Advertisement
कथा उद्योजकांच्या

नवसंकल्पनांच्या ऊर्जित उगमस्थानाचे बीज

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

श्रीगणेश म्हणजे 14 विद्या, 64 कलांचा अधिपती. त्याच पद्धतीने एका व्यक्तीत अनेक कलागुण सामावलेले असले की, त्याला आपण अष्टपैलू बहुआयामी, बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखतो. अशा प्रकारच्या व्यक्ती ह्या मुळातच हाडाच्या कलाकार असतात आणि कलाकार मंडळी ही प्रचंड ऊर्जाक्षम आणि कार्यनिष्ठ असतात. त्यांच्याकडे एकनिष्ठपणा, प्रामाणिकपणा, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट असे कौशल्य असते. काही कलाकार मंडळी स्वतः जशी प्रगती करतात तशीच इतरांनाही सोबत घेऊन त्यांचीही प्रगती घडवतात किंवा काहींना त्यांच्या नकळत घडवतात.

आजच्या जगात अशी भली, निःस्वार्थी कलाकार मंडळी किंवा माणसे पाहायला मिळणे हे फारच दुर्मीळ झाले आहे. असेच एक असामान्य आणि आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाने आणि आपल्या अफाट ऊर्जादायी संवादाने सकारात्मक परिवर्तन घडवणारे आघाडीचे सुलेखनकार, व्यावसायिक चित्रकार, व्यवसाय सल्लागार आणि सामान्य बनून असामान्य कार्यकर्तृत्व घडवणारे निलेश बागवे उर्फ निलेश B+ यांचा आपण परिचय करून घेत आहोत.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

नीलेश ह्यांना साधारण इयत्ता सहावी, सातवीमध्ये असताना आपली चित्रकला चांगली आहे हे जाणवले. त्यानंतर आठवीत असताना चित्रकला प्रबळ झाली. दहावीनंतर चित्रकलेविषयी किंवा ह्या क्षेत्रातील करिअरविषयी मार्गदर्शन करणारे आजूबाजूला कोणी नसल्यामुळे त्यांचा जे.जे. महाविद्यालयातील प्रवेश हुकला. नाइलाजाने एक वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालयात कॉमर्स केले; पण त्यांचे त्यात मन कधीच रमले नाही. या कालखंडात त्यांनी स्केचिंगचा सराव म्हणून आणि गंमत म्हणून मुंबई दर्शन केले. कुलाबा ते माथेरान भटकंती केली. अनेक विभाग पालथे घातले. अनेक नाटक-सिनेमे पाहिले; पण पुढे वर्षभराने1989 साली पुन्हा अगदी जय्यत तयारी करून त्यांनी सर जे. जे. महाविद्यालयात कमर्शियल आर्टमध्ये प्रवेश मिळवला.

सर जे.जे.मध्ये त्यांनी बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) पदवी प्राप्त केली. आधीच वंशपरंपरागत सुंदर हस्ताक्षराचे वरदान त्यांना लाभलेले आहेच. त्यात चित्रकलादेखील सर्वोत्तम आहे. त्यांनी जे.जे.मधून अक्षरशास्त्र आणि सुलेखन ह्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर मुद्रा कम्युनिकेशन ह्या जाहिरात एजन्सीमध्ये त्यांनी काम केले. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्ससाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 1994 ते 2000 अशा 6 वर्षांत त्यांनी विविध जाहिरात संस्थांमधून पेप्सी, कोक, ढखडडजढ, सोनी, गोदरेज, इंडियन ऑइल, सपट परिवार चहा व इतर अनेक लहानमोठ्या आंतराष्ट्रीय-राष्ट्रीय ब्रंड्ससाठी काम केले. 2001 साली त्यांनी उगम क्रिएटिव्ह ह्या नावाने डोंबिवली येथे आपली स्वत:ची जाहिरात संस्था स्थापन केली.

