नवी मुंबई (प्रतिनिधी) – मराठी भाषा आणि उद्योजक चळवळीतील एक प्रमुख मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे निलेश पालेकर यांचे काल रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने कोपरखैरणे येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पालेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तसेच कार्डियाक अरेस्टमुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
निलेश पालेकर हे मराठी उद्योजकतेसाठी कार्य करणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. मराठी भाषेच्या जतन आणि प्रसारासाठी तसेच उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे कार्य केले. त्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने अनेकांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीनिमित्त २० जून हा ‘जागतिक मराठी उद्योजक दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या संकल्पनेचे ते जनक होते. त्यांच्या या उपक्रमामुळे मराठी उद्योजकांना एक नवे व्यासपीठ मिळाले.
त्यांच्या निधनामुळे मराठी उद्योजक व भाषा चळवळीला मोठा धक्का बसला असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य अनुयायी असा मोठा परिवार आहे.
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

