उद्योजक, MSME आणि स्टार्टअपसाठी दोन दिवसांची ज्ञान मिळवण्याची आणि नेटवर्किंगची पर्वणी
महाराष्ट्रातील उद्योजक, MSME, स्टार्टअप्स आणि नवउद्योगांना एकत्र आणणाऱ्या ‘बिझनेस जत्रा २०२६’ चे आयोजन ९ व १० जानेवारी २०२६ रोजी ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे करण्यात आले आहे. Entrepreneurs United… Opportunities Unlimited! या संकल्पनेवर आधारित ही जत्रा प्रदर्शन, परिषद आणि व्यावसायिक संधी यांचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
या बिझनेस जत्रेमध्ये उद्योगविश्वातील मान्यवर तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मार्गदर्शक सहभागी होणार असून, दोन दिवस चालणाऱ्या परिषदांमधून उद्योजकतेचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत.
पहिला दिवस : ९ जानेवारी २०२६
नेतृत्व, उद्योजकता आणि MSME वाढीवर भर
परिषदेची सुरुवात सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभाने होणार आहे. त्यानंतर महिलांचे नेतृत्व आणि व्यवसायातील त्यांची भूमिका या विषयावर “Empowered Leadership: Women Shaping the Business World” हे सत्र होणार आहे.
दुपारी MSSIDC – Raising and Accelerating MSME Performance (RAMP) या विषयावर MSME साठीच्या शासकीय उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
उद्योजकतेवर मुक्त संवाद साधत डॉ. सुरेश हावरे “Let’s Talk about Entrepreneurship” या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी नादब्रह्म इडली या यशस्वी ब्रँडची प्रेरणादायी कथा – From Batter to Brand – सादर होणार आहे. यानंतर डॉ. ओंकार माळी निर्यात क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकतील.
सायंकाळच्या सत्रांमध्ये Saturday Club आणि मराठी उद्योजकतेची भूमिका, ध्येय निर्धारण व नियोजन – ‘Climbing Everest’, तसेच भांडवली बाजाराच्या मदतीने MSME व्यवसाय कसा वाढवावा यावर सखोल चर्चा होणार आहे.
दुसरा दिवस : १० जानेवारी २०२६
संधी, नवकल्पना, गुंतवणूक आणि ब्रँड बिल्डिंग
दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी लक्ष्यवेधी वुमन अचिव्हर अवॉर्डने होणार आहे. यानंतर डॉ. उदय निर्गुडकर Opportunity Mindset या विषयातून उद्योजकांचा दृष्टिकोन कसा विकसित करावा यावर मार्गदर्शन करतील.
MSME साठीच्या निर्यात प्रोत्साहन योजना, Agri 360 – कृषी उत्पादने, पर्यटन आणि तंत्रज्ञान, तसेच SIP द्वारे संपत्ती निर्मिती या विषयांवर उपयुक्त सत्रे होणार आहेत.
दुपारनंतर NPA to Revival – संकटातून संधी कशी निर्माण करावी, परंपरेतून नवकल्पनेकडे – विश्वासार्ह ब्रँड उभारणी, आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगातील यशस्वी सूत्रे यावर चर्चा होईल.
सायंकाळी Astro–Vastu–Numero पॉवरद्वारे व्यवसाय वाढीचे गुपित, तसेच डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे Healthy Leaders, High Performing Businesses हे विशेष सत्र होणार असून, सायंकाळी ७.३० वाजता समारोप समारंभाने या भव्य बिझनेस जत्रेची सांगता होणार आहे.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीउद्योजकांसाठी सुवर्णसंधी
‘बिझनेस जत्रा २०२६’ ही केवळ परिषद नसून, उद्योग प्रदर्शन, नेटवर्किंग, सरकारी योजना, गुंतवणूक संधी आणि प्रेरणादायी यशोगाथांचा संगम आहे. नवउद्योजक, MSME मालक, महिला उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी ही जत्रा निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.
ठाण्यात होणाऱ्या या दोन दिवसांच्या बिझनेस महाकुंभाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