तेव्हापासून आजपावेतो प्रत्येक लहानमोठ्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय, आपले उत्पादन, आपली सेवा, आपली संस्था ब्रँड म्हणून ओळखली जावी यासाठी इीरपव खवशपींळीूं उरीशपशीी उरारिळसप अशी अभिनव मोहीम ते यशस्वीपणे राबवीत आहेत. उगम क्रिएटिव्हच्या माध्यमातून लहानमोठ्या व्यावसायिकाना, त्यांच्या संस्थांना, त्याच्या उत्तम कार्याला, सेवांना व उत्पादनांना समाजामध्ये कल्पक परिणामकारक लोगो आणि इतर डिझाईन्सच्या माध्यमातून एक खास आगळीवेगळी कलात्मक सर्वोत्तम अशी ओळख निर्माण करून देणे, ती वाढविणे व टिकविणे, हा त्यांचा आवडीचा छंद, अभ्यासाचा व्यवसायाचा विषय आहे.

हे ई-बुक खरेदी करण्यासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

उपयोजित कलाकार या नात्याने जाहिरात कलेसारख्या सर्जनशील माध्यमातून समाजप्रबोधनात्मक कार्य करण्याचा ध्यास आणि आवड. टायपोग्राफी, कॅलिग्राफी, हस्ताक्षर सुधारणा, कॉर्पोरेट-पर्सनल ब्रँडिंग, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी व्याख्याने, व्यावसायिक प्रशिक्षण या सर्व क्षेत्रांतील तब्बल 25 वर्षांचा त्यांचा एकत्रित अनुभव आहे. अतिशय कल्पक, उत्साही, स्वयंप्रेरित, प्रेरणादायी व महत्त्वाकांक्षी असे व्यक्तिमत्त्व. जोडीला कोणत्याही सामान्य व्यक्तीला काही क्षणात प्रोत्साहित करण्याचे कौशल्य व नेतृत्वक्षमता ही त्यांची खास वैशिष्ट्ये.

2003 पासून ते आजतागायत पत्नी उल्का आणि इतर अनेक सहकार्यांच्या मदतीने अक्षरगंध संस्थेच्या माध्यमातून सुमारे 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराला आणि व्यक्तिमत्त्वाला सुंदर-वळणदार असे रंग-रूप-आकार देण्याचे पवित्र सामाजिक-शैक्षणिक कार्य. अक्षर श्री गणेश, अक्षरस्फूर्ती, अक्षरजत्रा, अक्षरप्रबोधन, गंध अक्षरांचा, माय इंडिया सुपर स्मार्ट सर्च, आपला कट्टा, सक्सेस स्पार्क, उद्योग ऊर्जा इ. वैविध्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांमुळे नीलेश सुसंवादक, सुलेखनकार, संयोजक, टीम-लीडर, अशा विविध रूपांत ते ओळखले जातात.

कॅलिग्राफी-टायपोग्राफी या क्षेत्रात अनुक्रमे अच्युत पालव सर व कमल शेडगे ह्यांना ते आपले द्रोणाचार्य मानतात. व्यवसाय, उद्योग, जाहिरात क्षेत्र, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, प्रशिक्षण क्षेत्रातील अनेकांना ते आपले प्रेरणास्थान-आदर्श मानतात. विविध क्षेत्रांत कार्यरत असल्यामुळे अनेक संस्थांशी संबधित. अनेक शाळा-कॉलेजेस-संस्थांमधून विविध विषयांवर व्याख्याने. अनेक पुरस्कारांनी सन्मानित. आकाशवाणी, दूरदर्शन, झी 24 तासवर मुलाखती. अक्षरगंध, उगम क्रिएटिव्ह, सक्सेस स्पार्क, उद्योग उर्जा या संस्थांचे संस्थापक-शिल्पकार.

