सातवीत असताना हर्षदाचे वडील पोटात झालेल्या जर्जर काविळीने अकाली गेले. त्या वेळी त्यांचं वय जेमतेम ३५ च्या आसपास असेल. वयाच्या बाराव्या वर्षी हर्षदाच्या डोक्यावरून पितृछत्र हरपलं. आई विधवा, तर ती आणि तिचा धाकटा भाऊ दोघेही पोरके झाले.
वडिलांच्या जाण्याच्या धक्क्यामुळे सातवीत असलेल्या हर्षदाने चंग बांधला की, काविळीसारख्या दुखण्यामुळे जसे आपण पोरके झालो, तसं इतर कोणी होऊ नये. यासाठी प्रयत्न करायचे, असा निश्चय तिने केला. यातूनच जन्माला आली आजची निसर्गोपचारतज्ज्ञ हर्षदा दिवेकर.
हर्षदा दिवेकर ही मूळची पुण्याची. हर्षदाने कळायला लागल्यापासून कावीळचा अभ्यास करायला सुरुवात केली. ‘चरकसंहिते’सह या विषयातील अनेक पुस्तकं तिने वाचून काढली.
यातून एक गोष्ट तिच्या लक्षात येत होती की, कावीळ किंवा असे अनेक दुर्धर आजार हे आयुर्वेद किंवा आपल्या पारंपरिक उपचार पद्धतीने कायमचे बरे होऊ शकतात. म्हणजे ज्याला आपण आजीबाईचा बटवा म्हणतो, त्यातली बरीच औषधं ही संशोधन केली तर बरीच उपयुक्त आहेत.
हर्षदाने लौकिकदृष्ट्या डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हे शिक्षण केलं. पुढे तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिच्या आयुष्यात एक प्रसंग घडला ज्याने तिला पुन्हा वैद्यकीय क्षेत्राकडे ओढलं. एक दिवस रविवार असताना तिच्या नवर्याला अचानक मूतखड्याचा त्रास होऊ लागला.
रविवार असल्यामुळे योग्य वैद्यकीय उपचार मिळायला खूप उशीर झाला. दरम्यानच्या काळात तिचा नवरा त्रासाने विव्हळत होता. त्याचा हा असह्य त्रास पाहून तिने निर्धार केला की, अशा प्रकारे लोकांना ज्या ज्या दुर्धर व्याधींचा त्रास होतो, त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करणार.
यामुळे हर्षदाने निसर्गोपचार या ज्ञानशाखेकडे जाण्याचे निश्चित केले. नाशिकला एका नामांकित संस्थेच्या माध्यमातून तिने निसर्गोपचाराचा डिप्लोमा पूर्ण केला. स्वत: अध्ययन करून मिळवलेलं ज्ञान आणि निसर्गोपचाराचे घेतलेले धडे यातून तिने विविध आजारांवर स्वत: घरात औषधं तयार करायला सुरुवात केली.
तिने पहिलं औषध पाठवलं ते मुंबईजवळ पालघरला आणि एका आठवड्यातच रुग्णाचे ६ खडे पडले. या पहिल्याच यशातून तिला आपण निवडलेला मार्ग योग्य असल्याची खात्री झाली आणि तिचा निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणून प्रवास सुरू झाला. गेल्या पाच-सहा वर्षांत हर्षदा दिवेकर यांनी ३५० हून अधिक रुग्णांना बरं केलं आहे.
हर्षदाचे अनुभवच तिच्या वैद्यकीय कामाची पोचपावती देतात. एका तरुणाच्या किडनीत ११ खडे झाले होते. त्याच्या घरच्यांनी त्याला पुण्यातल्या एका मोठ्या रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून तरुणाच्या किडनीला दुखापत झाली. तो महिनाभर आयसीयूत होता.
त्यानंतर दोन महिन्यांनी ते हर्षदाकडे उपचारासाठी गेले. हर्षदाने पहिल्या दिवशी रुग्णाला चुंबकचिकित्सा दिली आणि पहिल्याच दिवशी ४.५ मी.मी.चा स्टोन पडला. चार दिवसांनी आणखी एक स्टोन पडला. २० दिवसांनी ४ आणखी स्टोन्स पडले आणि ४ विरघळले.
