Advertisement
बिझनेस लिजेंड्स

सर्वात मोठ्या शेअर ट्रेडिंग कंपनीचा संस्थापक असलेला नितिन चौदाव्या वर्षी झाला होता उद्योजक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


त्याचे वडील बॅंकेत नोकरी करत होते. त्यांची सतत बदली होत असे, त्यामुळे तोदेखील कधी या शहरात तर कधी एखाद्या छोट्या गावात, असं करत करत लहानाचा मोठा झाला. शेवटी एकदाचे त्याचे कुटुंब बंगळुरूमध्ये स्थायिक झाले, तेव्हा तो नऊ वर्षांचा होता.

तो लहान असताना त्याला शाळेचा कंटाळा यायचा. त्या वयात त्याला असं वाटायचं की तू हे कर किंवा अमुक एक करू नकोस, असं त्याला सांगितलं जायचं, पण त्याचं कारण मात्र कुणी सांगत नसे. त्यामुळे कदाचित आईवडील जे सांगतील तेच तो करत आला होता; त्याच्या मनाविरुद्ध.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

कालांतराने औपचारिक शिक्षणात रस कमी झाल्यामुळे वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी त्याने वापरलेल्या फोनची खरेदी-विक्री हा त्याचा पहिला व्यवसाय सुरू केला. जेव्हा त्याच्या आईला या व्यवसायाबद्दल कळलं, तेव्हां तिने त्याला विरोध केला. आपल्या मुलाने शिकून नाव कमवावं, असं तिला वाटणं साहजिक होत. एक दिवस तिने फोन उचलला आणि चक्क बाहेर फेकून दिला.

त्याच्या बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक त्याला त्याचे पेपर देण्यास तयार नव्हते; उलट त्यांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतले. मुख्याध्यापकांना भेटून आल्यावर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. त्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला खूप लाज वाटेल असं काही करू नकोस.

त्यांचा असा गैरसमज होता की तो खूप हुशार आहे. वास्तविक पाहता त्याचा गणित हा विषय चांगला होता, शिवाय तो बुद्धिबळदेखील चांगलं खेळत असे, पण मुळातच त्याला शाळेत जायचा कंटाळा आला होता. नंतर त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.

त्याचा हा निर्णय त्याच्या आईवडिलांना अर्थातच आवडला नव्हता आणि तो पुढे काय करणार याबद्दल त्याला ते सतत विचारत असत. पण त्याला स्वतःला माहीत नव्हतं की पुढे तो नक्की काय करणार आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्याला पहिली नोकरी मिळाली. पगार होता ८ हजार रुपये. तो दुपारी ४ ते पहाटे १ वाजेपर्यंत कॉल सेंटरमध्ये काम करत असे आणि दिवसा स्टाॅक ट्रेडिंगमध्ये आपलं नशीब आजमावत असे.

“मी खूप काही शिकलो; जेव्हां तुम्ही कौटुंबिक वातावरणापासून दूर जाता, तेव्हां तुमचे नातेवाईक त्यांचे निर्णय तुमच्यावर लादू शकत नाहीत”, पुढे एकदां तो म्हणाला होता.

तो १८ वर्षांचा झाला तेव्हा रितसरपणे शेअर ट्रेडिंग व्यवसाय करू लागला होता. त्याच्या वडिलांनी त्यांची काही बचत त्याला दिली आणि म्हणाले, ‘हे घे आणि योग्य रितीने व्यवसाय कर.’ त्यानंतर त्याने कॉल सेंटरमधील त्याच्या मॅनेजरलादेखील पैसे गुंतवण्यास सांगितलं. मग त्याने इतरांना सांगितलं. त्याच्या शेवटच्या वर्षात तो एक दिवस कामावर गेला नाही, पण रोल काॅलवर त्याला उपस्थित म्हणून लिहिले गेले; इन्सेन्टिव्हही मिळाले, कारण तो संपूर्ण टीमचे पैसे सांभाळत होता.

भाऊ निखिल कामथबरोबर नितिन कामथ

या मुलाचं नाव नितिन कामथ. ऑगस्ट २०१० मध्ये आपला भाऊ निखिल कामथबरोबर त्याने ‘झिरोधा’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली. ‘झिरोधा’ हे नाव ‘झिरो’ अर्थात शून्य आणि ‘रोधा’ म्हणजे संस्कृतमध्ये आडकाठी किंवा विरोध या दोन शब्दांचे मिश्रण आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘झिरोधा’ म्हणजे बिनदिक्कतपणे ट्रेडिंग करण्याचा प्लॅटफॉर्म.

जून २०२० मध्ये ‘झिरोधा’ सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्यांकनासह युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले. ‘झिरोधा’कडे १२ लाखांहून जास्त सक्रिय ग्राहक आहेत. कंपनी तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी ‘झिरोधा कमोडिटिज प्रा. लि.’द्वारे कमोडिटी ट्रेडिंग सेवादेखील पुरवते.

सुरुवातीला अतिशय सक्रिय असलेल्या डे ट्रेडर्सवर लक्ष केंद्रित करणे, ट्रेडिंग करण्याची फी कमी करणे आणि व्यवसायात पारदर्शकता आणणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते, कारण वित्तीय सेवा कंपन्या सामान्यतः त्यांच्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये खूप अपारदर्शक असतात असा एकूण समज आहे.

२०१६ मध्ये आधार-लिंक्ड डिजिटल स्वाक्षरी वापरून ऑनलाइन खाती उघडता येणे सुलभ झाले, शिवाय ब्रोकरचा स्वीकार सहजपणे होऊ लागला. तोपर्यंत खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याच्या पुस्तिकेवर स्वाक्षरी करणे गरजेचे होते. ज्या ग्राहकांना खाते उघडण्यासाठी दोन आठवडे वाट पाहावी लागत होती, ते आता १५-२० मिनिटांत होऊ शकलं.

आज ‘झिरोधा’चे बिझनेस मॉडेल्स आणि इन-हाउस टेक्नॉलॉजीने त्यांना सक्रिय रिटेल क्लायंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे स्टॉक ब्रोकर बनवले आहे. ९ दशलक्षाहून अधिक ग्राहक त्यांच्या गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मच्या इकोसिस्टिमद्वारे दररोज लाखो ऑर्डर्स देतात, जे सर्व भारतीय रिटेल ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या १५ टक्कयांपेक्षा जास्त आहे.

‘झिरोधा’ने ‘बूटस्ट्रॅप चॅम्प’ श्रेणीत ‘इकॉनॉमिक टाइम्स स्टार्टअप अवॉर्ड २०१६’ जिंकले. कंपनीने २०१४ आणि २०१५ मध्ये बीएसई – डी ॲंड बी ‘इमर्जिंग इक्विटी ब्रोकिंग हाउस अवॉर्ड’ आणि २०१८ मध्ये एन एस ई ‘रिटेल ब्रोकर ऑफ द इयर’ पुरस्कारदेखील जिंकला.

शाळेत असतानाच आपल्याला काय करायचं आहे, हे नितिन कामथने ठरवलं होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत त्याने स्थापन केलेल्या ‘झिरोधा’ या ट्रेडिंग कंपनीने आज भारतातील अग्रेसर कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे.

– चंद्रशेखर मराठे

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!