उद्योगवार्ता

विदेश व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ न राहता ‘सुविधा’ देण्यावर भर द्यावा : सुरेश प्रभु

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

विदेश व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ म्हणून काम न करता व्यापाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभु यांनी दिला. नवी दिल्लीत या विभागाच्या पोर्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. देशभरातील क्षेत्रीय अधिकारी या दोन दिवसीय बैठकीत सहभागी झाले होते.

आज भारतासाठी परदेशी व्यापार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांचे काम एक आव्हान म्हणून स्वीकारावे, असे प्रभू म्हणाले. निर्यातीला चालना देण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांसोबत मिळून काम करावे, असे ते म्हणाले. निर्यातवाढीसाठी महासंचालनालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

Advertisement

विशिष्ट जिल्ह्यांमधली निर्यातक्षम उत्पादने हेरून त्यांच्या निर्यातवाढीसाठी आवश्यक त्या सुविधा अधिकाऱ्यांनी स्थानिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगत, या कामासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाईल, असेही प्रभू म्हणाले.

Help-Desk
%d bloggers like this: