स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
रोजच्या धकाधकीच्या जीवनास कंटाळला असाल ना? मग या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून कुठे तरी दूरवर शांत ठिकाणी चार दिवस मस्त मजेत, आरामात घालवून जरा जगण्यात बदल करायचा का? चला तर मग! आसपास कोणी नाही. फक्त आणि फक्त समुद्र.
त्या एकावर एक येणार्या सुखावणार्या लाटा, सुखावह वाटणारा समुद्रकिनारा, इथूनच होत असलेला सूर्योदय आणि सूर्यास्त, वरती निरभ्र आकाश आणि रात्रीचे दैदिप्यमान चांदणे; सोबतीला सागरी खाद्यपदार्थांची रेलचेल आणि तसेच वेगवेगळे खेळ आणि रात्रीच्या गप्पांची मेजवानी. खरंच अगदी भन्नाट अनुभव…
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
असा भन्नाट अनुभव देणारा, समुद्र परिसरात राहणारा, समुद्राच्या आनंदाची अनुभूती देणारा एक अवलिया माणूस तुमच्या-आमच्यात आहे. निमिष परब हे या उद्योजकाचे नाव. आईवडिलांनी काही तरी त्याच्या डोळ्यात पहिले असणार म्हणूनच निमिष नाव ठेवले असणार, कारण हे सद्गृहस्थ खरंच पर्यटकांस निमिषाकडे घेऊन जातात. निमिष यांचे शिक्षण दहावी आणि त्यानंतर मोटर मेकॅनिक असे झाले. निमिष यांचे शालेय शिक्षण मुंबईमध्ये ‘राजा शिवाजी विद्यालया’त झाले.
त्यांना व्यवसायाचे बाळकडू हे वडिलांकडूनच मिळाले. त्यांच्या वडिलांचा दादरमध्ये बारचा व्यवसाय होता. निमिष यांचा जन्म १९७२ सालचा. त्यांच्या जन्माच्या आधी त्यांच्या वडिलांनी १९७१ साली अलिबागमधील आवास या ठिकाणी जमीन विकत घेतली होती. त्यांच्या शिक्षणाच्या वेळी निमिष हे मे महिन्याच्या सुट्टीवर असताना मूळ गाव वेंगुर्ला असूनही आवास याच ठिकाणी जायचे. यामुळेच त्यांना इथेच गावपण लाभल्याचे ते सांगतात.
निमिष यांनी मुंबईऐवजी अलिबाग येथेच व्यवसाय करायचे ठरवले. तिथेच चोंढी या ठिकाणी जागा घेऊन व्यवसायात ते उतरलेही; पण योग्य मार्गदर्शनाही उणीव आणि अनुभवाची कमतरता यामुळे बारचा परवाना घेऊन उद्योग सुरू करण्यात ते अयशस्वी झाले; पण त्यातूनही त्या परिस्थितीत त्यांना खूप मोठा अनुभव मिळाल्याचे ते सांगतात.
चोंढीपासूनच नजीक किहिम समुद्र असल्याने तेथील घरात त्यांनी निवास योजनाधारकांना ग्राहक ते देत होते. अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे निमिषजी संस्थापक सदस्य व अध्यक्ष असून अलिबाग सॅटर्डे क्लबचे आणि तसेच मेम्बर ऑफ सीशोर अलिबाग रोटरी क्लबचेही सदस्य आहेत.

आता ते पाच वर्षे ‘आवास बीच कॉटेज’ या नावाने आवास येथे पर्यटन व्यवस्था चालवत आहेत. जेथे पर्यटकांच्या सुखसोयींनी संपूर्णतः चोख व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर आज किहिम येथे ‘ब्लॉसम ब्ल्यू’ या नावाने पर्यटन व्यवस्थाही सुरू केलीये. येथे बारा खोल्या असून काही वातानुकूलित आहेत, तसेच हल्लीच्या जगातील मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे वायफाय तेही त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.
