1007 annual marketing

उद्या पुण्यात MCED आणि MSSIDC तर्फे उद्योजकांसाठी एक दिवसीय शिबीर

महाराष्ट्र केंद्र उद्योजकता विकास (MCED) आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MSSIDC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उद्या, ३० जुलै रोजी पुण्यात एकदिवसीय मोफत प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर ‘रायझिंग अँड ॲक्सिलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स (RAMP)’ उपक्रमांतर्गत जागतिक बँक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME) यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे.

या शिबिरात विद्यमान उद्योजक, विशेषतः महिला आणि SC/ST नेतृत्वाखालील MSMEs साठी ज्ञानवृद्धी आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये GeM (गव्हर्नमेंट ई-मार्केट) प्रशिक्षण आणि डिजिटल कर्ज अर्ज कार्यक्रम यांचा समावेश आहे.

हे शिबिर ३० जुलै २०२५ रोजी MCED कार्यालय, कृषी महाविद्यालय परिसर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून, त्याचा कालावधी एक दिवस असेल. प्रत्येक कार्यक्रमात ६० सहभागी सामील होऊ शकतील.

सहभागी होण्यासाठी उद्योजकांना उद्यम registration certificate (अनिवार्य), आधार कार्ड, LC/TC आणि पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे सादर करावी लागतील.

WhatsApp Channel Banner

या शिबिरात उद्योजकांना स्पर्धात्मक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. इच्छुकांनी लवकर नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी खाली देत असलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक.

https://forms.gle/RtJMiZMoz1T78KQbA

 

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

Sponsored Article

तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.

🚀 अधिक माहिती

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription