Advertisement
उद्योगवार्ता

या भारतीय स्टार्टअपने केलाय ऑस्ट्रेलियात प्रवेश

भारतात अल्पावधीत लोकांच्या पसंतीला पडलेली ‘ओला’ कॅब सर्व्हिसने आता ऑस्ट्रेलियातही पदार्पण केले आहे. कालपासून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी, मेलबर्न आणि पर्थ या तीन प्रमुख शहरांमध्ये ‘ओला’ची सेवा सुरू झाल्याचे कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

भाविश अगरवाल आणि अंकित भाती या दोन तरुणांनी २०११ साली मुंबईमध्ये सुरू केलेल्या ‘ओला’च्या प्रगतीचे हे पहिले जागतिक पाऊल आहे. भारतात ‘ओला’चे ११० हून अधिक शहरांतून १२ कोटी ५० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. एका भारतीय स्टार्टअपची ही प्रगती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आपण बर्‍याचदा ऐकतो की, मोठ्यात मोठा उद्योग हा भरपूर पैसे ओतून नाही तर एका मोठ्या कल्पनेतून उभा राहतो. त्याचप्रमाणे भाविश आणि अंकित यांनी कर्ज घेऊन भरपूर गाड्या विकत घेऊन मग चालकांना कामावर ठेवून ओला सुरू केली नाही. त्यांनी तल्लख बुद्धीचा वापर करून साध्या टॅक्सीचालकांना ओलाची संधी दिली. त्या चालकांच्या टॅक्सींची थोडी डागडुजी आणि नूतनीकरण केले. तसेच टॅक्सीचालकांना पगार न देता कमिशन ठेवले. म्हणजेच जितके जास्ती पैसे टॅक्सीचालक कमवणार त्यातले ठरावीक टक्के ओलाचे आणि बाकी सर्व टॅक्सीचालकांचे असे ठरले. त्यामुळे टॅक्सीचालकसुद्धा प्रामाणिकपणे आपले काम करू लागले.

एका क्लिकसरशी दारात येऊन उभी राहणार्‍या OLA ची यशोगाथा!


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: