उद्योगोपयोगी

गृहोद्योगापासून, यशस्वी उद्योगिनीपर्यंत झेप घेऊ शकते महिला उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मुलगी शिकली आणि प्रगती झाली, ‘स्त्री’ची आपल्या समाजातील प्रतिमा हळूहळू बदलली. खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने हा बदल घडतोय. आजची स्त्री ही अधिक कार्यक्षम आणि धडाडीची झालीय. या पुरुषप्रधान समाजात संघर्षाने तिने स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण उद्योग क्षेत्रात आजही म्हणावं तसं तिचं अस्तित्व आजही जाणवत नाहीय.

भारतात उद्योग क्षेत्रात स्त्रियांना खूप वाव आहे. गरज आहे जास्तीत जास्त स्त्रियांनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याची. व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा वाढतोय ही समाधानकारक बाब नक्कीच आहे. घर, संसार, मुलं या सर्वांची जबाबदारी सांभाळत व्यवसायात उतरताना काही गोष्टी स्त्रियांनी जाणून घ्याव्यात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

‘गृहोद्योगा’पासून सुरुवात करणं कधीही चांगलं. घरच्या घरी इतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळून करता येणारे अनेक उद्योग आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये एकतर स्वत:च्या वेळेनुसार काम करता येते. गुंतवणूकही कमी लागते आणि आवडीतूनच व्यवसायाची निवड केल्यामुळे समाधानही मिळते.

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. हे खरंही आहे म्हणूनच याच गरजेतून गृहोद्योग उभे राहतात. उदा. घ्यायचं झालं तर विणकाम, मेणबत्ती, पणती बनवणं, पाळणाघर सुरु करणं, ब्युटीपार्लर, मसाला उद्योग, छंदवर्ग, ज्वेलरी तयार करणं, माशांची शेती, एक ना अनेक हजारो पर्याय उपलब्ध होतात. परंतु कोणत्याही व्यवसायात उतरताना प्रथम त्या व्यवसायाचा अभ्यास करून मगच पुढचं पाऊल टाकावं.

छोट्या उद्योगांपासून सुरुवात करून मोठे झालेले अनेक उद्योग आहेत. त्यापैकीच आपल्या सर्वांना माहित असलेला ‘लिज्जत पापड’. काही महिलांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा उद्योग. सुरुवातीला घरच्या घरी पापड बनवत. हळूहळू हा व्याप वाढत गेला. आणि आज हा एक ‘ब्रांड’ तयार झालाय. आज पापड म्हटलं की पटकन तोंडात येतं ते नाव म्हणजे, ‘लिज्जत पापड’.

म्हणूनच स्वतंत्रपणे जमत नसेल तर काही महिलांनी एकत्र येऊनही एखादा उद्योग सुरू करायला हरकत नसावी. बचत गटांच्या माध्यमातून अनेक व्यवसाय आज उभे राहताहेत. घरगुती गरजेच्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन आज अनेक स्त्रिया गटा-गटाने घरगुती उत्पादनांचे व्यवसाय करतात.

महिलांसाठी अनेक सरकारी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जातायेत. गरज आहे त्याची माहिती करून घेण्याची. उदाहरणादाखल हे काही मुद्दे.

  • आपल्याकडे आज एकूण लघुद्योगांपैकी कमीत कमी ९% उद्योग हे महिलांच्या मालकीचे आहेत.
  • उद्योग व्यवसायातील स्त्रियांच्या समभागाला राज्य व केंद्र शासनाकडून मोठे प्रोत्साहन दिलं जातं.
  • स्त्रियांसाठी शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्यात. ज्याच्या माध्यमातून ‘उद्योजकता’ विकासाला चालना मिळतेय.
  • महिला बँक आणि महिलांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था भांडवल पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावल्यात.
  • महिलांसाठी विशेष अनुदान योजना, कर्जपुरवठा योजना व कर सवलतीच्या योजना राबवल्या जातायत.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्त्रियांकडे काही उपजत गुण असतातच. यामुळे महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना हेरून जास्तीत जास्त स्त्रियांनी व्यवसायाकडे वळायला हवं. स्त्रियांना उपजतच वेळेचे नियोजन, व्यवहार, आर्थिक अंदाजपत्रक, संवाद कौशल्य, सामंजस्य अशा उद्योजकाला लागणाऱ्या गुणांची शिदोरी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हे फायदेशीरच ठरते.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!