे त्याला भरपूर मिळालं. भविष्यात अमोल मार्केटिंग सल्ला हे कायम सुरू ठेवणार आहे, परंतु त्याला भविष्यात हे सल्ले मोफत द्यायचे आहेत.

संपर्क : अमोल पुंडे – ९८२००१७१७४

Table of Contents

Author

  • शैलेश राजपूत

    हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.
    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Register your business on the Maharashtra Business Directory and get a FREE LIFETIME SUBSCRIPTION to Smart Udyojak B2B Connect
Click here to Register
error: Content is protected !!
Scroll to Top