स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
पेटीएम मनी हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन मंच आहे. पेटीएम मनीने जाहीर केले की त्यांचे यूझर्स आता त्यांच्या पेटीएम मनी अॅपवर त्यांच्या संपूर्ण म्युच्युअल फंड गुंतवणुकीची कामगिरी कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकतील. गुंतवणूकदारांना फक्त कार्वी फिनटेकद्वारा जनरेट करण्यात आलेले त्यांचे कन्सॉलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंट (CAS) पेटीएम मनीवर अपलोड करावे लागेल. तसे केल्यावर काही मिनिटांतच ते आपल्या पेटीएम मनी अॅपवरच आपल्या पोर्टफोलियोतील संपूर्ण गुंतवणुकीचा माग ठेवू शकतील.
भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदार एएमसी, बँका, सल्लागार आणि वितरकांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून गुंतवणूक करत आहेत त्यामुळे त्यांना या सर्व गुंतवणुकीची कामगिरी एकाच जागी पाहणे अवघड असते. पेटीएम मनीच्या या नवीन ऑफरिंगमुळे वर्तमान १८ दशलक्षपेक्षा जास्त म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांची सर्व गुंतवणूक एकाच जागी पाहण्याची सोय होईल तसेच त्यांनी गुंतवणूक कुठूनही केली असली तरी ते आपल्या पोर्टफोलियोच्या दैनिक कामगिरीचा देखील माग ठेवू शकतील.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
पेटीएम मनीचे पूर्णवेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “पेटीएम मनी वापरकर्त्यांकडून त्यांच्या बाह्य गुंतवणुकी आमच्या मंचावर आणण्यासाठी आम्हाला विनंती करण्यात येत होती.यामुळे गुंतवणूकदाराला एकाच जागी आपल्या संपूर्ण गुंतवणुकीचा माग ठेवण्यात आणि भविष्यात गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासही मदत होते. आमच्या इन्व्हेस्टर-फर्स्ट सिद्धांतास अनुरूप असे हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा अनुभव सोपा आणि चांगला करण्यासाठी पेटीएम मनी आपली उत्पादने आणि टेक्नॉलॉजी ऑफरिंग यात नावीन्य आणत आहे. या कंपनीने ३४ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीसोबत भागीदारी केली आहे, ज्यात म्युच्युअल फंड उद्योगातील ९४% पेक्षा जास्त एयूएम सामावले जात आहेत.
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.