एक व्यक्ती संधिवातासाठी दिवसा तीन गोळ्या खात होता इतका त्याला संधिवाताचा त्रास वाढला होता. त्याने यासाठी सेकंड ओपिनियन घ्यावी म्हणून निसर्गोपचारतज्ज्ञ हर्षदा दिवेकरला आपल्या घरी बोलावलं. कारण तो स्वत: तिच्यापर्यंत जाण्यासही सक्षम नव्हता.
हर्षदा त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा तिला एक गोष्ट कळली की, याच व्यक्तीचं दुसर्या दिवशी मूळव्याधीचं ऑपरेशन होतं. तिने त्याला संधिवाताबद्दल तपासणी करून उपचार सुरू केलेच, पण त्यासोबत तिने त्या रुग्णाला मूळव्याधीबद्दलही पुन्हा एकदा विचार करायला सांगितला.
दुसर्या दिवशी ऑपरेशन आणि आदल्या दिवशी पुन:विचार करणे, तो माणूस बराच विचारात पडला. हर्षदाची नऊ दिवसांची ट्रीटमेंट होती. तिने त्यांना विश्वास दिला की, हे नऊ दिवस तुम्ही स्वत:ला देऊन तर बघा, नाही तर तसेही तुम्ही ऑपरेशनसाठी तयारच आहात.
हर्षदावर विश्वास ठेवून तिच्याकडून नऊ दिवसांची ट्रीटमेंट करून घ्यायला तो रुग्ण तयार झाला. आश्चर्य म्हणजे या नऊ दिवसांच्या ट्रीटमेंटनंतर त्याला आजपर्यंत कधीही मूळव्याधीसाठी ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही. हर्षदा त्याच्याकडे ज्यासाठी गेलेली त्या रुग्णाचा संधिवात तर बरा झालाच, त्याचसोबत मूळव्याधही कायमची बरी झाली.
हर्षदा दिवेकरला तिच्या आतापर्यंतच्या या वैद्यकीय कारकीर्दीत असे अनेक अनुभव आले आहेत. दु:खी आणि त्रस्त चेहर्याने तिच्याकडे येणार्या अनेकांच्या चेहर्यावर तिने हसू आणले आहे आणि यातच तिला खरं समाधान आहे.
तिचे रुग्ण आज पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई, नाशिक, गोवा, हिंगोली, औरंगाबाद ते नागपूर असे महाराष्ट्रभरातून लोक तिच्याकडे आपली दुखणी घेऊन येतात.
या दरम्यान हर्षदाला एक गोष्ट लक्षात आली की, अनेक रुग्णांना त्यांच्या व्याधीपायी दूर प्रवास करून पुण्यापर्यंत येता येत नाही. म्हणून तिने रुग्णाची माहिती घेऊन त्याला कुरिअरद्वारे औषध पाठवायला सुरुवात केली आहे. याचा महाराष्ट्राभरातील रुग्णांना फायदा झाला. महाराष्ट्रभरातून तसेच शेजारील राज्यांतूनही हर्षदाकडे रुग्णांचा ओघ वाढू लागला.
हर्षदा दिवेकरच्या निसर्गोपचारांची माहिती अनेकांना तिच्याकडून बरे होऊन गेलेल्या रुग्णांकडूनच होते; परंतु अनेकांना या उपचार पद्धतीचा लाभ व्हावा म्हणून आता तिने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारेही लोकांना याची माहिती द्यायला सुरुवात केली आहे.
तिच्याकडे आता मूळव्याध, मूतखडा, संधिवात, गुडघेदुखी, थायरॉइड, आम्लपित्त, लठ्ठपणा, सायनस, मायग्रेन, कानाचे विकार, गुडघ्यांची झीज आदी दुखण्यांसाठी दूरदुरून लोक येत असतात. हर्षदा दिवेकरला आपल्या कामाद्वारे लोकांची सेवा करता येते यामुळे ती खर्या अर्थाने समाधानी आहे.
संपर्क : हर्षदा दिवेकर
७५१७५९५६४६
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.