संकटात संधी शोधणे किंवा चालून आलेल्या संधीचे वेळीच सोने करायला जमले की एका नव्या गोष्टीचा जन्म होतो. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काम गेली. संपूर्ण जग ठप्प झाले. यातूनच डिजिटलचे महत्त्व अधोरेखित झाले.
येणारा काळ हा डिजिटल आहे आणि प्रत्येकाला हे जमायलाच हवे हेही प्रकर्षाने जाणवले. यातूनच जन्म झाला तो तुषार रायते यांच्या NextgenDigiHub Academy (नेक्सटजेनडिजिहब अकॅडेमी) चा.
ग्रामीण भागात असलेली डिजिटल मार्केटिंग क्षेत्राची गरज ओळखून संपूर्ण देशभर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून लोकांना या विषयी शिक्षित करण्याचे लक्ष्य बाळगून असलेली NextgenDigiHub Academy ही उत्तर महाराष्ट्रामधील धुळे येथील पहिलीच डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे.
धुळे जिल्यातून शिक्षण पूर्ण करून आपल्या प्रवासाची सुरुवात तुषार यांनी पुण्यामधून केली. पुण्यात आल्यावर प्रथम डिजिटल मार्केटिंग क्षेत्राशी त्यांची ओळख २०११ मध्ये झाली. मुळातच विविध गेझेट्स आणि टेक्नोलॉजीची आवड असल्याने त्यांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात लागलीच आवड निर्माण झाली आणि या विषयात मिळेल तेवढे ज्ञान स्वअभ्यासाने गोळा करून तुषार यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
गुगल, फेसबुक तसेच अनेक आंतराष्ट्रीय कंपनीसोबत काम करत तुषार स्वतःची वाट तयार करत गेले. चारशेपेक्षा अधिक ब्रॅण्डसोबत काम केल्याचा अनुभव असलेल्या तुषार यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे.
आपल्या ज्ञानाचा उपयोग नोकरीत एखाद्या कंपनीला देऊन त्याचा मोबदला घेण्यापेक्षा स्वतःच थोडी जोखीम पत्करून आपला नफा घ्यायला काय हरकत आहे, असे तुषार म्हणतात.
पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या मुलांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्राचे महत्त्व आणि माहिती असते, पण ग्रामीण भागात हे प्रमाण तसेच या क्षेत्राबद्दलची जागरूकता कमी आहे मग आपण त्यांना याचा फायदा करून द्यायला हवा असे सतत तुषार यांना वाटत होते.
अशातच कोरोना आला आणि संपूर्ण जगाचे चक्रच बदललं. डिजिटलची गरज प्रकर्षाने वाढली. याच पार्श्वभूमीवर तुषार यांनी NextgenDigiHub Academy ची सुरुवात केली.
स्व–अध्ययनाने शिकलेले कधीही विसरले जात नाही, यावर ठाम असलेल्या तुषार यांच्या कंपनीचा म्हणूनच रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप चांगला आहे. तसेच ग्रामीण क्षेत्रामधील जनतेला शिक्षित करणे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग तसेच भविष्यातील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामधील असेलेले महत्त्व पटवून त्याबद्दल जागृत करणे हे तुषार यांचे मुख्य लक्ष्य आहे.
सामाजिक उत्तरदायित्वचे भान जपून देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या म्हणजेच (मिलिटरी, पोलीस इत्यादी दलातील) सदस्यांच्या परिवारास डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील शिक्षण हे तुषार यांच्या संस्थेतर्फे मोफत दिले जाते.
आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे जनक असतो तेव्हा अनेक प्रकारची आव्हाने सतत समोर असतात. डिजिटल क्षेत्रात काम करताना तेसुद्धा ग्रामीण भागात काम करताना आपल्याला हे ठाऊक आहे की लोक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करतात, पण त्याविषयी अधिक जागरूक नसतात तसेच यातील संधी त्यांना माहीत नसतात.
त्याविषयी त्यांना माहिती करून देणे, शिकवणे आव्हानात्मक आहे. परंतु तुषार रायते आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे. याची सुरुवात त्यांनी स्वत:च्या घरापासून म्हणजेच धुळे जिल्ह्यापासून केलीय.
NextgenDigiHub Academy ही संस्था एक डिजिटल मार्केटिंग कंपनीवर आधारित संस्था आहे. जानेवारी २०२१ पासून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमध्ये दोन प्रकारचे कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच डिजिटल मार्केटिंग आणि अन्य प्रकारच्या सेवादेखील यामार्फत दिल्या जातात.
NextgenDigiHub Academy संस्थेमार्फत दोन महिन्यांचा डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल कोर्स ज्यात एकूण ३२ प्रकारची मॉड्युल्स आहेत. ती शिकवली जातात आणि त्यासोबत कोर्से कंम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जाते.
दुसरा कोर्स, ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकविला जातो, जो ४ महिन्यांचा आहे, ज्यामध्ये ३ महिने कोर्स ज्यात एकूण ५२ मॉड्युल्स आहेत, सोबत एक महिना इंटर्नशीपदेखील दिली जाते. त्याचसोबत कोर्स आणि इंटर्नशीप या दोन्हीची वेगळी सर्टीफिकेट त्यांना दिली जातात.
या कोर्सच्या आधारे कोर्स करणारी व्यक्ती कुठेही डिजिटल मार्केटर म्हणून नोकरी करू शकते किंवा स्वतःचा स्वतंत्र व्यवसायदेखील सुरू करू शकते. या शिवाय कंपनीकडून डिजिटल मार्केटिंग सर्विस, वेबसाइट डिझाईन अँड डेव्हलपमेंट सर्विस, ग्राफिक डिझाईन अँड व्हिडीओ प्रोडक्शन सर्विस, तसेच पीआर सर्विस अशा अनेक प्रकारच्या सेवादेखील दिल्या जातात.
तुषार याना वाचनाची आवड आहे. स्वत:साठी काढलेला वेळ हा ते त्यांच्या ज्ञानाला वाढवण्यात आणि नवनव्या घडामोडींचा अभ्यास करण्यास देतात तसेच संपूर्ण देशभर विशेषतः ग्रामीण क्षेत्रात डिजिटल शिक्षणाचे जाळे उभे करण्याचे लक्ष्य तुषार बाळगून आहेत. त्यासाठी तुषार रायते आणि त्यांची टीम झपाट्याने कामाला लागली आहे.
संस्थेचे नाव : NextgenDigiHub Academy (नेक्सटजेनडिजिहब अकॅडेमी)
संस्थेचा पत्ता : 2nd Floor, Balaji Towers, Datta Mandir Chowk, Deopur, Dhule
संस्थेचा ई–मेल : connect@nextgendigihub.com
संस्थेचा संपर्क क्रमांक : 9561670529
संस्थेची वेबसाईट : http://nextgendigihub.com
तुषार रायते वेबसाईट : http://www.tusharrayate.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.