महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या वतीने शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी बेलापूर येथील महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात उद्योजकता विकास आणि उद्योगविकासाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत ‘Entrepreneurship Development Programme 2026–27’ अंतर्गत ‘आजची Business Idea – उद्याचा उद्योग!’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘कृषी व अन्नप्रक्रिया संधी – मधमाशीपालन: शेती, परागीभवन आणि व्यवसायाची संधी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मधमाशीपालन, शेतीतील परागीभवन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींबाबत सहभागी उद्योजकांना माहिती मिळणार आहे.
याच दिवशी सकाळी १०.०० वाजता ‘उद्योगविकास Apprenticeship Awareness Program – 2026’ आयोजित करण्यात आला आहे. Industries & Employers यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे. उद्योगांना Apprenticeship संदर्भातील संधी आणि प्रक्रियेची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र चेंबर कार्यालय, बेलापूर येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबरच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमांना उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन चेंबरच्या वतीने करण्यात आले आहे.
सदस्यांनी कार्यक्रमांना उपस्थित राहून चेंबरच्या उपक्रमांना बळ द्यावे, असे आवाहन CA किरण भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९६७६६५१०८ यावर संपर्क साधावा.