त्यांना 2025 सालापर्यंत 2025 यशस्वी उद्योजक घडवायचे आहेत त्यासाठी ते स्वतः उद्योग ऊर्जा नामक उद्योग क्षेत्रात येऊ घातलेल्या होतकरूंसाठी प्रेरणादायी कार्यक्रमसुद्धा राबवतात. आजवर त्यांनी अनेक उद्योजक घडविले असून अनेकांना कोणत्या क्षेत्रात कोणता मार्ग धरावा यावरही ते मार्गदर्शन करत आले आहेत. नुसतेच मार्गदर्शन नव्हे तर त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गस्थ होऊन पुढे जाणारे वाटसरू किंवा वाटाडे हे आज यशस्वी उद्योजक बनलेही आहेत.

ते स्वतः नावापुढे बी पॉझिटिव्ह असेही लावतात. आता बी पॉझिटिव्ह हा त्यांनी आजच्या अनेक युवकांना दिलेला एक प्रेरणादायी संदेशच आहे असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. नीलेशजींच्या कार्यकर्तृत्वात इतकी प्रचंड ऊर्जा सामावली आहे हे कोणालाही त्यांच्याशी घडलेल्या प्रथम परिचयात किंवा प्रथमदर्शनीच जाणवेल. ही ऊर्जा त्यांच्यात सतत समईसम तेवत असली तरी ती इतरांना मात्र प्रचंड उर्जा देणारी ठरते. त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या अक्षरातून सकारात्मकतेचा गंध बंद कुपीतून अत्तर दरवळावे तसा दरवळतो आणि आल्हाददायीपण ठरतो. म्हणूनच ते अक्षरगंध नाव अगदी तंतोतंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वास साजेसे ठरते. अनेकदा असे वाटते की, त्यांच्या यशाच्या राजमार्गातील हीच खरी मशाल आहे किंवा ज्वाला आहे, जी की नुसतीच तेवत नाही तर लख्खपणे चमकते आणि आता इतरांनाही चमकावण्यात मोठे योगदान देत आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे तितक्याच ठामपणे उभ्या असलेल्या स्त्रीचा मोठा वाटा असतो, असे म्हणतात त्याचप्रमाणे आजवरच्या त्यांच्या संपूर्ण कार्यात त्यांना तितक्याच मोलाची साथ ही त्यांच्या सुविद्य पत्नी उल्का बागवे यांचीही मिळाली आहे. म्हणूनच कोणालाही कोणत्याही क्षेत्रात चमकायचे असल्यास नुसत्या चमकोगिरीवर अवलंबून राहू नका. तर त्यांच्यासारखे कार्यक्षम, कार्यमग्न, विलक्षण प्रचंड ऊर्जाक्षम व्यक्तिमत्त्व घडून चमक आणि दुसर्यांच्याही आयुष्यात ऊर्जास्रोत बनून राहा. कारण अशा प्रकारे चमकण्याची नामी सुवर्णसंधीच तुम्हाला सतत सर्वोत्तम घडवेल.

रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड समाजासाठी ओळखपत्रे असतीलसुद्धा; परंतु स्वतःच्या पायावर उभे करून स्वतःची एक वेगळीच छाप पाडून पैलू दाखवणारे अष्टपैलू असे नीलेश बी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व हे आयुष्यात प्रत्येकास लाभणे हे जीवनाचे सार्थक झाल्यासारखेच आहे. ते कायम म्हणतात किंवा संदेश देतात की, ब्रॅण्डिंग म्हणजे… लोकांच्या लक्षात याल तर लक्षात राहाल. चांगल्या प्रकारे लक्षात याल तर चांगल्या पद्धतीने लक्षात रहाल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कल्पक आणि परिणामकारक पद्धतीने लक्षात रहाल तर कायमस्वरूपी मनात घर करून लक्षात राहाल.

Brand Bond Active Creative निलेश बी पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक उर्जेचा अक्षर उगम…!!!

संपर्क : निलेश बागवे – 8879230443
शब्दांकन – श्रीनिवास गोखले (उगम क्रिएटिव्ह)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!