भारतात franchising उद्योगात गेल्या पाच वर्षांत ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. भारतीय जीडीपीमध्ये फ्रेंचायझिंग क्षेत्राचे योगदान २०२१ मध्ये २ टक्के होते, जे २०२३ मध्ये दुप्पट होऊन सुमारे ४ टक्के योगदान देईल असा अंदाज आहे.
‘ओपेक्स स्टार्टअप स्कुल’ आणि ‘कोल्हापूर स्टार्टअप नेटवर्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रँचायझी उत्सव २०२३’ कार्यक्रम २७ आणि २८ मे २०२३ रोजी आयोजित केला आहे.
कोल्हापूर आणि सांगली येथील फ्रँचायझी व्यवसाय मालक आणि फ्रँचायझी व्यवसाय इच्छुकांसाठी एक प्रकारचे व्यासपीठ तयार करण्यासाठी सज्ज आहे. हा कार्यक्रम फ्रेंचाइजी देणारे आणि फ्रेंचाइजी घेणारे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करेल.
२७ मे रोजी कोल्हापूर व २८ मे रोजी सांगलीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट फ्रँचायझी व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगाच्या वाढीस सुलभ करणे आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)प्रदर्शक आणि सहभागींच्या विविध श्रेणीसह, फ्रँचायझी उत्सव २०२३ हे नवीन उत्पादने, कल्पना आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी योग्य ठिकाण असेल. या कार्यक्रमात विविध सत्रे, बिजनेस मॉडेल प्रेसेंटेशन, एक्स्पो आणि उद्योग तज्ज्ञांचे मुख्य मार्गदर्शन सादर केले जातील.
तुम्ही प्रस्थापित फ्रँचायझी मालक असाल किंवा फ्रेंचायझिंगच्या जगात प्रवेश करू पाहणारे इच्छुक असाल तर ‘फ्रँचायझी उत्सव २०२३’ हे तुमच्यासाठी आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. समविचारी व्यक्तींशी कनेक्ट होण्यासाठी, संभाव्य व्यावसायिक उपक्रम एक्सप्लोर करण्यासाठी आणि तुमच्या व्यावसायिक नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी हा कार्यक्रम भरपूर संधी देईल.
तुम्हालाही फ्रँचायझी द्यायची किंवा घ्यायची असेल तर opexindia.com वर जाऊन नोंदणी करा किंवा ९५५२२०६६४४ / ९५५२१०८८९९ या क्रमांकांवर संपर्क करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.