सुट्टीच्या हंगामात, किहिम समुद्रकिनारा जगभरातील प्रवाशांना आपल्याकडे अशा प्रकारे आकर्षित करतो ज्या प्रकारे समुद्रकिनार्यावरील इतरत्र कुठलेच शहर करीत नाही. आपल्या अद्भूत समुद्रकिनार्यांसाठी, समुद्रावरील धम्माल पार्ट्यांसाठी आणि मसालेदार जेवण व वामकुक्षीप्रिय जीवनशैलीकरिता सुप्रसिद्ध असणार्या किहिममध्ये सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत.
त्यामुळे जर आपल्याला खिशाला परवडणारे बजेट असेल तरीही निराश होऊ नका. किहिममध्ये आपल्या वास्तव्यासाठी आल्हाददायी वातावरणासह आपणास आरामदायक जागा मिळेलच. तसेच अलिबागमधील इतर प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकीही येथे निमिषजी भाड्याने उपलब्ध करून देतात.
हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत असलेल्या खास शैलीच्या खोल्या असणारे हे रिसॉर्ट आजच्या युगातील आरामदायी असा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकास प्रदान करेल यात शंकाच नाही ज्याला आधुनिक युगाच्या लक्झरी व आरामदायकतेची जोड देण्यात आलेली आहे.
हे रिसॉर्ट समुद्रकिनार्यावरच्या शहराच्या चैतन्यामध्ये नखशिखांत भिजण्याची संधी प्रत्येक पर्यटकाला प्रदान करते. कॉकटेल्स व ड्रिंक्स, बहुविध पाककृतींनी सज्ज गार्डन रेस्टॉरंटमधील चमचमीत जेवण आणि विशेष आनंददायक सीफूडची मेजवानी या ठिकाणाच्या आनंदोत्सवामध्ये आणखीनच भर घालत असते.
‘ब्लॉसम ब्ल्यू रिसॉर्ट शांतताप्रिय किहीम बीचपासून फक्त काही मिनिटभराच्या अंतरावर आहे. जर आपल्याला प्रसन्न समुद्रकिनार्यावर रेतीचे किल्ले बांधण्याचा अनुभव घ्यायचा असेल, सूर्यास्ताच्या साक्षीने लांब फेरफटका मारायचा असेल किंवा दुधाळ फेसाळलेल्या लाटांना चंदेरी वाळूचे आलिंगन घेताना बघायचे असेल तर ह्या रिसॉर्टला जरूर भेट द्यावी.
जर समुद्र आणि वाळू बघून आपले मन भरले असेल तर रिलॅक्स व्हा, झाडांनी आच्छादित हिरव्यागार बगिच्याचा आनंद घ्या. मन संपूर्णपणे प्रफुल्लित करा. आज असे अविस्मरणीय स्वप्नवत वाटणारे रिसॉर्ट निमिषजींनी बांधले असून आजच्या एकंदर मार्केटमधील मंदीच्या काळातही या पठ्ठ्याने हार मानली नाही, तर तसाच तो खंबीरपणे उभा आहे. याचे बुकिंग ऑनलाइनही होते.
निमिषजी पुढे सांगतात, जेव्हा कर्ज झाले होते, तेव्हा पालीला बिल्डरकडे नोकरी केली तर त्यादेखील कामाचा अनुभव गाठीशी असल्याने आज या हॉटेल व्यवसायात कोण उतरू पाहत असतील तर त्यांनाही ते हॉटेल बांधून देण्याची तयारी दर्शवत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचादेखील व्यवसाय वाढण्यासाठी ते त्यांना मदतीचा हात पुढे करण्यास तयार आहेत. इतका परोपकारी आणि मेहनती माणूस हल्ली फार दुर्मीळ होत चालला आहे.
संपर्क : निमिष परब
7769942000
मुलाखत – श्रीनिवास गोखले (उगम क्रिएटिव्ह)
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.