1007 annual marketing

विश्वास नेरुरकर यांनी वयाच्या ६०व्या वर्षी निर्माण केला ‘Sankalp Honey’ हा नैसर्गिक मधाचा ब्रँड

sankalp honey brand page

मध हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे, जो केवळ गोडच नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. याच निसर्गदत्त देणगीला व्यावसायिक स्वरूप देत, विश्वास नेरुरकर यांनी ‘संकल्प हनी’ या ब्रँडची स्थापना केली. या लेखात आपण ‘संकल्प हनी’चा प्रवास, त्यामागील प्रेरणा व यशाची कहाणी समजून घेणार आहोत.

विश्वास नेरुरकर यांनी वयाच्या ६०व्या वर्षी हा ब्रँड सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. ‘संकल्प हनी’ हा ब्रँड २०२४ साली सुरू झाला असला, तरी त्याची मुळे १९९७ पर्यंत खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात महाराष्ट्रातील डहाणू तालुक्यातील घोलवड या गावात झाली.

घोलवड हे मधमाशीपालनासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे घोषित गाव आहे. जिथे निसर्गाची साथ आणि मधमाशीपालनाची परंपरा यांचा सुंदर संगम आहे. विश्वास यांनी हा व्यवसाय केवळ स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नव्हे, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संकल्पाने सुरू केला. इतरांना रोजगार उपलब्ध व्हावा या विचारांचा संकल्प होता म्हणूनच मग ब्रँडचे नाव ‘संकल्प हनी’ असे ठेवण्यात आले.

‘Sankalp Honey’च्या लोगोमध्ये जागतिक मधमाशीच्या रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे, जो या ब्रँडला पर्यावरणाशी जोडतो. विश्वास यांचा हा व्यवसाय सातत्य, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेशी असलेली बांधिलकी यावर उभा आहे. त्यांचा हा विश्वास आहे की, ग्राहकाला मध हे उत्कृष्टच दिले पाहिजे. त्यामुळे ‘संकल्प हनी’ १०१ टक्के गुणवत्तेची हमी देतो.

WhatsApp Channel Banner

‘संकल्प हनी’चे मध हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, ज्यामुळे मधाची शुद्धता आणि पौष्टिकता कायम राहते. हे मध तब्बल वीस वर्षे टिकू शकते, हीच त्याच्या उच्च गुणवत्तेची पावती आहे.

Sankalp Honey‘संकल्प हनी’ ५०० ग्रॅमच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत या ब्रँडने जवळपास ५०० बाटल्यांची विक्री केली आहे. विश्वास नेरुरकर यांच्याकडे मधमाशीपालनाच्या काही पेट्या आहेत. याशिवाय खात्रीशीर मधमाशीपालकांकडूनही ते मध घेतात. गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही.

हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे, म्हणजेच मधसंकलनाचा कालावधी ठराविक हंगामापुरता मर्यादित असतो. तरीही विश्वास यांच्या पाच जणांच्या चमूसह ते यशस्वीपणे हा व्यवसाय चालवतात.

डहाणूसारख्या दुर्गम डोंगराळ भागात व्यवसाय करताना अनेक आव्हाने येतात, विशेषतः वीज आणि साधनसामग्रीची कमतरता, परंतु विश्वास यांची जिद्द आणि सातत्य यामुळे त्यांनी या अडचणींवर मात केली आहे. विश्वास नेरुरकर यांचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले आहे.

९० च्या दशकात त्यांनी नोकरीचा प्रयत्न केला, पण त्यांना लवकरच जाणीव झाली की, नोकरी त्यांच्यासाठी नाही. त्यांनी इलेक्ट्रिकल क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. मधाच्या बाबतीत त्यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून ‘Sankalp Honey’ मधाचे लॅब टेस्टिंगही केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना गुणवत्तेची खात्री मिळते.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

‘संकल्प हनी’च्या माध्यमातून विश्वास नेरुरकर यांनी स्थानिक मधमाशीपालकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी इतर मधमाशीपालकांशी सहकार्य करून गुणवत्तेशी तडजोड न करता, अधिकाधिक लोकांना या व्यवसायात सामील करून घेतले आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही एक प्रकारे चालना मिळते व काही रोजगाराच्या संधीही निर्माण होतात.

वयाच्या साठाव्या वर्षी मराठी व्यक्तीने नवा ब्रँड सुरू करणे हे कौतुकास्पद आहे. विश्वास यांचा सातत्य आणि प्रामाणिकपणावरील विश्वास त्यांच्या यशामागील प्रमुख कारण आहे. ते म्हणतात, “ग्राहकाला उत्कृष्टच द्यायचे, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही.”

संपर्क : विश्वास नेरुरकर – ९८५००१६७४७

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription