उद्योगोपयोगी

एन.एल.पी – मार्केटिंग व सेल्स

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

मोठमोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग व सेल्सचे नियोेजन करण्यासाठी तसेच उद्योगातील मार्केटिंग वृद्धीसाठी धोरणे आखली जातात; परंतु एका सामान्य उद्योजकाला हे मार्केटिंग व सेल्सचे काम तसेच त्या अनुषंगाने येणारी आव्हाने आणि त्याबद्दलची आखणी व धोरणे स्वत:च करावी लागतात आणि प्रश्‍नसुद्धा स्वत:च सोडवावे लागतात.

मार्केटिंगमध्ये येणारी आव्हाने

 • उद्योगाबद्दल तसेच आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेेसची अपूर्ण माहिती.
 • उद्योगाला सर्वांसमोर मांडण्याची भीती किंवा न्यूनगंड
 • आपल्याला समोरच्या ग्राहकाची अपूर्ण माहिती किंवा ग्राहकाच्या आवश्यकतेची अपूर्ण माहिती.
 • ग्राहकाला अपूर्ण सादरीकरण.
 • मार्केटची आवश्यकता आणि पुरवठ्याचा बिघडलेला अंदाज.
 • नावीन्यतेची कमतरता
 • प्रॉडक्टबद्दल आवश्यकता निर्माण करण्याची कमतरता.
 • योग्य पद्धतीच्या मार्केटिंगची कमी.

एन.एल.पी. – मार्केटिंग व सेल्स

एन.एल.पी. म्हणजे आपल्या मनाच्या किंवा मेंदूच्या माध्यमातून आपल्या वर्तनात, स्वभावात आणि सवयीत बदल करणे. एन.एल.पी. मार्केटिंग व सेल्स म्हणजे आपल्या मनाचे मेंदूचे मार्केटिंग व सेल्ससाठी केले जाणारे प्रोगॅमिंग ज्याच्या मदतीने आपण स्वत:मध्ये आपल्या उद्योगात आणि मार्केटिंग व सेल्समध्ये बदल करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्राहकाला आवश्यकतेप्रमाणे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचा पुरवठा करू शकतो.


‘स्मार्ट उद्योजक’चे आजीव वर्गणीदार होऊन आमच्याशी एक दीर्घकालीन नाते जोडा व UNLIMITED लाभ मिळवा.

आजीव वर्गणीदार होण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.


एन.एल.पी. – मार्केटिंग व सेल्सच्या माध्यमातून उद्योग कसा वाढतो?

एन.एल.पी. – मार्केटिंग व सेल्सच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकाची मानसिकता ओळखू शकतो त्याचप्रमाणे त्यांची आवश्यकता शोधू शकतो आणि जर आपल्याला आवश्यकता समजली तर त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचा पुरवठा करू शकतो. एन.एल.पी. – मार्केटिंग व सेल्सचा दुसरा फायदा म्हणजे आपण स्वत:ची, उद्योगाची तसेच आपल्या कर्मचार्‍यांची व ग्राहकांची योग्यरीत्या काळजी घेऊ शकतो आणि योग्य सकारात्मक बदल घडवू शकतो.

याबद्दल काही टिप्स

 • ग्राहकाच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
 • आपल्या स्वत:च्या आणि कर्मचार्‍यांच्या नातेसंबंधांना सुधारण्याचा प्रयत्न करणे.
 • स्वत:च्या आणि समोरच्याच्या भावनांचा आणि दृष्टिकोनाचा विचार करणे.
 • आपल्या उद्योगात थीम आणि एक लय निर्माण करून त्याचे मार्केटिंग करणे.
 • स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला ओळखणे आणि त्याच प्रकारच्या उद्योगाची आणि मार्केटिंग करण्याची सुरुवात करणे.
 • आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये नाविन्य आणणे.
 • संमोहन करणार्‍या शब्दांचा प्रयोग करणे.
 • आपल्या सहा सेन्सेसला जागृत करणे आणि त्यांची जागृतता वाढवणे.
 • मार्केटिंगसाठी स्वत:चा एक पट्टा आखून घेणे आणि त्यावर मार्केटिंग करायला सुरू करणे.
 • चाकोरीबाहेर जाऊन विचार करणे आणि नवीन उद्योग व त्यावर अवलंबून असलेले जोडउद्योग निर्माण करणे.
 • समोरच्याच्या हावभावाला मिळते-जुळते हावभाव आणणे. त्यात आपल्या चेहर्‍याचे हावभाव विशेष करून येतात.

कसा करावा Report?

 • चेहर्‍यावर स्मितहास्य आणणे.
 • आत्मविश्‍वासाने हस्तांदोलन
 • नजरेला नजर देऊन व समोरच्याच्या भिवयांमध्ये बघून बोलणे.
 • समोरच्याचे विचार आणि हावभाव जाणून घेणे आणि त्याप्रमाणे आपल्या चेहर्‍यावर हावभाव आणणे.
 • समोरच्याच्या श्‍वासोच्छ्वासाशी आपले श्‍वसन जुळवणे.
 • आवाजाशी, चेहर्‍याच्या हावभावाशी, भाषाशैलीशी जुळवणे.
 • मधूनमधून विविध प्रलोभने देऊ करणे आणि समोरच्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणे.
 • स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवून डील करणे.
 • सतत शिकणे आणि स्वत:मध्ये, उद्योगात, मार्केटिंगमध्ये बदल करणे.
 • स्वत:ला आणि घरच्यांना वेळ देणे.

या गोष्टी टाळाव्या

 • अनेक तंत्रांचा उपयोग
 • अनेक मार्केटिंग व सेल्सच्या तंत्रांचा वापर
 • स्वत:चे मानसिक स्वास्थ्य खराब करून घेणे
 • हजार प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची माहिती ग्राहकाला एकाच वेळेला देणे
 • बळजबरी करून ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करणे

एकवीस दिवसांचा प्लॅन

 • १-७ दिवस : स्वत:शी आरशासमोर उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून आपली बोलण्याची भीड चेपेल. त्याचप्रमाणे आपले संभाषण सुधारेल.
 • ८-१५ दिवस : घरच्यांशी आणि मित्रपरिवाराशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणे.
 • १६-२१ दिवस : जुन्या ग्राहकांशी पुन्हा जुळण्याचा प्रयत्न त्याचप्रमाणे त्याचा आढावा घेणे.

२२ – पुढे दररोज स्वत:ला सकारात्मक विचारांचा खुराक द्या. एकवीस दिवस जर आपण सातत्याने पाठपुरावा करू तर नक्कीच यश आपल्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल.

– डॉ. शिवांगी झरकर
९८६७८१५२५३
dr.shivangi.phd@gmail.com

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: