1007 annual marketing

‘उद्योग करावा नेटका’ मराठी उद्योजकांसाठी उद्या मुंबईत मार्गदर्शन शिबिर

प्रत्येक उद्योजक आपला उद्योग नेटका आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही अनेकदा त्याला करोडोंची उंची गाठता येत नाही. बँकेकडून कर्जासाठी तगादा लावावा लागतो. यामागील कारण काय?

स्टार्टअप क्षेत्रात अनेक उद्योजक एंजल इन्व्हेस्टर्सकडून सहज फंडिंग मिळवतात, उत्कृष्ट मनुष्यबळ जमवतात आणि त्यांची कंपनी वेगाने प्रगती करते. त्यांची विक्री आणि टॉपलाईन दरवर्षी भूमितीय गतीने वाढते. मग मराठी उद्योजकांना असं यश का मिळत नाही? पारंपारिक उद्योगांमध्ये हे शक्य आहे का?

स्टार्टअप ही संकल्पना गेल्या दहा वर्षांपासून भारतात रुजली आहे, पण मराठी उद्योजक समूह अजूनही जुन्या शासकीय योजना आणि अनुदानांवर अवलंबून आहे. स्टार्टअप क्षेत्राने उघडलेलं नवं दालन आणि त्यातून मिळणाऱ्या संधींकडे आपण का दुर्लक्ष करतो?

एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटल आणि स्टार्टअप IPO सारख्या संधी उद्योजकांना फंडिंग आणि यश मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत. जुन्या विचारसरणीतून बाहेर पडून या नव्या जगाचा वेध घेण्याची वेळ आता आली आहे.

मराठी उद्योजकांना स्टार्टअप क्षेत्रातील संधी आणि यशाचं गमक समजावून देण्यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि स्टार्टअपच्या नव्या दुनियेत कसं यशस्वी व्हायचं, हे सांगतील.

WhatsApp Channel Banner

कार्यक्रम उद्या, रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मुंबईत दादर येथे शिवाजी नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी सीएस हर्षद माने यांना 9967706150 या क्रमांकावर संपर्क करावा.

Table of Contents

Author

तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा

तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.

'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:

  • ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
  • ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
  • ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
  • ✅ सोशल मीडिया प्रमोशन

तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.

🚀 येथे क्लिक करा
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart-Udyojak-5-years-subscription