Advertisement
उद्योगवार्ता

FSSAI नोंदणीसाठी नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म कार्यान्वित

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


“भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरण खाद्य सुरक्षा अनुपालन व्यवस्था (Food Safety Compliance System – FoSCoS) या नावाने क्लाउड-बेस्ड, अद्ययावत नवीन खाद्य सुरक्षा अनुपालन ऑनलाईन प्लॅटफॉर्म जारी करत आहे”, असे सदर नियामक संस्थेने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले.

FSSAI शनिवारी नियमनाशी संबंधित अशा कंपलायन्ससाठी आणि खाद्य व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी नोंदणी आणि परवाना देण्यासाठी नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केल्याचे सांगितले. २०११ पासून एफएलआरएस (Food Licensing and Registration System) या संस्थेच्या ऑनलाईन परवाना व्यवस्थेच्या माध्यमातून आजतागायत ७० लाख परवाने जारी करण्यात आल्या. यांपैकी ३५ लाखाहून अधिक वापरकर्ते अजूनही सदर प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे व्यवहार करत आहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

यापुढे संकेतस्थळ foodlicensing.fssai.gov.in च्याऐवजी foscos.fssai.gov.in असे असेल.

खाद्य व्यवसाय चालवणाऱ्यांच्या विभागासोबत कोणत्याही नियमनाशी संबंधित कंपलायन्सच्या व्यवहारासाठी एक थांबा उपाय या स्वरूपात या नवीन प्लेटफॉर्मची रचना करण्यात आली आहे, असे एफएसएसएआयकडून सांगण्यात आले.

हा नवीन प्लॅटफॉर्म संस्थेच्या मोबाईल app सोबत जोडले गेला असून भविष्यात इतर IT प्लॅटफॉर्म सोबतसुद्धा लिंक केला जाईल.

एकच नियामक प्लॅटफॉर्म असल्यामुळे कोणत्याही खाद्याशी संबंधित गैरव्यवहाराला अखंड देश अंतर्भूत असेल अशी प्रतिसाद-पद्धती निर्माण होईल आणि प्रगत जोखीमवर आधारित, डेटा ड्रिव्हन हाताळणीबद्दल खातरजमा होईल.

सुरुवातील फोस्कोस (FoSCoS)च्या माध्यमातून परवाना देणे, नोंदणी, निरीक्षण आणि वार्षिक परतावा संच या सेवा दिल्या जातील” असे एफएसएसएआयकडून सांगण्यात आले.


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!