एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वात लवकरच बदल होणार आहे. अनूप बागची यांची बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंजुरी दिली आहे. ते सध्याचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांची जागा घेतील.
एचडीएफसी बँकेने १ ऑक्टोबर २०२६ रोजी शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली. अनूप बागची २७ ऑक्टोबर २०२६ पासून आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. तो २६ ऑक्टोबर २०२९ रोजी संपेल.
सध्याचे सीईओ शशिधर जगदीशन यांचा कार्यकाळ २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी अनूप बागची यांच्याकडे येईल.
मात्र, अनूप बागची यांच्या नियुक्तीसाठी बँकेच्या भागधारकांची मंजुरी घेणेही आवश्यक आहे.





