Advertisement
उद्योगवार्ता

नीओग्रोथची पीओएस आधारित कर्ज व्यवसायात १०० टक्के वृद्धीची नोंद

तुम्ही उद्योजक आहात का?

जर असाल, तर 'महाराष्ट्र उद्योजक सूची'मध्ये आजच आपली नोंद करा आणि अगणित लाभ मिळवा.

अधिक माहितीसाठी : udyojak.org/join-udyojak-list/

Print this Page

मुंबई, ४ फेब्रुवारी २०१९: भारतात एसएमईंकरिता डिजिटल कर्जाचे प्रवर्तक नीओग्रोथने गेल्या वर्षी लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना पीओएस आधारित कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पैसाबाझारडॉटकॉमसह भागीदारी केली होती. या भागीदारीनंतर नीओग्रोथ आणि पैसाबाझार.कॉमने आपल्या पीओएस आधारित व्यवसायात गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत १०० टक्के व्यवसाय वृद्धीची नोंद केली आहे.

नीओग्रोथ आणि पैसाबझार.कॉम यांनी आज एका संयुक्त निवेदनात संगितले की “हा एक मैलाचा दगड आहे, जो आर्थिक सेवा क्षेत्रात डिजिटलायझेशनचे महत्त्व अधोरेखित करतो आणि एसएमई क्षेत्रासाठी कर्ज उपलब्धतेची शक्यता आणखी वाढवतो आहे.”

नीओग्रोथचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक पियुष खैतान (पीके) म्हणाले, “इतक्या कमी अवधीत प्राप्त झालेल्या या सिद्धीबद्दल मला खूप आनंद आहे आणि पैसाबाझार.कॉम टीमचे मी त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल आभार मानतो. आम्हाला आणखी यशाची शिखरे सर करायची आहेत. हा सहयोग नक्कीच अधिक यशस्वी आणि वृद्धिंगत होईल अशी मला आशा आहे.”

पैसाबझार.कॉम मंचावर उपलब्ध नीओग्रोथच्या पीओएस आधारित कर्जात कर्जदाराच्या आऊटलेटवरील स्वाईपमशीनवरून होणा-या डिजिटल खर्चावर आधारित विश्लेषणात्मक अंडररायटिंगचा तसेच इतर इतर पर्यायी डेटाचा समावेश आहे. या कर्जांमध्ये दररोज पैसे भरण्याची सुविधा आहे, जे या कर्जांचे ठळक वैशिष्ट्य आहे.

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: